प्रत्येकाच्या दिवसाची सुरुवात चहा किंवा कॉफीने होते. सर्वांनाच ग्रीन टी, ब्लॅक टी आणि वेगवेगळ्या प्रकारची हर्बल टी प्यायला आवडते, पण तुम्ही कधी 'बनाना टी'बद्दल ऐकलं आहे का? केळी आरोग्यासाठी जितकी फायदेशीर आहे तितकाच त्याचा चहा देखील शरीरासाठी एखाद्या वरदानापेक्षा कमी नाही. जर तुम्ही तुमच्या डेली रुटीनमध्ये अनेक पोषक तत्वांनी समृद्ध असलेल्या केळ्याचा चहाचा समावेश केला तर तुम्हाला अनेक आरोग्यदायी फायदे मिळू शकतात.
केळ्याच्या चहाचे फायदे
हाडं - केळ्याच्या चहामध्ये आढळणारे मँगनीज आणि मॅग्नेशियम हाडं मजबूत करण्यास मदत करतात. अशा परिस्थितीत संधिवात किंवा हाडं कमकुवत झाल्याने त्रास होत असलेल्यांसाठी हा चहा अत्यंत फायदेशीर आहे.
पचन - केळ्याच्या चहामध्ये आढळणारे पोटॅशियम, मॅग्नेशियम आणि फायबरसारखे घटक पचन चांगलं ठेवून बद्धकोष्ठतासारख्या पोटाच्या समस्या दूर करण्यास मदत करतात.
ब्लड प्रेशर - केळ्याच्या चहामध्ये पोटॅशियम भरपूर प्रमाणात असते. त्यामुळे ब्लड प्रेशरच्या रुग्णांसाठी तो गुणकारी ठरू शकतो.
स्ट्रेस - केळ्याच्या चहातील सेरोटोनिन आणि डोपामाइन स्ट्रेस कमी करून लोकांना आनंदी ठेवण्यास मदत करू शकतात.
कसा बनवायचा केळ्याचा फक्कड चहा?
- सर्वात आधी केळ्याची सालं धुवून स्वच्छ करा.
- एका पॅनमध्ये २ ग्लास पाणी टाकून ते उकळून घ्या.
- चांगलं उकळलं की त्यात अर्धा चमचा साखर आणि दालचिनी घाला.
- चहा उकळून तयार झाल्यानंतर तो गाळून प्या.