lokmat Supervote 2024
Lokmat Sakhi >Food > घसा खवखवतो म्हणून अळूच्या वड्या करणंच सोडलंय ?? मग ही रेसिपी करून बघाच !

घसा खवखवतो म्हणून अळूच्या वड्या करणंच सोडलंय ?? मग ही रेसिपी करून बघाच !

'अळू वड्या आणि अळूची भाजी या दोन्ही गोष्टी आमच्या घरी खूप आवडतात. पण अळूची वडी खाल्ली की, घसाच खवखवायला लागतो. त्यामुळे मागील काही वर्षांपासून आम्ही आवडत असूनही अळू आणणंच बंद केलंय' असे काही जणींचे म्हणणे आहे. तुमचाही हाच अनुभव असेल, तर अळूची वड्यांची आणि भाजीची ही रेसिपी नक्की ट्राय करून बघा. घसा खवखवणार तर नाहीच पण ज्यांना आवडत नव्हती, त्यांनाही ही वडी आणि भाजी आवडू लागेल.

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 14, 2021 05:23 PM2021-06-14T17:23:43+5:302021-06-14T17:37:00+5:30

'अळू वड्या आणि अळूची भाजी या दोन्ही गोष्टी आमच्या घरी खूप आवडतात. पण अळूची वडी खाल्ली की, घसाच खवखवायला लागतो. त्यामुळे मागील काही वर्षांपासून आम्ही आवडत असूनही अळू आणणंच बंद केलंय' असे काही जणींचे म्हणणे आहे. तुमचाही हाच अनुभव असेल, तर अळूची वड्यांची आणि भाजीची ही रेसिपी नक्की ट्राय करून बघा. घसा खवखवणार तर नाहीच पण ज्यांना आवडत नव्हती, त्यांनाही ही वडी आणि भाजी आवडू लागेल.

Alu vadi traditional maharastrian food receipe | घसा खवखवतो म्हणून अळूच्या वड्या करणंच सोडलंय ?? मग ही रेसिपी करून बघाच !

घसा खवखवतो म्हणून अळूच्या वड्या करणंच सोडलंय ?? मग ही रेसिपी करून बघाच !

Highlightsअळूच्या पानांमध्ये बीटा कॅरोटिन, फॉलेट, रिबोफ्लोवीन अणि थायमिन तसेच झिंक, मॅग्नेशियम, कॉपर, आयर्न मोठ्या प्रमाणावर असते. अळूची पाने चिरताना कधीकधी हातांनाही खाज सुटल्यासारखे होते. त्यामुळे ही भाजी चिरण्याआधी हाताला चिंचेचे पाणी किंवा लिंबू लावून घ्यावे.

अस्सल महाराष्ट्रीयन पदार्थ म्हणून अळू ओळखला जातो. गौरी- गणपती किंवा इतर सणांना अनेक घरांमध्ये आवर्जून अळूवडी केली जाते. आता तर वर्षभर अळू मिळतो. पण तरीही पावसाळ्यातच अळू खावा, असे सांगितले जाते. आरवी किंवा धोपा या नावानेही अळू ओळखली जाते. महाराष्ट्रात  जवळपास सगळ्याच भागात पावसाळ्याच्या दिवसात अगदी सहजपणे अळू मिळते. 
अळूची पाने आपल्या बागेतल्या छोट्या कुंडीतही अगदी उत्तमप्रकारे वाढू शकतात. अळूच्या पानांमध्ये कॅल्शियम ऑक्झिलेट रेफॉईड्स असते. त्यामुळे बऱ्याचदा अळूची वडी किंवा भाजी खाल्ली की घसा खवखवतो.

 

अळू खाल्ल्याने होणारे फायदे
१. अळूच्या पानांमध्ये कॅल्शियम, मॅग्नेशियम, पोटॅशियम मोठ्या प्रमाणावर असते.
२. अळूची पाने व्हिटॅमिन ए, बी आणि सी यांचा मोठा स्त्रोत आहेत. 
३. नजर चांगली होण्यासाठी आळूच्या पानांपासून बनविलेले पदार्थ खाण्याचा सल्ला डॉक्टर देतात.
४. पचनासंबंधीचे विविध विकार, सांधेदुखी दुर करण्यासाठी आळूची भाजी किंवा वड्या खाव्यात.
५. अळूच्या पानांमध्ये फायबर मोठ्या प्रमाणात असते. त्यामुळे वजन नियंत्रणात ठेवण्यासाठी अळू आवर्जून खावा.
६. अळूची पाने आणि कंद यामध्ये असणाऱ्या पदार्थांमुळे कशाचीही ॲलर्जी होत नाही. त्यामुळे आजारी माणसांनाही अळू खाण्याचा सल्ला दिला जातो. 

 

अळुच्या पानांची वडी करण्याची कृती
साहित्य

  • शिरा काढून टाकलेली अळूची पाने
  • चिंचेचा कोळ
  • गुळ
  • तिखट
  • मीठ
  • गोडा मसाला
  • धने- जिरे पावडर
  • अद्रक- लसून पेस्ट
  • कोथिंबीर
  • बेसन 

 

डोकेदुखीसह अनेक आजारांना पळवून लावणारी रानभाजी करटोली, ही भन्नाट रेसिपी करून तर बघा...https://www.lokmat.com/sakhi/food/try-yummy-receipe-vegetable-kartoli-a602/

कृती
१. सगळ्यात आधी तुम्हाला जेवढ्या वड्या करायच्या आहेत, तेवढे पीठ घ्या. 
२. पिठामध्ये वरील सर्व मिश्रण टाका आणि पाणी टाकून पीठ भजे करताना भिजवतो, तसे सैलसर भिजवून घ्या. 
३. भिजवलेले पीठ थोडे हातावर घ्या आणि एका ताटावर पसरवा.
४. या पीठावर अळूचे पान पसरवा व पानावरून पुन्हा पिठाचा हात फिरवा.
५. आता एका टोकाने सुरूवात करून अळूचे पान तळहाताने गोल- गोल फिरवत त्याचा रोल करा. 
६. अशा पद्धतीने सगळी पाने केली, की ती वाफेवर चांगली शिजवून घ्या.
७. नंतर त्याचे तुम्हाला आवडतील त्याप्रमाणात बारीक काप करा आणि या वड्या तळून घ्या. वड्या तव्यावर तेल टाकून शॅलोफ्राय केल्या तरी चालतात. 
 

Web Title: Alu vadi traditional maharastrian food receipe

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.