When Youth Starts Fading: सगळ्यांनाच असं वाटत असतं की, त्यांनी आयुष्यभर तरूण दिसावं आणि तरूण रहावं. पण वय वाढणं ही एक नॅचरल प्रोसेस आहे. जी आपण थांबवू शकत नाही. बालपण, टीनएज, तारूण्य, मध्यम वय आणि शेवटी म्हातारपण हे गणित ठरलेलं असतं. अनेकदा काही लोकांच्या मनात प्रश्न येतो की, मनुष्य आपल्या जीवनात सगळ्यात फिट, शक्तीशाली आणि वेगवान कधी असतो आणि कोणत्या वयानंतर शरीर कमजोर होऊ लागतं? विज्ञान आणि काही शोधातून याबाबत फारच इंटरेस्टिंग माहिती समोर आली. ज्याचा आपण कधी विचारही केला नसेल.
व्यक्ती जास्त तरूण कधी असतो?
वैज्ञानिकांनुसार, शारीरिक रूपाने मनुष्य सगळ्यात जास्त तरूण २० ते ३० वयादरम्यान असतो. या वयात स्नायू, स्टॅमिना, फुप्फुसांची क्षमता आणि हाडांची मजबूती सगळ्यात जास्त असते. हार्वर्ड आणि स्टॅनफोर्ड यूनिव्हर्सिटीच्या काही शोधातून समोर आलं आहे की, याच वयात शरीराची रिकव्हरी सगळ्यात वेगाने होते. तसेच एखादी जखम किंवा आजारातून बाहेर पडण्याची क्षमताही अधिक असते. या वयात लोकांच्या सगळ्याच क्षमता अधिक असतात. पुढे ३० वयानंतर शरीर कमजोर होणं सुरू होतं.
मेंदूची क्षमता जास्त कधी असते?
तेच जर मेंदूच्या क्षमतेबाबत सांगायचं झालं तर गोष्टी थोड्या बदलतात. न्यूरोसायन्सनुसार प्रोसेसिंग स्पीड म्हणजे वेगाने विचार करणे आणि प्रतिक्रिया देण्याची क्षमता २० ते ३० वयादरम्यान सगळ्यात जास्त असते. पण निर्णय घेण्याची समज, भावनात्मक नियंत्रण आणि प्रॅक्टिकल इन्टॅलिजन्स ३० ते ४० वयात आपल्या पीकवर पोहोचतं. म्हणजेच काय तर शरीर तरूण आधी होतं, पण मेंदूमध्ये मॅच्युरिटी थोडी उशिरा येते. म्हणजेच आपला मेंदू ४० वयापर्यंत सगळ्यात जास्त तरूण राहतो.
तारुण्य मावळणे कधी सुरू होतं?
वैज्ञानिक रूपाने पाहिलं तर ३० वयानंतर शरीरात बदल हळूहळू सुरू होतात. स्नायू दरवर्षी १ टक्के कमी होऊ लागतात. मेटाबॉलिज्म स्लो व्हायला सुरूवात होते आणि हार्मोन्समध्येही बदल होऊ लागतात. पण हे बदल लगेच होत नाहीत. यांची जाणिव हळूहळू होते. ४० वयानंतर हे बदल जाणवू लागतात. जर चांगली लाइफस्टाईल आणि डाएट फॉलो केली तर ५० ते ६० वयापर्यंत तरूण राहू शकता.
महिला - पुरूषात तारुण्य मावळण्याचा पॅटर्न वेगळा
महिला आणि पुरूषांमध्ये अनेक गोष्टी वेगवेगळ्या असतात. तसाच त्यांच्यात तारूण्य मावळण्याचा पॅटर्न देखील वेगळा असतो. महिलांमध्ये ३० वयानंतर अॅस्ट्रोजन हार्मोनमध्ये बदल येऊ लागतो, ज्याचा प्रभाव थेट त्वचा, हाडं आणि एनर्जी लेव्हलवर दिसून येतो. तर पुरूषांमध्ये टेस्टोस्टेरॉनचं प्रमाण ३० वयानंतर कमी होऊ लागतं. ज्यामुळे शक्ती आणि स्टॅमिनात फरक येतो. पुन्हा तेच की, जर हेल्दी लाइफस्टाईल फॉलो केली तर हा प्रभाव कमी केला जाऊ शकतो.
अनेक हेल्थ एक्सपर्ट सांगत असतात की, तरूण राहण्यासाठी केवळ वयच नाही तर लाइफस्टाईल हेल्दी असणंही तेवढंच महत्वाचं आहे. योग्य आहार, नियमित व्यायाम, पुरेशी झोप, चिंतामुक्त आणि सकारात्मक विचारांसोबत व्यक्तीला ४० ते ५० वयातही तरूण असल्याचं जाणवू शकतं.
