Join us  

Yoga Day 2021:  योगा करण्याआधी, नंतर काय खायचं काय नाही? वेळीच जाणून घ्या मिळेल दुप्पट फायदा

By ऑनलाइन लोकमत | Published: June 18, 2021 3:50 PM

Yoga Day 2021: सकाळी उठल्यानंतर लगेचच योगा करायला हवा. उशीर झाल्यास  ४५ मिनिटं आधी फ्रुट ज्युस किंवा फळांचे सेवन करायला हवं.

ठळक मुद्देजर सकाळी वेळ मिळत नसेल तर तुम्ही संध्याकाळीसुद्धा योगा करू शकता. फक्त रात्रीच्या जेवणाच्या ६० किंवा ९० मिनिटं आधी योगा करायला हवा. लोक योग करण्यासाठी आपल्या मनानुसार वेळ निवडतात. पण योग्य परिणाम दिसून येण्यासाठी सकाळी रिकाम्या पोटी योगा करायला हवा.

आतापर्यंत असं कोणतंही उपकरण तयार झालेलं नाही. ज्याचा वापर करून तुम्ही स्वतःला फिट, निरोगी ठेवू शकता. जर तुम्हाला दीर्घकाळ फिट राहायचं असेल तर तुम्ही व्यायाम करून चांगला आहार घ्यायलाच हवा. पण योगा किंवा व्यायाम करताना लहान लहान गोष्टींची काळजी घेणं गरजेचं असतं. नाहीतर दैनंदिन जीवनातील तुमच्या चूका तुम्हालाच महागात पडू शकतात. योगाचं उदाहरण घ्यायचं झालं तर तर गेल्या काही वर्षांपासून लोकांनी योगा करायला सुरूवात केली आहे. त्याआधी खूपच कमी लोकांना योगाचे महत्व माहीत होते. २१ जून २०२१ (Yoga Day 2021) ला आंतरराष्ट्रीय योगा दिवस साजरा केला जाणार आहे.  योगा करण्यासाठी योग्य वेळ सकाळची सांगितली जाते कारण या वेळात आपण काहीच खाल्लेले नसते. परंतु वेळेअभावी लोक जमेल त्या वेळात योगा करत असतात जे काही प्रमाणात ठीक आहे. 

योगा प्रशिक्षक राजेश तुली लोकमतशी बोलताना सांगितले की, "सकाळी पोट रिकामं असल्यामुळे सकाळच्यावेळी योगा करणं शारीरिकदृष्या फायद्याचं ठरतं. जमत असल्यास  साधारण सकाळी ५:३० ते ६ दरम्यान तुम्ही योगा करू शकता. अगदीच ज्यांना वेळ मिळत नसेल  ते लोक संध्याकाळी योगा करू शकतात. तसंच योगा केल्यानंतर अर्ध्या तासानं तुम्ही द्रवपदार्थांचे सेवन करू शकता तर एक तासानं काहीही खाऊ शकता. खाण्याच्या पदार्थांबाबत बंधन नाही पण पण शक्यतो घरी तयार केलेले पदार्थ खाण्याचा प्रयत्न करा. बाहेरचे कोणतेही जंक फूड खाणं नेहमी टाळा. जास्तीत जास्त पाणी  प्या.'' 

या वेळेत योगा केल्यानं जास्त फायदा मिळतो

लोक योग करण्यासाठी आपल्या मनानुसार वेळ निवडतात. पण योग्य परिणाम दिसून येण्यासाठी सकाळी रिकाम्या पोटी योगा करायला हवा. यावेळी तुम्ही बराचेळ काही खाल्लं नसेल म्हणून योगावर व्यवस्थित लक्ष केंद्रीत करता येईल. झोपेतून उठल्यानंतर ३० मिनिटांनंतर तुम्ही योगा करायला हवा.  जर सकाळी वेळ मिळत नसेल तर तुम्ही संध्याकाळीसुद्धा योगा करू शकता. फक्त रात्रीच्या जेवणाच्या ६० किंवा ९० मिनिटं आधी योगा करायला हवा. 

जर तुम्ही  सकाळच्यावेळी योगा करत असाल आणि उठून  जवळपास १ ते २ तास झाले असतील तर योगा करण्याच्या  ४५ मिनिटं आधी तुम्ही काहीतरी खायला हवं. कारण तुम्हाला उठून बराचवेळ झाला आहे. शरीरातील उर्जाही हळूहळू कमी होऊ लागते. असा स्थितीत योगा करणं शक्य होत नाही. म्हणून सकाळी उठल्यानंतर लगेचच योगा करायला हवा. उशीर झाल्यास  ४५ मिनिटं आधी फळांचा रस किंवा फळांचे सेवन करायला हवं.

योगा केल्यानंतर काय खायला हवं

योगा केल्यावर आपल्याला सहसा जास्त भूक लागते. अशा परिस्थितीत, बर्‍याच वेळा वेळेवर काहीही चांगले खायला नसते तेव्हा लोक तळलेले किंवा जास्त मसालेदार, गोड पदार्थ खातात. परिणामी योगामुळे शरीराला अजिबात फायदा होत नाही.  जर तुम्ही सकाळी योगा करत असाल तर केवळ उच्च प्रोटीन्स, मिनरल्सयुक्त पदार्थ खा. यामध्ये तुम्ही ताजी फळे, भाज्या, दुग्धजन्य पदार्थं यांचा समावेश करू  करू शकता. अशा प्रकारच्या खाद्यपदार्थांमुळे केवळ ऊर्जा मिळणार नाही तर संपूर्ण शरीर निरोगी राहण्यास मदत होईल. लक्षात ठेवा की योगानंतर 30 मिनिटांनंतर किंवा 45 मिनिटांनंतरच काहीतरी खा.

जड अन्नपदार्थ खाऊन योगा करू नका

जर तुमची योगा करण्याची वेळ सकाळची नसेल तर संध्याकाळी योगा करताना काही गोष्टींची काळजी घ्यायला हवी. जर तुम्ही दुपारच्या जेवणामध्ये किंवा संध्याकाळी काहीतरी जास्त खाल्ले असेल तर किमान 3 ते ४ तास योगा करू नका. दुसरीकडे जर तुम्ही काही हलके फुलके खाल्ले असेल तर तुम्ही फक्त २ तासानंतर योगा करायला हरकत नाही. 

रात्रीच्यावेळी या पदार्थांचे सेवन करू नका

जर आपण संध्याकाळी योगा केला तर रात्री जास्त प्रमाणात काही खाऊ नका हे लक्षात ठेवा. तळलेल्या किंवा गोड पदार्थांचा अन्नामध्ये समावेश करू नये हे देखील लक्षात घ्या. यावेळी, कोणत्याही प्रकारचे कोल्ड्रिंक्स किंवा सोडायुक्त पदार्थ पिणे टाळा.

पाण्याचे महत्व

व्यक्ती योगा, व्यायाम करत असो किंवा नसो भरपूर प्रमाणात पाण्याचे सेवन करणं आवश्यक आहे. तुम्ही कधीही थंड पाणी पिऊ नका. हे लक्षात ठेवा की जर आपण थंड पाणी प्याल तर शरीरास गरम करण्यासाठी आणि शरीराच्या तपमानाशी जुळण्यासाठी बरेच प्रयत्न करावे लागतील. म्हणूनच, फक्त सामान्य तापमानाचे पाणी प्या.

टॅग्स :हेल्थ टिप्सआरोग्यआंतरराष्ट्रीय योग दिनयोगफिटनेस टिप्सअन्न