आपल्याकडे चहाप्रेमींची अजिबात कमी नाहीच. बहुतेकजणांच्या दिवसाची सुरुवात ही चहानेच होते. भारतात चहा हे केवळ एक पेय नाही, तर आपल्या डेली ( healthy alternatives to sugar in tea) रुटीनचा अविभाज्य भाग आहे. काहीजणांना तर अगदी चहाचा घोट घेतल्याशिवाय जमतच नाही. सकाळची सुरुवात असो किंवा संध्याकाळचा थकवा घालवण्याची वेळ असो, अनेकांना साखरेशिवाय चहा अपूर्ण वाटतो. चहा पिणे अनेकांना आवडते, पण त्यात असलेली साखर आरोग्यासाठी चांगली नसते, हे देखील (5 things that can be used as sugar replacement in tea) सर्वांना माहीत आहे. चहातील साखरेमुळे शरीराच्या अनेक समस्या त्रास देतात. मधुमेहाचा धोका आणि वजन (natural sugar substitutes for tea) वाढण्यासारख्या समस्यांमुळे, अनेकजण (best natural sweeteners for tea) साखरेला पर्याय शोधत असतात. चहाला गोडवा येण्यासाठी साखरेऐवजी आपण हेल्दी आणि आरोग्याला हानी होणार नाही असे कोणते पदार्थ घालू शकतो, असे इतर पदार्थ शोधणे आवश्यक असते.
साखरेऐवजी नेमकं काय वापरल्याने चहाची चव चांगली राहील आणि तो अधिक आरोग्यदायी होईल, हा प्रश्न अनेकांना पडतो. साखरेला अनेक नैसर्गिक आणि आरोग्यदायी पर्याय आहेत. या पर्यायांमुळे चहाची गोडी तर टिकून राहीलच, शिवाय तो अधिक पौष्टिकही होईल. चहा गोड करण्यासाठी साखरेपेक्षा अधिक हेल्दी पर्याय वापरणं हे आजच्या काळात गरजेचं झालं आहे. हे पर्याय चहाला नैसर्गिक गोडवा देतात आणि शरीरासाठीही फायदेशीर ठरतात. साखरेऐवजी चहात घालता येणाऱ्या काही नैसर्गिक आणि उत्तम पर्याय कोणते ते पाहूयात...
गोडव्यासाठी साखरेऐवजी चहात घालता येतील असे खास पदार्थ...
१. मध :- चहा गॅसवरून खाली उतरल्यावर त्यात मध मिसळा, जेणेकरून त्यातील पोषक घटक नष्ट होणार नाहीत. मधात अँटी-ऑक्सिडंट आणि अँटी-बॅक्टेरियल गुणधर्म असतात. हे वजन नियंत्रणात ठेवण्यासाठी आणि पचनासाठी देखील फायदेशीर आहे. साखर जितक्या प्रमाणात घालता, त्याच प्रमाणात मध घाला.
२. गूळ :- सध्या गुळाच्या चहाची खूप क्रेझ आहे. गुळामध्ये लोह आणि इतर खनिजे भरपूर प्रमाणात असतात. गुळाच्या चवीमध्ये थोडा फरक नक्कीच जाणवेल, पण तो आरोग्यासाठी साखरेपेक्षा खूपच चांगला आहे. एक गोष्ट लक्षात ठेवा की, गुळ घातल्यानंतर चहा जास्त वेळ उकळवू नका.
३. ज्येष्ठमध :- ज्येष्ठमधाचा वापर आयुर्वेदात खूप वर्षांपासून केला जात आहे. ज्येष्ठमध हे नैसर्गिकरित्या गोड असते आणि खोकला व सर्दी यांसारख्या आजारांपासून आराम मिळतो. आपण दालचिनी आणि लवंगसोबत चहामध्ये ज्येष्ठमध मिसळून हर्बल टी देखील तयार करु शकतो.
४. खजुराचा सिरप :- खजुराचा सिरप खूप घट्ट आणि गोड असतो, त्यामुळे तो कमी प्रमाणातच घाला. यामध्ये फायबर आणि खनिजे असतात, जे ऊर्जा वाढवण्याचे काम करतात. तुम्ही तो ब्लॅक टी किंवा दुधाच्या चहामध्येही वापरू शकता.
५. सुकामेवा :- आपण मनुका आणि खारीक दुधात उकळून चहा बनवू शकता. या पद्धतीने चहा केल्यास सुक्यामेव्यातील पोषक तत्वे चहात उतरतात, यामुळे चहा अधिक पौष्टिक होतो. जर तुम्हाला खूप गोड चहा आवडत नसेल, तर हा एक उत्तम पर्याय आहे.
चहाला गोड करण्यासाठी साखर हा एकमेव पर्याय नाही. मध, गूळ, ज्येष्ठमध, खजूरचा सिरप आणि सुकामेवा हे पाचही पदार्थ तुमचा चहा गोड बनवतीलच, शिवाय तुमच्या आरोग्यालाही नुकसान पोहोचवणार नाहीत.