चिकू हे मऊ, गोड आणि पोषणाने भरलेले फळ आहे. पचायला हलके, ऊर्जा देणारे आणि वर्षभर उपलब्ध असल्यामुळे ते दैनंदिन आहारात सहज खाऊ शकतो. छोटंसं दिसणारं हे फळ शरीराला अनेक प्रकारे फायदा देतं. चिकूमध्ये नैसर्गिक साखर भरपूर असते, त्यामुळे थकवा कमी होतो आणि शरीराला ऊर्जा मिळते. चिकू हे फळ त्वरित ऊर्जा देते. त्यामुळे ते जवळ बाळगणे फायद्याचे ठरेल. (A delicious and creamy chikoo milkshake can be nutritious. Just make it this way, check out a slightly different recipe.)यात असलेले फायबर पचन नीट ठेवतात, बद्धकोष्ठतेची समस्या कमी करतात तसेच पोट शांत ठेवतात. चिकूमधील टॅनिन ही संयुगं शरीरातील सूज कमी करण्यास मदत करतात आणि जंतुसंसर्गांपासून संरक्षण करतात. रोगप्रतिकार शक्ती वाढवण्यासाठी त्याचा फायदा होतो.
या फळात व्हिटॅमिन सी असते, जे त्वचेची चमक टिकवून ठेवते. तसेच जंतूप्रतिबंधक शक्ती मजबूत करते आणि शरीरातील पेशींचे संरक्षण करते. व्हिटॅमिन ए डोळ्यांच्या आरोग्यासाठी उपयुक्त आहे. याशिवाय चिकूत कॅल्शियम, फॉस्फरस, लोह, मॅग्नेशियम आणि पोटॅशियम यांसारखी खनिजे असतात, जी हाडांना, नखे–केसांना आणि स्नायूंना बळकटी देतात.
चिकूत मन किंवा शरीर दाह कमी करणारे गुणधर्म असतात. थकवा, तणाव आणि चिडचिड कमी करण्यासाठी तो उपयुक्त मानला जातो. मुलांसाठी तर चिकू एक चांगला स्नॅक आहे कारण तो सहज पचतो आणि शरीराला ऊर्जा देतो. त्यातील अँटी ऑक्सिडंट्स शरीरातील हानिकारक घटकांपासून संरक्षण करतात आणि पेशी सुरक्षित ठेवतात. चिकू मिल्कशेक तर नक्कीच आवडीने पित असाल. हा शेक जरा वेगळ्या पद्धतीने केला तर त्याचे पोषण वाढते आणि चवही.
साहित्य
चिकू, दूध, खजूर
कृती
१. चिकूच्या बिया काढून घ्यायच्या. खजूराच्याही बिया काढून घ्यायच्या. चिकू चांगला पूर्ण पिकलेला आणि नरमच घ्यायचा. तरच त्याची चव छान येते.
२. चिकू आणि खजूर मिक्सरमधून फिरवायचे आणि त्याची पेस्ट करायची. त्यात दूध घालायचे आणि पुन्हा एकदा मिक्सर फिरवायचा. छान घट्टसर चिकूशेक तयार होतो.
साखरेऐवजी खजूर वापरल्याने तो जास्त पौष्टिक होतो. चमचाभर साखर चार ते पाच चिकूंचे पोषण आरामात कमी करु शकते आणि वजनही वाढवते. त्यामुळे साखर वापरण्यापेक्षा या पद्धतीने शेक करुन पाहा.
