उकडीचे, तळणीचे, सुक्या मेव्याचे, चॉकलेटचे, नाना तऱ्हेचे मोदक या दहा दिवसात करून झाले असतील तर आता घरच्याच साहित्यातून झटपट करता येतील असे शाही मोदक ट्राय करा. बाप्पाला अनंत चतुर्दशीला(Anant Chaturdashi 2025) निघताना प्रवासाची शिदोरी म्हणून हे मोदक केले तर बाप्पा तर खुश होईलच आणि घरचेही खुश होतील हे नक्की. चला तर पाहू साहित्य आणि रेसेपी.
साहित्य : काजू, बदाम, पिस्ता, खजूर, दूध, तूप, मिल्क पावडर, भाजलेले शेंगदाणे, डेसिकेटेड कोकोनट, मोदकाचा साचा
कृती :
>> सर्वप्रथम मिक्सरच्या भांड्यात १०-१२ बदाम, ५-६ पिस्त्याचे काप, १०-१२ काजू, ५-६ खजूर, मूठभर भाजलेले शेंगदाणे भरडून घेतले, तेच मोदकाचे सारण!
>> त्यानंतर मिक्सरच्या भांड्यात अर्धा कप मिल्क पावडर, अर्धा कप डेसिकेटेड कोकोनट, पाव कप साखर, ५-६ काजू घालून ३-४ वेळा भरडून पावडर करून घ्यायची.
>> तयार मिश्रणात वरील साहित्य मोजून घेतलेल्या कपानेच दोन कप तापवून गार केलेले दूध घालावे आणि मिश्रण मिक्सर मधून फिरवून घ्यावे.
>> एका पॅनमध्ये दोन चमचे तुपावर पातळ मिश्रण मंद आचेवर आटवून घ्यावे.
>> मिल्क पावडरमुळे मिश्रण आळायला वेळ लागत नाही, लवकर घट्ट होतं.
>> ५-६ मिनिटात मिश्रणाचा गोळा तयार होतो.
>> मिश्रण पूर्णपणे थंड करून घ्यावे आणि नंतर मोदकाच्या साच्याला तुपाचे बोट लावून मिश्रण आत टाकावे.
>> मोदकाची पारी दाबून घेतली की त्याच साच्यात सुका मेव्याचे सारण भरावे आणि तयार मिश्रणाची पारी तळाला लावून मोदक पूर्ण करावा.
>> तुपाचे बोट लावल्याने मोदक अलगद निघतात.
पहा पल्लवी मराठी किचनचा शाही मोदक व्हिडीओ :