Join us

गूळ तूप फुटाणे लाडू ताकदीचा सुपरडोस, ५ मिनिटात होणारा पौष्टिक लाडू खा रोज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 2, 2025 11:22 IST

A delicious laddu will keep you healthy, make this dish with chana and jaggery, especially for women : हा लाडू महिलांसाठी औषधच. पाहा कसा करायचा.

गूळ, तूप आणि चणे यांचा लाडू किंवा वडी हा महिलांसाठी रोजच्या आहारातला एक छोटा पण अत्यंत फायद्याचा पदार्थ ठरु शकतो. आपल्या पारंपरिक पद्धतीत हे तीनही घटक स्त्रियांच्या आरोग्यासाठी उत्तम मानले जातात. (A delicious laddu will keep you healthy, make this dish with chana and jaggery, especially for women)गुळामध्ये भरपूर लोह असते ज्यामुळे रक्तवाढ होते, थकवा आणि अशक्तपणा कमी होतो. मासिक पाळीच्या काळात होणारा त्रास टाळण्यासाठी गूळ खूप उपयुक्त ठरतो. तूप पचनशक्ती सुधारते, शरीरातील उष्णता संतुलित ठेवते आणि हार्मोन्सची कार्यप्रणाली व्यवस्थित ठेवण्यास मदत करते.

चणे प्रथिने, कॅल्शियम, मॅग्नेशियम आणि फायबरने समृद्ध आहेत. त्यामुळे हाडांची मजबुती, स्नायूंचे आरोग्य आणि पोटाचा ताण कमी करणे असे फायदे चण्यांमधून मिळतात. स्त्रियांमध्ये हाडे कमकुवत होण्याचा धोका जास्त असतो, त्यासाठी चणे खूप उपयोगी ठरतात. गूळ, तूप आणि चणे एकत्र केल्यावर तो पदार्थ शरीराला ऊर्जा देतो आणि दिवसभर काम करण्याची ताकद टिकवतो.

हार्मोन्सचे संतुलन राखणे हे महिलांच्या आरोग्यासाठी फार महत्त्वाचे आहे. पाळी अनियमित होणे, मूड स्विंग्स, थकवा किंवा त्वचेवरील बदल ही लक्षणे बहुतेक हार्मोन्सच्या असंतुलनामुळे होतात. गुळामधील खनिजे, तुपातील सत्त्व आणि चण्यातील प्रथिने हे तिन्ही मिळून हार्मोन्सना नैसर्गिक आधार देतात. त्यामुळे हा लाडू किंवा वडी रोज एक खाल्यास महिलांच्या शारीरिक तसेच मानसिक आरोग्यासाठी फायदेशीर ठरते.

साहित्य तूप, गूळ, चणे 

कृती१. एका कढईत दोन ते तीन चमचे तूप घ्यायचे. तूप जरा गरम झाल्यावर त्यात बारीक किसलेला गूळ घाालायचा. गूळ छान किसणे महत्वाचे म्हणजे त्याचा पाक पटकन होतो. गुळाचा पाक झाल्यावर तो ढवळायचा. नंतर त्यात चणे घालायचे. चण्याची सालं काढून घ्यायची. मगच चणे वापरायचे. 

२. त्यात वरतूनही थोडे तूप घालायचे आणि मिश्रण घट्ट होईपर्यंत ढवळायचे. पाच ते सात मिनिटात मिश्रण तयार होते. मग एका ताटाला थोडे तूप लावा आणि त्यावर मिश्रण कोमट असतानाच ओता. छाव पसरवून घ्या. त्याच्या वड्या पाडा. किंवा हाताला तूप लावा आणि लहान गोळे वळून लाडू तयार करा. 

English
हिंदी सारांश
Web Title : Jaggery-chickpea laddu: A daily treat for women's health.

Web Summary : Jaggery, ghee, and chickpea laddu benefits women's health, providing iron, improving digestion, and strengthening bones. It balances hormones, boosts energy, and supports overall well-being, making it a nutritious daily treat.
टॅग्स :अन्नपाककृतीकुकींग किचन टिप्स आणि ट्रिक्स.किचन टिप्सआहार योजनामहिलामासिक पाळी आणि आरोग्य