बरेच लोक विचार करतात की आम्ही रोज वॉक करतो तरिही पोटाची चरबी कमी होत नाही.व्यायाम व्यवस्थित करूनही शरीरावर त्याचा काहीही परीणाम दिसून येत नाही. वॉक करताना काही चुका केल्यामुळे वजन कमी होणं अवघड होतं. फक्त कॅलरीज बर्न केल्यामुळे पोटाची चरबी कमी होत नाही. (What is Right Way To Walk For Weight Loss)
पोटाची चरबी कमी करण्यासाठी सवयी, झोप, स्ट्रेस लेव्हल, चालण्याचा वेग या गोष्टीसुद्धा महत्वाच्या असतात. काही लोक ६ ते ७ हजार पाऊलं चालतात पोट कमी करण्यासाठी इतकं पुरेसं नसून योग्य वेळ, योग्य इंटेंसिटीनं व्यायाम करण्याची गरज असते. पोटाची चरबी इंटरवल आणि इंक्लाईन वॉकमुळे वेगानं कमी होते. (Correct Way to Walk Walking Tips)
इंटरव्हल वॉक काय आहे?
इंटरवल वॉक वेगानं चालण्याचा आणि सामान्य वॉकचं एक कॉम्बिनेशन आहे. म्हणूनच रोज फक्त १ मिनिट वेगानं वॉक आणि १ मिनिटं साध्या वेगानं चालायला हवं. हा पॅटर्न २५ ते ३० मिनिटांनी रिपीट करा. ज्यामुळे फॅट बर्निंगची क्षमता अनेक पटिंनी वाढते.
इंक्लाईन वॉक कसं करतात?
इंक्लाईन वॉकमध्ये चढताना १० ते १५ मिनिटं इंक्लाईन वॉक करा. ज्यामुळे हिप्स,पोट, मांड्यांची चरबी कमी होते इंक्लाईन वॉक केल्यानं कोअर स्ट्रेंथ वाढते.पोटाची चरबी कमी करण्यासाठी वॉक, प्लँक, क्रंचेच पुरेसे नाही. ट्रेनर्सच्यामते पोटाची चरबी तेव्हाच कमी होते जेव्हा शरीराचे मसल्स एक्टिव्ह होतात आणि मेटाबॉलिक रेटही वाढतो.
लंजेस, पुशअप्स,डंबल व्यायाम, स्वॅट्स या व्यायामांचा आपल्या रूटीनमध्ये समावेश करा शरीरात जितके जास्त मसल्स तयार होतील तितक्याच जास्त कॅलरीज बर्न होतील. पोट आणि कंबरेभोवती जमा झालेली चरबी कमी करण्यासाठी चालणे हा उत्तम व्यायाम आहे.
दिवसातून कमीत कमी ३० ते ६० मिनिटं चाला. सुरूवातीला ३० मिनिटं चाला नंतर हळूहळू वेग वाढवा. आठवड्यातून कमीत कमी ५ ते ६ दिवस चालणं गरजेचं आहे. पोटाची चरबी जलद गतीन कमी करण्यासाठी चालण्याआधी थोडावेळ वॉर्म अप करा. दिवसभर पुरेसे पाणी प्या.
