Join us

कणिक मळताना तळहात पिठाने भरून खूप चिकट होतात? ३ टिप्स- हात राहतील स्वच्छ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 13, 2025 18:59 IST

3 tips to Get Rid Of Sticky Dough On Your Fingers: कणिक मळत असताना हा त्रास जवळपास प्रत्येकीलाच होतो. तो कसा टाळायचा ते आता पाहूया..(how to remove sticky dough from your hand and palm?)

ठळक मुद्देकणिक मळताना ती हाताला खूपच चिटकून बसते. त्यामुळे मग वैताग येतो आणि पोळ्या करण्याचे कामच नकोसे होते.

काही घरांचे अपवाद सोडले तर बहुतांश घरांमध्ये स्वयंपाक करण्याचे काम हे त्या घरातली मुख्य स्त्री करत असते. कारण हल्ली प्रत्येकाचेच आरोग्याचे प्रश्न आहेत. त्यामुळे घरातल्या प्रत्येकाचे पथ्यपाणी, आवडीनिवडी सांभाळत त्या हिशोबाने बेताचा स्वयंपाक करणे हे ज्या त्या घरातल्या स्त्रियांनाच अधिक चांगले जमू शकते. त्यामुळेच आता रोजचा स्वयंपाक करायचा म्हणजे रोजच्या पोळ्या आल्याच.. एकवेळ जेवणात वरण, भात, भाजी यापैकी एखादा पदार्थ नसला तरी चालतो. पण पोळ्या मात्र रोजच्यारोज पाहिजेतच.. आता पोळ्या करायच्या म्हणजे कणिक भिजवणे हे एक मोठे काम. अनेक जणींची हीच अडचण असते की कणिक मळताना ती हाताला खूपच चिटकून बसते (3 tips to Get Rid Of Sticky Dough On Your Fingers). त्यामुळे मग वैताग येतो आणि पोळ्या करण्याचे कामच नकोसे होते. तुमचंही असंच होत असेल तर कणिक हाताला चिटकू नये म्हणून काय उपाय करता येतील ते पाहूया..(how to remove sticky dough from your hand and palm?)

 

कणिक मळताना पीठ हाताला चिटकून बसू नये म्हणून..

१. थंड पाणी वापरा

कणिक मळताना जर तुम्ही कोमट पाणी किंवा रुम टेम्परेचरचं पाणी वापरत असाल तर यामुळे गव्हाच्या पीठात असणारं ग्लुटेन लवकर ॲक्टीव्ह होऊन कणकेला चिकटपणा येतो. त्यामुळे कणिक भिजवण्यासाठी थोडं थंड पाणी वापरावं.

पुरणपोळीचं जेवण जड होऊन अपचन होतं?  ३ उपाय- पुरणपोळीचा अजिबात त्रास होणार नाही

२. कोरड्या पिठाचा वापर

कणिक मळताना नेहमी काेरडं पीठ बाजुला असू द्या. कारण जर तुमचे हात कणकेने भरले असतील तर हाताला चिकटलेली ओलसर कणिक काढून टाकण्यासाठी कोरडं पीठ उपयुक्त ठरतं. कोरडं पीठ हातावर घ्या आणि अलगद चोळून बोटांवर चिकटलेली कणिक काढून टाका.

 

३. तेलाचा वापर

कोरड्या पिठाप्रमाणेच तेलाचा वापर करून सुद्धा हाताला चिकटलेली कणिक काढून टाकता येते. मुळात कणिक हाताला चिटकू नये यासाठीही तेल वापरता येते.

तुमच्या स्वयंपाकघरात आणि हाॅलमध्ये तातडीने ठेवा ‘हे’ जादूई रोप, घरातलं निगेटिव्ह वातावरण बदलेल चटकन

त्यासाठी सगळ्यात आधी तुमच्या हाताला भरपूर तेल लावून घ्या आणि त्यानंतर कणिक मळा. त्यानंतर कणिक मळताना अधूनमधून तेलाचा वापर कराच. यामुळे हाताला कणिक थेट चिटकत नाही. 

 

टॅग्स :अन्नकुकींग किचन टिप्स आणि ट्रिक्स.पाककृतीकिचन टिप्सपाणी