लसुण चटणी सगळ्यांनाच प्रचंड आवडते. महाराष्ट्रात इतरही वेगवेगळ्या पौष्टिक चटण्या तयार केल्या जातात. (3 simple types of chutneys, 10 minute recipes )पौष्टिक आणि चविष्ट असं सोपं गणित जुळवून आणायचं असेल तर, चटणी एकदम योग्य मार्ग आहे. या चटण्या तयार तर अगदी झटपट होतात. मोजून दहा मिनिटात तयार करता येण्यासारख्या ३ चविष्ट आणि पौष्टिक चटण्यांच्या रेसिपी पाहूया.(3 simple types of chutneys, 10 minute recipes )प्रत्येकाची चटणी तयार करायची पद्धत वेगळी असू शकते.
१. जवसाची चटणी(3 simple types of chutneys, 10 minute recipes )
जवसाला आळशी देखील म्हटले जाते.
साहित्य:
जवस, लसूण, लाल मिरची, पांढरे तीळ, चणाडाळ(डाळं), जीरं, कडीपत्ता, सुकं खोबरं, मीठ
कृती:
१.जवस मस्त परतून घ्या. त्यात काहीही न घालता ते परता. थोडा रंग बदलला की गॅसवरून उतरवा.
२. लसूणही परतून घ्या. नुसतीच परता. त्यात काही घालू नका. थोडी परतली की त्यात लाल मिरची, पांढरे तीळ, चणाडाळ(डाळं), जीरं, कडीपत्ता, सुक खोबरं, मीठ घाला. अगदी थोडावेळ सगळं परतून घ्या.
३. आता सगळं मिश्रण गार होऊ द्या. ते गार झाल्यावर मिक्सरमधून वाटून घ्या. त्याची पावडर तयार होईल एवढंच वाटा.
२. कारळ्याची चटणी
साहित्य:
कारळे, लसूण, लाल तिखट, मीठ
कृती:
१. कारळं मस्त परतून घ्या. तेल वापरू नका. नुसतंच परता. ते व्यवस्थित परतले गेले की गार करत ठेवा.
२. मिक्सरच्या भांड्यात लसणाच्या काही पाकळ्या, लाल तिखट आणि मीठ घाला. त्यात गार झालेले कारळे घाला. आता सगळ्याची पावडर तयार करुन घ्या.
३. पांढर्या तीळाची चटणी
साहित्य:
तीळ, सुकं खोबरं, जीरं, लसूण, लाल तिखट, हिंग, मीठ
कृती:
१. तीळ चांगले परतून घ्या. तडतडतील तो पर्यंत परता. नंतर तीळ काढून सुकं खोबरं परता. सोनेरी होईपर्यंत परता.
२. आता एका मिक्सरच्या भांड्यात परतलेले तीळ, खोबरं, लसणाच्या पाकळ्या, लाल तिखट, हिंग, मीठ, जीरं घाला. आणि ते सगळं जाडसर वाटून घ्या.
तिन्ही चटण्या भाताबरोबर, पोळीबरोबर खायला मस्त लागतात. त्यात तेलही नाही आणि अनहेल्दी काहीच नाही. बरेच महिने या चटण्या टिकतात.