Daily Top 2Weekly Top 5
Lokmat Sakhi >Food > तेलाशिवाय करता येते एकदम चविष्ट सूप - पौष्टिक भोपळा जर आवडत नसेल तर या पद्धतीने खाऊन पाहा

तेलाशिवाय करता येते एकदम चविष्ट सूप - पौष्टिक भोपळा जर आवडत नसेल तर या पद्धतीने खाऊन पाहा

A delicious soup that can be made without oil - If you don't like nutritious pumpkin, try eating it this way : भोपळ्याचे असे सूप नक्कीच आवडेल. एकदा करुन पाहा.

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 8, 2025 12:54 IST2025-12-08T12:53:16+5:302025-12-08T12:54:30+5:30

A delicious soup that can be made without oil - If you don't like nutritious pumpkin, try eating it this way : भोपळ्याचे असे सूप नक्कीच आवडेल. एकदा करुन पाहा.

A delicious soup that can be made without oil - If you don't like nutritious pumpkin, try eating it this way | तेलाशिवाय करता येते एकदम चविष्ट सूप - पौष्टिक भोपळा जर आवडत नसेल तर या पद्धतीने खाऊन पाहा

तेलाशिवाय करता येते एकदम चविष्ट सूप - पौष्टिक भोपळा जर आवडत नसेल तर या पद्धतीने खाऊन पाहा

थंडीच्या दिवसात गरमागरम काहीतरी खायची इच्छा होते. तसेच फक्त चहा - कॉफी नाही तर गरम सूप प्यायची इच्छाही होतेच. सूप हा पदार्थ पौष्टिकही असतो. अनेक प्रकारची सूप करता येतात. पण कधी भोपळ्याचे सूप प्यायले आहे का ? करायला अगदी सोपे असते आणि चवीलाही मस्त लागते. (A delicious soup that can be made without oil - If you don't like nutritious pumpkin, try eating it this way)शिवाय तेल न वापरता करता येते. त्यामुळे नक्की करुन पाहा. ही रेसिपी थंडीसाठी खास आहे. लहान मुलांनाही द्या. त्यांना कळणारही नाही की भोपळा खात आहेत. एवढी छान चव ते ही तेलाशिवाय. 

साहित्य 
भोपळा, गाजर, कांदा, पाणी, आलं, लसूण, कोथिंबीर, काजू, दालचिनी, तमालपत्र, मीठ, लिंबू, काळिमिरी पूड

कृती
१. पिवळा ताजा भोपळा घ्यायचा. त्याची साले काढून टाकायची. बिया काढायच्या आणि त्याचे तुकडे करुन घ्यायचे. तसेच गाजरही छान सोलून घ्यायचं. कांदा सोलायचा आणि त्याचेही तुकडे करुन घ्यायचे. लसणाच्या काही पाकळ्या सोलून घ्यायच्या.

२. एका कुकरच्या भांड्यात भोपळ्याचे तुकडे घ्यायचे. त्यात गाजराचे तुकडेही घालायचे. तसेच लसणाच्या काही पाकळ्या घालायच्या. आल्याचा लहान तुकडा घालायचा. काजू घालायचे. थोडी निवडलेली स्वच्छ ताजी कोथिंबीर घालायची. थोडे मीठ घालायचे. एक तमालपत्र घालायचे. तसेच दालचिनीचा तुकडा घालायचा. त्यात पाणी घालायचे. कुकर लावायचा आणि शिट्या काढून घ्यायच्या. भाज्या मस्त शिजवायच्या. 

३. कुकर उघडला की सगळ्या भाज्या गार होऊ द्यायच्या. एका मिक्सरच्या भांड्यात घ्यायच्या. त्यातून दालचिनी आणि तमालपत्र काढून घ्यायचे. एकजीव पेस्ट तयार करुन घ्यायची. छान मध्यम घट्ट अशी पेस्ट तयार करायची. एका कढईत किंवा पॅनमध्ये तयार मिश्रण गाळून घ्यायचे. त्यात गरजेनुसार पाणी घालायचे. तसेच मीठ घालायचे आणि मग आवडीनुसार काळीमिरी पूड घालायची. लिंबाचा रस घालायचा. ढवळायचे आणि एक उकळी काढायची. फार चविष्ट लागते. नक्की करुन पाहा. 

Web Title : स्वादिष्ट, तेल-मुक्त कद्दू सूप रेसिपी: स्वस्थ और बनाने में आसान।

Web Summary : इस सर्दी में स्वस्थ, तेल-मुक्त कद्दू सूप का आनंद लें! यह कद्दू, गाजर और मसालों के साथ बनाना आसान है। बच्चों को पता भी नहीं चलेगा कि वे इस स्वादिष्ट सूप में कद्दू खा रहे हैं। ठंडे दिनों के लिए एक उत्तम, पौष्टिक विकल्प।

Web Title : Delicious, oil-free pumpkin soup recipe: Healthy and easy to make.

Web Summary : Enjoy this healthy, oil-free pumpkin soup this winter! It's simple to prepare with pumpkin, carrots, and spices. Kids won't even realize they're eating pumpkin in this tasty soup. A perfect, nutritious option for cold days.

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.