lokmat Supervote 2024
Lokmat Sakhi >Food > कुल्हडमध्ये  चहा पिण्याचे 3 फायदे, आता तर अभ्यासच सांगतात, कुल्हड चहा तब्येतीला का बरा..

कुल्हडमध्ये  चहा पिण्याचे 3 फायदे, आता तर अभ्यासच सांगतात, कुल्हड चहा तब्येतीला का बरा..

कुल्हडमध्ये चहा (kulhad tea) प्याल्यानं केवळ स्वादच वाढतो असं नाही तर आरोग्यासाठीही ते फायदेशीरही असतं.

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 7, 2022 01:55 PM2022-07-07T13:55:48+5:302022-07-07T14:04:53+5:30

कुल्हडमध्ये चहा (kulhad tea) प्याल्यानं केवळ स्वादच वाढतो असं नाही तर आरोग्यासाठीही ते फायदेशीरही असतं.

3 benefits of drinking tea in Kulhad, Studies tell why kulhad tea is best for health? | कुल्हडमध्ये  चहा पिण्याचे 3 फायदे, आता तर अभ्यासच सांगतात, कुल्हड चहा तब्येतीला का बरा..

कुल्हडमध्ये  चहा पिण्याचे 3 फायदे, आता तर अभ्यासच सांगतात, कुल्हड चहा तब्येतीला का बरा..

Highlightsप्लॅस्टिकच्या कपमधून चहा पितांना जिवाणुसंसर्गाचा धोका असतो.मातीच्या कुल्हडमध्ये चहा प्याल्यानं पचनास फायदे होतात. कुल्हडमध्ये चहा पिणं हे आरोग्यासोबतच पर्यावरणासाठीही फायदेशीर असतं. 

सध्या प्लास्टिकच्या कपात चहा पिणं ही खूपच सामान्य बाब झाली आहे.  पण ही सवय आरोग्यास घातक आहे. त्याऐवजी मातीच्या कुल्हडमध्ये (drink tea in kulhad)  चहा पिणं फायदेशीर असल्याचं तज्ज्ञ सांगतात. केवळ चहाच नाही तर दही, ताक, लस्सी कुल्हडमध्ये प्याल्यानं वेगळीच मजा येते. मातीचा आणि चहाचा सुगंध एकत्र होवून मूड फ्रेश होतो. कुल्हडमध्ये चहा प्याल्यानं केवळ स्वादच वाढतो असं नाही तर आरोग्यासाठीही ते फायदेशीर (health benefits of drink tea in kulhad)  असतं.

Image: Google

तज्ज्ञ सांगतात प्लास्टिकच्या कपात चहा प्याल्यानं आरोग्यास घातक जिवाणुंचा संसर्ग होतो. प्लास्टिकच्या कपात गरम चहा ओतला की प्लास्टिकच्या कपातील रासायनिक घटक विरघळून चहामध्ये मिसळतात. यामुळे कॅन्सरसारखे घातक आजार होण्याचा धोका असतो. त्यामुळे आरोग्यास आणि पर्यावरणास फायदेशीर अशा मातीच्या कुल्हडचा वापर चहा पिण्यासाठी करायला हवा, असं तज्ज्ञ सांगतात. 

रिसर्चगेटने प्रकाशित केलेल्या एका संशोधनानुसार मातीच्या भांड्यात जेवणं किंवा चहा/ ताक पिणं आरोग्यासाठी खूप फायदेशीर असतं. मातीच्या भांड्यात स्वयंपाक केल्यास, मातीच्या भांड्याचा वापर जेवणासाठी , पेयं पिण्यासाठी केल्यास मातीच्या भांड्यात साठवल्या गेलेल्या सूक्ष्म पोषण मुल्यांचा फायदा आरोग्यास होतो. आरोग्याचा विचार करता चांदीची, तांब्याची भांडीही आरोग्यास फायदेशीर असतात. पण ती महाग असल्यानं ती सर्वांनाच घ्यायला परवडतील असं नाही. त्याच्या तुलनेत मातीची भांडी परवडणारी असतात आणि आरोग्यास फायदेशीर असतात. 

Image: Google

कुल्हडमध्ये चहा प्याल्यास..

1. मातीमध्ये कॅल्शियमचं प्रमाण भरपूर असतं. त्यामुळे कुल्हडमध्ये चहा प्याल्यास शरीराला कॅल्शियम मिळतं. मातीची भांडी शरीरातील ॲसिडिक प्रवृत्तीची ताकद कमी करतात. कुल्हडमध्ये चहा प्याल्यानं गॅसेस, ॲसिडिटी या समस्या कमी होतात. 

2.  प्लॅस्टिकच्या कपमधून चहा पितांना जिवाणुसंसर्गाचा धोका असतो. काचेचे ग्लास/ कप नीट धुतलेले नसतील तर त्यातूनही आरोग्यास हानिकारक जिवाणुंचा संसर्ग होण्याचा धोका असतोच. पण मातीच्या  भांड्यातून जिवाणुसंसर्ग होत नाही. या पाठीमागे शास्त्रीय कारण आहे. मातीमध्ये असलेल्या ॲण्टिऑक्सिडण्ट गुणधर्मामुळे मातीच्या भांड्यात जिवाणु तयार होत नाही. म्हणूनच कुल्हडमध्ये चहा प्यालानं संसर्ग किंवा ॲलर्जी यासारख्या समस्यांचा धोका नसतो. 

Image: Google

3. मातीच्या कुल्हडमध्ये कोणत्याही प्रकारच्या रासायनिक गोष्टी नसतात. उलट मातीच्या गुणधर्मामुळे  कुल्हडमध्ये चहा प्याल्यानं पचन सुलभ होतं. याउलट प्लास्टिकच्या  कपामध्ये चहा प्याल्यानं पचनाचे विकार संभवतात. 

प्लास्टिकच्या कपात चहा पिणं हे आरोग्यासोबतच पर्यावरणासही घातक असतं. प्लास्टिकच्या कपामुळे निर्माण होणाऱ्या कचऱ्याची विल्हेवाट लावणं ही पर्यावरणीय समस्या होते तर प्राण्यांसाठीही प्लास्टिकचे कप जीवघेणे ठरतात. आरोग्य आणि पर्यावरण यांचा विचार करता म्हणूनच मातीच्या कुल्हडमध्ये चहा पिणं फायदेशीर. फक्त घराबाहेर चहा पिण्यासाठीच नाही तर घरातही कुल्हडमध्ये चहा प्याल्यास आरोग्य तंदुरुस्त राहातं

Web Title: 3 benefits of drinking tea in Kulhad, Studies tell why kulhad tea is best for health?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.