साहित्य
तांदूळ, चणाडाळ, उडदाची डाळ, पाणी, हळद, जिरे पूड, तूप, नारळ, गूळ, वेलची पूड , मेथी दाणे
तांदळाचे पीठ जर तीन वाट्या घेतले , तर प्रमाण घेताना एक वाटी उडदाची डाळ घ्यायची. अर्धी वाटी चणाडाळ घ्यायची. (Authentic traditional Konkani dish Ras Khaproli - Specially cooked in coconut milk, you will fall in love after eating it once Maharashra Food )चार ते पाच मेथीचे दाणे घ्यायचे.
कृती
१. एका खोलगट भांड्यात तीन वाटी तांदूळ घ्यायचे. तसेच वाटीभर उडदाची डाळ घ्यायची. त्यात आर्धी वाटी चणाडाळ घालायची. चार दाणे मेथीचे घालायचे आणि सगळे पदार्थ स्वच्छ धुवायचे. धुऊन झाल्यावर त्यात पाणी ओतायचे आणि डाळ भिजत ठेवायची. रात्रभर भिजवायची. दुसऱ्या दिवशी सकाळी वाटून घ्यायचे. मिक्सरमध्ये डोसाचे पीठ जसे वाटता अगदी तसेच वाटून घ्यायचे. पुन्हा काही तासांसाठी झाकून ठेवायचे.
२. काही तासांनंतर पीठ फुगते. मग त्यातून चमचा फिरवून ते पातळ फेटायचे. फुगल्या सारखे दिसायचे बंद झाले की फेटणे थांबवायचे. त्यात चमचाभर हळद घालायची. तसेच जिरे पूडही घालायची आणि ढवळायचे. ढवळून झाल्यावर झाकून बाजूला ठेवायचे.
३. ताजा नारळ फोडायचा. नारळाचे पाणी पिऊन टाकायचे आणि नारळ छान खवायचा. (Authentic traditional Konkani dish Ras Khaproli - Specially cooked in coconut milk, you will fall in love after eating it once Maharashra Food )खवलेला नारळ मिक्सरच्या भांड्यात घ्यायचा. त्यात पाणी घालायचे. जेवढा नारळ तेवढेच पाणी. नारळ मस्त वाटून घ्यायचा. अगदी पातळ दूध करायचे. मग एका पातेल्यावर पातळ कॉटनचा फडका ठेवायचा आणि दूध गाळून घ्यायचे. नारळाचा सगळा रस काढून घ्यायचा. चोथा बाजूला करायचा म्हणजे छान वारळाचे ताजे दूध मिळेल.
४. नारळाच्या दूधात किसलेला गूळ घालायचा. चमचाभर वेलची पूड घालायची. गूळ विरघळेपर्यंत दूध ढवळायचे. गूळ व दूध एकजीव झाल्यावर बाजूला ठेवायचे.
५. गॅसवर तवा गरम करायचा. पॅन असेल तर आणखी उत्तम. त्यावर तयार पीठाची जाडसर आंबोळी लावायची. अगदी आंबोळीसाठी जसे पीठ पसरवता तसेच. जाडसर मऊ अशी खापरोळी तयार होते. बाजूने तूप सोडायचे आणि झाकण ठेवायचे. खापरोळी छान जाळीदार होते. मग एका ताटात काढायची वरतून नारळाचे दूध ओतायचे.