Join us

चालताना कधीही करू नका 'या' चुका; फायद्याऐवजी होईल नुकसान

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 11, 2025 12:31 IST

वजन कमी करण्यासाठी, हृदयाचे आरोग्य सुधारण्यासाठी आणि मेटाबॉलिज्म सुधारण्यासाठी दररोज चालणं खूप महत्त्वाचं आहे.

जेव्हा जेव्हा फिटनेसचा प्रश्न येतो तेव्हा लोक चालण्यापासून सुरुवात करतात. सकाळी आणि संध्याकाळी चालणं हा आरोग्यासाठी रामबाण उपाय ठरतो. वजन कमी करण्यासाठी, हृदयाचे आरोग्य सुधारण्यासाठी आणि मेटाबॉलिज्म सुधारण्यासाठी दररोज चालणं खूप महत्त्वाचं आहे. एवढेच नाही तर चालण्यामुळे तुमची त्वचा आणि केसांचे आरोग्य देखील सुधारतं. मात्र चालताना आपण नकळत काही चुका करतो, ज्यामुळे चालणं फायदेशीर ठरण्याऐवजी हानिकारक ठरतं. अशा परिस्थितीत चालताना कोणत्या गोष्टी लक्षात ठेवल्या पाहिजेत ते जाणून घेऊया...

चालताना करू नयेत 'या' चुका

- सर्वप्रथम चालण्यासाठी चांगले शूज घाला. नेहमी स्पोर्ट्स शूज घालून चालावं. यामुळे तुमच्या पायांना नीट आधार मिळतो. तसेच चालताना सरळ उभं राहणं, खांदे रिलॅक्स ठेवणं आणि डोकं सरळ ठेवून चालणं यासारख्या गोष्टीची विशेष काळजी घ्या.

- खूप लांब पावलं टाकल्याने चालणं अधिक प्रभावी होईल असा जर तुम्ही विचार करत असाल तर ते चुकीचं आहे. यामुळे तुमच्या पायांवर जास्त दबाव येतो, ज्यामुळे तुम्ही थकता आणि पायांना दुखापत देखील होऊ शकते. म्हणून चालताना नेहमी बॅलेन्स पावलं उचला.

- चालताना कधीही चुकीच्या पद्धतीने हात हलवू नका. हात जास्त वर किंवा खाली हलवल्याने शरीराचा बॅलेन्स बिघडू शकतो. म्हणून चालताना, हात खांद्याला कोर्डिनेट करून हलवावेत.

- चालताना खूप घाम येतो. अशा परिस्थितीत मध्ये मध्ये पाणी पित राहा. चालताना भरपूर पाणी प्यावं. यामुळे डिहायड्रेशनची समस्या उद्भवत नाही.

- वॉर्म अप न करता चालल्याने स्नायूंवर ताण येऊ शकतो. म्हणून चालण्यापूर्वी वॉर्म-अप आणि कूल-डाउन खूप महत्त्वाचं आहे. 

-  जेवल्यानंतर किमान ३० मिनिटांनी चालायला सुरुवात करा. चालण्याची ही योग्य पद्धत आहे.

चालताना 'हे' ठेवा लक्षात

- तुम्ही दर काही दिवसांनी तुमच्या वॉकिंग रुटीनमध्ये बदल करत राहा.

- जसं की वेगाने चालणं, उतारावरून चालणं किंवा चालण्याचं अंतर वाढवणं.

- तुम्ही तुमच्या क्षमतेनुसार चालावं, अन्यथा शरीरावर दबाव वाढतो. 

टॅग्स :फिटनेस टिप्सहेल्थ टिप्सआरोग्य