Lokmat Sakhi >Fitness > World Music Day : एक्सरसाईज करताना संगीत ऐकल्यास काही फायदा मिळतो का? ऐकावं की नाही?

World Music Day : एक्सरसाईज करताना संगीत ऐकल्यास काही फायदा मिळतो का? ऐकावं की नाही?

World Music Day : एक्सरसाईज करताना संगीत ऐकल्यानं काय फायदे मिळतात, हेच आज आम्ही तुम्हाला वर्ल्ड म्युझिक डे निमित्ताने सांगणार आहोत.

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 21, 2025 14:31 IST2025-06-21T13:27:00+5:302025-06-21T14:31:15+5:30

World Music Day : एक्सरसाईज करताना संगीत ऐकल्यानं काय फायदे मिळतात, हेच आज आम्ही तुम्हाला वर्ल्ड म्युझिक डे निमित्ताने सांगणार आहोत.

World Music Day : Listening to music while exercising good or not | World Music Day : एक्सरसाईज करताना संगीत ऐकल्यास काही फायदा मिळतो का? ऐकावं की नाही?

World Music Day : एक्सरसाईज करताना संगीत ऐकल्यास काही फायदा मिळतो का? ऐकावं की नाही?

World Music Day : संगीत ऐकणं मनाला किती आराम देतं हे काही कुणाला वेगळं सांगण्याची गरज नाही. संगीत अनेक मानसिक आजारांमध्ये एखाद्या थेरपीसारखं काम करतं. स्ट्रेस घालवणं, एनर्जी मिळणं अशाही गोष्टी संगीत ऐकल्यानं होतात. आज जगभरात वर्ल्ड म्युझिक डे साजरा केला जात आहे. तसे तर लोक नेहमीच संगीत ऐकतात. पण आज लोक त्यांच्या आवडीचं संगीत शोधून शोधून ऐकत आहेत. अनेकजण प्रवास करताना, रिकामे बसले असताना किंवा एखादं काम करत असताना आवडीची गाणी लावून ठेवतात. बरेच लोक तर एक्सरसाईज करतानाही संगीत ऐकतात. 

तुम्हीही अनेकदा पाहिलं असेल की, काही लोक एक्सरसाईज करताना देखील कानाला हेडफोन लावून संगीत ऐकत असतात. पण वर्कआउट करताना लोक संगीत का ऐकतात? असा प्रश्नही अनेकांना पडत असतो. अशात एक्सरसाईज करताना संगीत ऐकल्यानं काय फायदे मिळतात, हेच आज आम्ही तुम्हाला वर्ल्ड म्युझिक डे निमित्ताने सांगणार आहोत.

वर्कआउट आणि संगीत

संगीत ऐकून आयुष्यातील ताण-तणाव, चिंता, काळजी दूर करण्यास मदत मिळते. तेच संगीत ऐकत वर्कआउट केल्यानं लक्ष केंद्रीत होतं आणि वर्कआउटच्या दबावाची जाणीव कमी होते. अशानं १५ मिनिटे एक्सरसाइज अधिक केली जाते. थिरकायला लावणारे संगीत असेल तर यानं मेंदू अधिक वेगाने काम करतो आणि तुम्हीही त्यामुळे वेगाने एक्सरसाईज करू शकता.

जास्त मेहनतीसाठी मिळते मदत

२०१० मधील एका रिसर्चनुसार, मेलोडिअस संगीताच्या तुलनेत फास्ट बीट असलेलं संगीत ऐकलं तर भरपूर मेहनतीनं एक्सरसाईज करण्यास मदत मिळते. जर तुम्ही १२० ते १४० बीट्स प्रति मिनिटं असलेलं म्युझिक ऐकाल तर याचा तुम्हाला एक्सरसाईज करताना चांगला परिणाम बघायला मिळेल.

एकाच वेगानं काम करण्यास मदत

वर्कआउट दरम्यान संगीताची लय मेंदूची सिस्टीम उत्तेजित करते. यानं एक्सरसाईज करताना मेंदूला वेगवेगळे संकेत मिळतात आणि एक्सरसाइज अधिक चांगली करू शकता. म्युझिकमधून तुम्हाला ऊर्जा मिळते. एक गति कायम ठेवण्यास शरीराल मदत मिळते.

मूड चांगला राहतो

२०१३ मध्ये करण्यात आलेल्या एका रिसर्चनुसार, संगीत ऐकल्यानं मूड बदलण्यास मदत मिळते. रिसर्चमध्ये सहभागी लोकांना संगीत ऐकण्यास सांगून त्यांना या विचारात गुंतण्याची संधी देण्यात आली की, ते काय आहेत? आणि त्यांना काय व्हायचं आहे? संगीत ऐकून लोकांना नकारात्मक विचारांमधून सुटका मिळते. 

Web Title: World Music Day : Listening to music while exercising good or not

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.