जर तुम्ही ९ ते ५ चा जॉब करत असाल तर बॉलिवूड एक्टर मिलिंद सोमण यांचा सल्ला तुम्ही ऐकायलाच हवा. अलिकडेच त्यांनी नॅच्यरलीन पॉडकास्टमध्ये सांगितले की दीर्घकाळ एकाच ठिकाणी बसणं तुमच्यासाठी धोकादायक ठरू सकतं. जर तुम्ही डेस्क जॉब करत असाल आणि दर अर्ध्या तासानं उठण्याची सवय तुम्हाला लागली असेल आणि काहीच एक्स्ट्रा काम करत नसाल तर तुमच्यासाठी हे नुकसानकारक ठरू शकतं. तुम्ही तुमच्या खुर्चीवरून उठून काही मिनिटांसाठी चालायला हवं. म्हणूनच पाण्याची बॉटल डेस्कवर ठेवू नका. (Why does Milind Soman say that you should never keep a water bottle on your office table?)
ऑफिस टेबलवर बॉटल ठेवू नये या मागचं कारण असं की जेव्हा तुम्हाला तहान लागेल तेव्हा तुम्ही उठून वॉटर फिल्टरजवळ जाल. या निमित्तानं तुमचं उठणं होईल. म्हणजेच तुम्ही तासनतास एकाच जागेवर बसून न राहता पाणी पिण्याच्या निमित्तानं का होईना जागेवरून उठून हालचाल कराल. जर तुम्ही १ तासाचा लंच ब्रेक घेत असाल तर १ मिनिट त्यातून काढा आणि पुशअप्स मारा, स्पॉट मार्चिंग करा अजून इतरही काही एक्टिव्हीटीज करू शकता.
पोश्चर तुमच्या आरोग्यासाठी फार महत्वाचे असते. तुम्ही कसे बसता म्हणजेच तुम्ही कोणत्या शारीरिक मुद्रेत बसता हे खूपच महत्वाचे असते. दीर्घकाळ वाकून किंवा चुकीच्या पद्धतीनं बसून काम केल्यानं तुमच्या पाठीच्या हाडावर दबाव येऊ शकतो तसंच मान आणि खांद्याच्या मांसपेशींवर दबाव येतो म्हणूनच पाय सरळ जमिनीवर ठेवून उठायला किंवा बसायला हवं. डोळ्यांच्या सरळ रांगेत स्क्रीन असायला हवी. कोणत्याही स्थितीत जास्त वेळ बसणं योग्य नाही. अध्येमध्ये हालचाल करायला हवी.
महाशिवरात्रीचा उपवास कधी सोडावा-कसा सोडावा? ८ नियम, उपवास सफळ-पित्तही होणार नाही
काम करत असताना छोटे ब्रेक घेतल्यास तुमच्या शरीरावर येणारा अतिरिक्त भार, अतिरिक्त ताण कमी करता येतो. उठून उभं राहणं, पाणी भरण्यासाठी चालणं किंवा १ मिनिटं स्ट्रेचिंग करणं शरीराची मुद्रा सुधारण्यासाठी फायदेशीर ठरतं. ब्लड फ्लो चांगला ठेवण्यासाठी तंसच मांसपेशींचा थकवा कमी करण्यासाठी या व्यायामांनी मदत होते. हे छोटे ब्रेक मांसपेशींमध्ये उद्भवणाऱ्या समस्या रोखण्यास मदत करतात.
