उन्हाळ्याच्या दिवसांत एकतर स्वयंपाक घरात उभं राहून स्वयंपाक करण्याचा प्रचंड कंटाळा येतो. सकाळच्या वेळी लवकर स्वयंपाक झाला तर ठीक. नाहीतर मग घामाच्या अक्षरश: धारा लागतात. त्यातही पोळ्या करण्याचं काम असेल तर मग उकाडा विचारायलाच नको. बरं एवढं करून आपण पोळ्या केल्या आणि त्या डब्यात भरून ठेवल्या की जेवणाच्या वेळेपर्यंत त्या ही घामट, ओलसर होऊन जातात. अशा भिजट पोळ्या खाण्याचीही इच्छा होत नाही. म्हणूनच पुढे सांगितलेले काही उपाय करून पाहा. पोळ्या घामट, भिजट होणार नाहीत.(3 tips so that chapati in tiffin should not get wet)
उन्हाळ्यात डब्यात ठेवलेल्या पोळ्या भिजट होऊ नयेत म्हणून उपाय
१. सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे पोळी पुर्णपणे थंड झाल्याशिवाय डब्यात भरून नका. जेव्हा पोळी व्यवस्थित गार होईल, त्यानंतरच तिची तीन पदरी घडी घाला आणि मग ती डब्यात भरा.
निस्तेज कोरड्या त्वचेला ५ मिनिटांत फ्रेश करण्याचा उपाय- जावेद हबीब सांगतात मस्त ट्रिक
२. एखाद्या स्वच्छ सुती कपड्याचा वापर करा. पोळ्याच्या डब्यात सगळ्यात खाली एक स्वच्छ सुती कपडा घाला. त्यावर पोळ्या ठेवा आणि मग तो कपडा पुन्हा पोळ्यांच्या वर घाला. पोळ्यांमध्ये काही उष्णता असेलच तर ती या कपड्यामुळे शोषून घेतली जाईल. कपड्याच्या ऐवजी तुम्ही एखाद्या टिश्यू पेपरचाही वापर करू शकता.
३. हल्ली एक ट्रिक खूप व्हायरल होत आहे. ती करून बघायलाही हरकत नाही. यासाठी डब्यामध्ये पोळ्या भरल्यानंतर सगळ्यात वर दाेन ते तीन स्टीलचे चमचे, किंवा एखादी स्टीलची डिश किंवा मग स्टीलची पसरट वाटी असं काहीतरी ठेवायचं. आणि मग डब्याचं झाकण लावायचं. यामुळेही पोळ्या भिजट होत नाही, असं म्हणतात. ट्राय करून पाहा.
Web Summary : Prevent soggy rotis in your lunchbox this summer! Cool completely before packing. Use a cloth or tissue to absorb moisture. Place steel spoons or a dish on top to keep them fresh.
Web Summary : इस गर्मी में अपने लंचबॉक्स में रोटियों को नरम होने से बचाएं! पैक करने से पहले पूरी तरह से ठंडा करें। नमी को सोखने के लिए कपड़े या टिश्यू का उपयोग करें। उन्हें ताज़ा रखने के लिए ऊपर स्टील के चम्मच या एक डिश रखें।