Lokmat Sakhi >Food > हेल्दी सुपरफूड! कोणत्या वेळी अजिबात खाऊ नये कलिंगड? तज्ज्ञांनी केलं अलर्ट, सांगितलं कारण

हेल्दी सुपरफूड! कोणत्या वेळी अजिबात खाऊ नये कलिंगड? तज्ज्ञांनी केलं अलर्ट, सांगितलं कारण

कलिंगड हे केवळ एक चविष्ट फळ नाही तर संपूर्ण शरीरासाठी फायदेशीर असलेलं एक हेल्दी सुपरफूड आहे.

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 11, 2025 17:18 IST2025-03-11T17:17:11+5:302025-03-11T17:18:07+5:30

कलिंगड हे केवळ एक चविष्ट फळ नाही तर संपूर्ण शरीरासाठी फायदेशीर असलेलं एक हेल्दी सुपरफूड आहे.

at what time should watermelon not be eaten at all know from expert | हेल्दी सुपरफूड! कोणत्या वेळी अजिबात खाऊ नये कलिंगड? तज्ज्ञांनी केलं अलर्ट, सांगितलं कारण

हेल्दी सुपरफूड! कोणत्या वेळी अजिबात खाऊ नये कलिंगड? तज्ज्ञांनी केलं अलर्ट, सांगितलं कारण

कलिंगड आरोग्यासाठी फायदेशीर आहे कारण ते हायड्रेशनचा सर्वोत्तम नैसर्गिक सोर्स आहे. यामध्ये ९२% पाणी असतं, जे उन्हाळ्यात शरीराला हायड्रेट ठेवण्यास मदत करतं आणि डिहायड्रेशन टाळतं. यामध्ये व्हिटॅमिन सी, ए आणि बी6 असतं, जे रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यास, त्वचा निरोगी ठेवण्यास आणि एनर्जी लेव्हल वाढविण्यास मदत करतात. तसेच त्यात पोटॅशियमचं प्रमाण चांगलं असतं, जे ब्लड प्रेशर कंट्रोल करण्यास आणि हृदयाचं आरोग्य सुधारण्यास मदत करतं.

कलिंगडमध्ये पोटॅशियम आणि अमीनो एसिडसारखे पोषक घटक असतात, जे मसल्स रिकव्हर करण्यास आणि बॉ़डी रिहायड्रेट करण्यास मदत करतात. याव्यतिरिक्त, ते ब्लड प्रेशर कंट्रोस करण्यास देखील मदत करतं, ज्यामुळे हृदयाशी संबंधित आजारांचा धोका कमी होतो. कलिंगड हे केवळ एक चविष्ट फळ नाही तर संपूर्ण शरीरासाठी फायदेशीर असलेलं एक हेल्दी सुपरफूड आहे.

कलिंगड खाण्याचे अनेक फायदे

कलिंगडमध्ये अँटीऑक्सिडंट्स असतात, जे शरीरातील फ्री रॅडिकल्स कमी करून सेल्सचं नुकसान होण्यापासून संरक्षण करतात. यामध्ये असलेले फायबर पचन सुधारतं आणि बद्धकोष्ठतासारख्या समस्यांपासून आराम देतं. कमी कॅलरीज आणि फॅट फ्री असल्याने, वजन कमी करण्यासाठी देखील हे एक उत्तम फळ आहे. कलिंगड खाण्याचे अनेक फायदे आहेत, पण तुम्हाला माहिती आहे का की हे फळ कोणत्या वेळी खाऊ नये? 

कोणत्या वेळी खाऊ नये? 

आयुर्वेदिक तज्ज्ञ डॉ. किरण गुप्ता म्हणाले की, जास्त अन्न खाल्ल्यानंतर लगेच कलिंगड खाणं हानिकारक ठरू शकतं. पचन प्रक्रिया मंदावू शकते, ज्यामुळे तुम्हाला पोटाशी संबंधित आजार होऊ शकतात. म्हणून तुम्ही हे लक्षात ठेवलं पाहिजे की कधीही कलिंगड आणि अन्न एकत्र खाऊ नये. सकाळी किंवा संध्याकाळी नाश्त्यात टरबूज खाऊ शकता. जर तुम्ही जेवणाच्या वेळी टरबूज खात असाल तर तुम्ही जेवण स्किप करू शकता.

'या' लोकांनी खाऊ नये कलिंगड

ज्या लोकांना सर्दी किंवा घसा खवखवण्याची समस्या आहे त्यांनी कलिंगड खाणं टाळावं. याचा घशाला त्रास होऊ शकतो आणि बरं होण्यास वेळ लागू शकतो. याशिवाय, जेव्हा जेव्हा हवामान बदलत असेल तेव्हा कलिंगड खाणं टाळावं. कलिंगड आरोग्यासाठी फायदेशीर आहे, परंतु ते योग्य वेळी आणि योग्य पद्धतीने खाणं अत्यंत महत्त्वाचं आहे.
 

Web Title: at what time should watermelon not be eaten at all know from expert

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.