धावपळीच्या जीवनात कमी वेळात पौष्टिक अन्न मिळणं गरजेचं झालं आहे. पटकन करता येणारे पौष्टिक नसते आणि झटपट होणारे किंवा पॅकेट फूड आरोग्यासाठी चांगले नसते. अशावेळी काही पर्याय असतात जे झटपट करता येतात. आणि पचनासाठी उत्तम असतात. जसे की ओट्स. ओट्स हा पदार्थ अनेकांना चवहीन वाटतो. (5 things that makes oats tasty, your diet will be delicious - see what you can cook with oats.)तो खाण्याची इच्छाच होत नाही. मात्र ओट्स हे आरोग्यासाठी अत्यंत उपयुक्त ठरणारे आहे. ओट्समध्ये भरपूर फायबर, प्रोटीन, जीवनसत्त्वे आणि खनिजे असतात, त्यामुळे ते रोजच्या आहारात समाविष्ट करणं फायदेशीर ठरतं.
ओट्स खाल्ल्याने पचनसंस्था सुधारते. त्यातील फायबर पोट भरलेलं ठेवायला मदत करतं आणि बद्धकोष्ठतेचा त्रास कमी होतो. नियमित ओट्स खाल्ल्याने रक्तातील साखरेची पातळी नियंत्रणात राहण्यास मदत होते, त्यामुळे मधुमेह असणाऱ्यांसाठीही ते योग्य ठरतात. हृदयाच्या आरोग्यासाठी ओट्स फार उपयोगी आहेत. ओट्समधील बीटा-ग्लुकान फायबर कोलेस्टेरॉल कमी करण्यास मदत करतं. त्यामुळे हृदयरोगाचा धोका कमी होतो आणि रक्तवाहिन्या निरोगी राहतात. वजन नियंत्रणात ठेवायचं असेल तर ओट्स हा उत्तम पर्याय आहे. डाएटमध्ये ओट्स असण्याचा मोठा फायदा म्हणजे ते लवकर भूक भागवतात आणि लगेच परत लागू देत नाहीत. ओट्स खाल्ल्यावर पोट जास्त वेळ भरलेले राहते, त्यामुळे अनावश्यक खाणं टाळता येतं. कमी कॅलरी असूनही ओट्स शरीराला आवश्यक ऊर्जा देतात, त्यामुळे डाएट करताना थकवा जाणवत नाही.
ओट्स वापरण्याचे मार्गही खूप सोपे आणि वेगवेगळे आहेत. सकाळी दूध किंवा पाण्यात शिजवलेले ओट्स खाता येतात. भाज्या घालून चविष्ट ओट्स उपमा करता येतो किंवा दही घालून थंड ओट्स तयार करता येतात. पीठ करुन ओट्सची पोळी, डोसा किंवा पॅनकेक करणंही अगदीच सोपं आहे. ओट्सपासून अनेक चविष्ट पदार्थ करता येतात. ओट्स खीर, ओट्स कटलेट, ओट्स भेळ, ओट्स खिचडी किंवा ओट्स सूप हे पदार्थ चवीला छान लागतात आणि पोटालाही हलके पडतात. गोड खाण्याची इच्छा असेल तर फळं आणि मध घालून ओट्सचा स्वीट बाऊल तयार करता येतो. एकूणच ओट्स हे आरोग्यदायी, पचायला हलके आणि बहुपयोगी धान्य आहे. वजन कमी करायचं असो, पचन सुधारायचं असो किंवा दिवसाची सुरुवात पौष्टिक करायची असो ओट्स प्रत्येकासाठी फायदेशीर ठरतात. रोजच्या आहारात योग्य प्रमाणात ओट्सचा समावेश केल्यास शरीर निरोगी आणि ऊर्जावान राहते.
Web Summary : Oats are a quick, nutritious food, rich in fiber, protein, and vitamins, aiding digestion and controlling blood sugar. They benefit heart health by lowering cholesterol and assist in weight management by promoting fullness. Enjoy oats in various forms like upma, porridge, or even pancakes for a healthy, energetic lifestyle.
Web Summary : ओट्स एक त्वरित, पौष्टिक भोजन है, जो फाइबर, प्रोटीन और विटामिन से भरपूर होता है, पाचन में सहायता करता है और रक्त शर्करा को नियंत्रित करता है। वे कोलेस्ट्रॉल को कम करके हृदय स्वास्थ्य को लाभ पहुंचाते हैं और तृप्ति को बढ़ावा देकर वजन प्रबंधन में सहायता करते हैं। स्वस्थ, ऊर्जावान जीवनशैली के लिए ओट्स को उपमा, दलिया या यहां तक कि पैनकेक जैसे विभिन्न रूपों में आनंद लें।