Join us

Ashadhi Ekadashi Food : साबुदाणा न भिजवताच करा इडली पात्रात इन्स्टंट साबुदाणा वडा, पावसाळी हवेत खा गरमागरम वडे...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 5, 2025 14:39 IST

Ashadhi Ekadashi Food : Sabudana Vada Recipe : Instant Sabudana Vada : How To Make Sabudana Vada : Without soaking Sabudana, make instant Sabudana Vada : साबुदाणा भिजवायला विसरलात, मग करा इडली पात्रात झटपट तयार होणारे कुरकुरीत साबुदाणे वडे...

आषाढी एकादशी (Ashadhi Ekadashi Food) अवघी उद्यावर आली आहे. आषाढी एकादशीला आपल्यापैकी बरेचजण उपवास करतात. या दिवशी अनेक भक्त विठुरायाचं दर्शन (Sabudana Vada Recipe) घेतात. उपवासाच्या दिवशी आपण शक्यतो साबुदाणा आणि बटाट्यापासून तयार केले जाणारे उपवासाचे ( Instant Sabudana Vada) पदार्थ खातो. उपवासाचे पदार्थ म्हंटले की त्यात साबुदाणा वडा हमखास आलाच. खमंग, खुसखुशीत साबुदाणे वडे तयार करायचे म्हटलं की, सर्वात आधी साबुदाणे भिजवण्याच मुख्य काम करावं लागत(Without soaking Sabudana, make instant Sabudana Vada).

साबुदाणे भिजवून ते आधी फुलवून घ्यावे लागतात त्यानंतरच त्याचे वेगवेगळे पदार्थ तयार केले जातात. परंतु साबुदाणे भिजवून त्याचे वडे करण्याची प्रक्रिया फार मोठी आणि वेळखाऊ असते इतकंच नव्हे तर आपण काहीवेळा गडबडीत साबुदाणे भिजवायला विसरतो. अशा परिस्थितीत, साबुदाणे न भिजवता देखील आपण इन्स्टंट आणि तितकेच कुरकुरीत, खमंग असे साबुदाणे वडे झटपट तयार करु शकतो. साबुदाणे न भिजवता, इडली पात्रात झटपट साबुदाणे वडे कसे तयार करायचे याची सोपी रेसिपी पाहूयात.   

साहित्य :- 

१. बटाटे - ३ (कच्च्या बटाट्याच्या किस)२. साबुदाणा - १ कप ३. शेंगदाण्याचं कूट - १/४ कप४. हिरव्या मिरच्या - ४ ते ५ (बारीक चिरलेल्या)५. मीठ - चवीनुसार६. राजगिरा पीठ - ३ टेबलस्पून ७. तेल - तळण्यासाठी

आषाढी एकादशी : उपवासासाठी खास खुसखुशीत बटाटा पुरी! टिकतेही आठवडाभर, झटपट पारंपरिक पदार्थ...

Ashadhi Ekadashi Food : कुरकुरीत जाळीदार उपवासाचे आप्पे करा झटपट, खास एकादशी स्पेशल पदार्थ...

कृती :- 

१. बटाटे स्वच्छ धुवून त्याच्या सालं काढून घ्यावी. सालं काढून घेतलेले कच्चे बटाटे किसणीवर किसून त्याचा किस करून घ्यावा. २. आता एका बाऊलमध्ये बटाट्याचा किस आणि न भिजवलेले साबुदाणे घेऊन ते एकत्रित करून ३ ते ४ वेळा पाण्याने स्वच्छ धुवून घ्यावेत. ३. साबुदाणा व बटाट्याचा किस एकत्रित धुवून घेतल्यांनंतर त्यातील पाणी संपूर्णपणे काढून मिश्रण एका बारीक जाळीच्या गाळणीत काढून पाणी निथळवून घ्यावेत. 

Maharashtrian Alu Vadi Recipe: अस्सल मराठी चवीची पारंपरिक अळूवडी करायची आहे? ‘हे’ घ्या परफेक्ट प्रमाण...

४. एका मोठ्या बाऊलमध्ये साबुदाणा व बटाट्याचा किस ओतून घ्यावा. मग त्यात बारीक चिरलेल्या हिरव्या मिरच्या, शेंगदाण्याचं कूट, चवीनुसार मीठ, राजगिऱ्याच पीठ असे सगळे जिन्नस घालून साबुदाणा वड्यासाठीचे पीठ तयार करून घ्यावे. ५. आता इडली पात्र घेऊन त्याला बोटाने तेल व्यवस्थित पसरवून लावावे. त्यानंतर तयार पिठाचे गोलाकार साबुदाणे वडे तयार करून घ्यावेत. तेल लावून ग्रीस केलेल्या इडली पात्रात प्रत्येकी एक एक साबुदाणा वडा ठेवावा. ६. मग इडली वाफवतो अगदी त्याचप्रमाणे इडली पात्रात हे साबुदाणा वडे १० ते १५ मिनिटे वाफवून घ्यावेत. साबुदाणे वडे वाफवल्यानंतर ते पूर्णपणे थंड होऊ द्यावेत. साबुदाणे वडे पूर्ण थंड झाल्यानंतर नेहमीप्रमाणे तेलात दोन्ही बाजूने खरपुस तळून घ्यावेत.  

साबुदाणे न भिजवता देखील अगदी झटपट खरपूस, खमंग असे साबुदाणे वडे खायला तयार आहेत.

टॅग्स :अन्नपाककृतीकुकींग किचन टिप्स आणि ट्रिक्स.किचन टिप्सआषाढी एकादशी २०२५