Lokmat Sakhi >Food > मिक्सरशिवाय १० मिनिटांत करा आमरस - झटपट रस काढण्याची पाहा एक भन्नाट ट्रिक...

मिक्सरशिवाय १० मिनिटांत करा आमरस - झटपट रस काढण्याची पाहा एक भन्नाट ट्रिक...

Aamras Without Blender : Aamras without Mixer : Traditional way of making Aamras without mixer : How To Make Aamras without Mixer Grinder : आमरस तयार करण्याची ही वेगळी पद्धत कोणती ते पाहा...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 1, 2025 15:42 IST2025-05-01T15:26:48+5:302025-05-01T15:42:39+5:30

Aamras Without Blender : Aamras without Mixer : Traditional way of making Aamras without mixer : How To Make Aamras without Mixer Grinder : आमरस तयार करण्याची ही वेगळी पद्धत कोणती ते पाहा...

Aamras Without Blender Aamras without Mixer Traditional way of making Aamras without mixer How To Make Aamras without Mixer Grinder | मिक्सरशिवाय १० मिनिटांत करा आमरस - झटपट रस काढण्याची पाहा एक भन्नाट ट्रिक...

मिक्सरशिवाय १० मिनिटांत करा आमरस - झटपट रस काढण्याची पाहा एक भन्नाट ट्रिक...

उन्हाळ्यात येणारा आंब्याचा सिझन (Aamras Without Blender) सगळ्यांच्याच आवडीचा. पिवळाधम्मक, गोड चवीचा आंबा खाण्याचा आनंद काही औरच असतो. या दिवसांत आंबा तर आपण खातोच, सोबतच आंब्याचे (Aamras without Mixer) वेगवेगळे पदार्थ देखील घरोघरी तयार केले जातात. आंब्याच्या पदार्थांच्या (Traditional way of making Aamras without mixer) यादीतील सगळ्यात आवडीचा पदार्थ म्हणजे आमरस. उन्हाळ्यात थंडगार आमरस खाण्याचे सुखः म्हणजे, याचे शब्दांत वर्णन करता येऊ शकत नाही(How To Make Aamras without Mixer Grinder).

या आंब्याच्या सिझनमध्ये घरोघरी आमरस पुरीचा बेत तर नक्की होतोच. अशावेळी आमरस तयार करण्यासाठी आपण शक्यतो आंब्याच्या फोडी करून त्याचा गर काढून थेट मिक्सरला लावून आमरस तयार करतो. परंतु अशा पद्धतीने आमरस केल्यास त्याची चव फारशी चांगली लागत नाही. यासाठीच, यंदा आपण नेहमीच्यापेक्षा थोडी वेगळी पद्धत वापरुन आमरस तयार करू शकतो. मिक्सरमध्ये आंब्याचा गर घालून केलेला आमरस कधी पातळ होतो तर कधी त्यात गुठळ्या राहतात. यासाठीच, आमरस तयार करताना मिक्सर न वापरता एका साध्यासोप्या नव्या पद्धतीने आमरस नक्की ट्राय करुन पाहा. आमरस तयार करण्याची ही वेगळी पद्धत कोणती ते पाहूयात.   

साहित्य :- 

१. वेलची पूड - १/२ टेबलस्पून 
२. साखर - चवीनुसार 
३. आंबे - गरजेनुसार
४. केशर - ४ ते ५ काड्या 

आंब्याचं रायतं करण्याची कोकणातील पारंपरिक रेसिपी, आंबट-गोड-तिखट चवीचा अप्रतिम पदार्थ...


फक्त १० मिनिटांत करा आंब्याचा मऊ - लुसलुशीत शिरा, एकदा कराल टेस्ट तर म्हणाल बेस्ट...

कृती :- 

१. सगळ्यांतआधी आंबे स्वच्छ धुवून, आंब्याच्या मोठ्या फोडी होतील असा आंबा कापून घ्यावा. 
२. आता आपण पुऱ्या तळण्यासाठी जो झारा वापरतो त्या मोठ्या झऱ्याच्या मदतीने या आंब्याच्या फोडीतील रस काढून घ्यावा. 
३. मोठा जाळीदार झारा हातात धरून त्यात आंब्याच्या फोडी हलकेच हाताने दाब देत रस आणि आंब्याचा गर बाऊलमध्ये काढून घ्यावा. 
४. सगळ्या आंब्याचा रस आणि गर काढल्यावर चमच्याच्या मदतीने सगळे मिश्रण हलकेच दाब देत हलवून गुठळ्या मोडून घ्याव्यात. 

पनीर तळल्यानंतर रबरासारखे चिवट होते? १ साधीसोपी ट्रिक - तळल्यानंतरही पनीर राहील मऊमुलायम...

५. आता एक मोठी, बारीक जाळीदार गाळणी घेऊन त्यात हा सगळा रस ओतून पुन्हा एकदा चमच्याने हलकेच दाब देत हा रस गाळणीतून गाळून घ्यावा. 
६. आता वेलची आणि साखर एकत्रित खलबत्त्यात कुटून त्याची बारीक पूड करून घ्यावी. हे मिश्रण तयार आंब्याच्या रसात घालूंन चमच्याने हलवून घ्यावे. 
७. तयार आमरस वाटीत भरून खाण्यासाठी सर्व्ह करावा. सर्व्ह करताना वरून केशराच्या काड्या भुरभुरवून घालाव्यात.     

अशाप्रकारे आपण मिक्सरमध्ये आमरस तयार न करता, या सोप्या पद्धतीने देखील तितकाच चविष्ट आणि सुरेख आमरस करु शकतो. 

Web Title: Aamras Without Blender Aamras without Mixer Traditional way of making Aamras without mixer How To Make Aamras without Mixer Grinder

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.