Leg Elevation Trend : सोशल मीडियावर नेहमीच वेगवेगळ्या व्यायामांचे व्हिडीओ ट्रेंड होत असतात. या व्यायामांचे व्हिडीओ नेहमीच व्हायरल होत असतात. जे एकंदर फिटनेससाठी फायदेशीर मानले जातात. सध्या अशात एका 10 मिनिटांच्या leg elevation व्यायामाचा व्हिडीओ सोशल मीडियावर ट्रेंड करत आहे. असं सांगितलं जात आहे की, हा व्यायाम करून आपल्या शरीराला 8 तास झोपेइतका आराम मिळतो.
टाइम्स ऑफ इंडियाच्या माहितीनुसार, या साध्या व्यायामाचे अनेक फायदे आहेत. फिटनेस ट्रेनर जस्टिन अगस्टिन यांनीही या ट्रेंडला सपोर्ट करत याचे फायदे सांगितले आहेत. चला जाणून घेऊ या, या लेग-एलीवेशन व्यायामाचे फायदे आणि तो कसा करावा.
याबाबत विज्ञान काय मत?
विज्ञान देखील सांगतं की पाय वर करून झोपल्याने शरीराला खूप फायदा होतो. अनेक संशोधनांमधून हे सिद्ध केलं आहे की, हा व्यायाम ब्लड सर्क्युलेशन सुधारतो, रक्तवाहिन्या मजबूत ठेवतो आणि शरीरातील सूज कमी करण्यात मदत करतो.
लेग-एलीवेशन व्यायाम कसा करावा?
जमिनीवर किंवा बेडवर पाठीवर सरळ झोपा. आता दोन्ही पाय वर उचला डोळ्यांच्या लेव्हलपेक्षा थोडे उंच. पाय टिकवण्यासाठी उशी किंवा भिंतीचा आधार घेऊ शकता. ही स्थिती 10 मिनिटे कायम ठेवा.
या व्यायामाचे फायदे
ब्लड सर्क्युलेशन सुधारतं
नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ हेल्थच्या संशोधनानुसार, ज्यांना रक्तवाहिन्यांमध्ये ब्लड फ्लो कमी असतो, त्यांच्यात हा व्यायाम केल्यावर ब्लड सर्क्युलेशन 40–45% पर्यंत वाढले.
सूज आणि जडपणा कमी होतो
शरीराच्या खालच्या भागात साचलेलं पाणी बाहेर काढायला मदत होते. त्यामुळे पायातील सूज आणि वेदना कमी होतात. कोरियन फुट अँड अँकल सोसायटीच्या अभ्यासानुसार, पाय वर-खाली ठेवण्याने सूज व वेदना दोन्ही कमी होतात.
हृदय आणि ब्लड प्रेशरला फायदा
हा व्यायाम केल्यानं हृदयाचं आरोग्य सुधारतं आणि ब्लड प्रेशर नियंत्रणात राहतं. बीएमसी अॅनेस्थिसियोलॉजीच्या स्टडीमध्ये दिसून आलं की, पाय वर ठेवल्याने अचानक लो ब्लड प्रेशर होण्याची शक्यता कमी होते.
एकंदर काय तर रोज फक्त 10 मिनिटे पाय वर करून झोपणं, हा एक सोपा आणि नॅचरल व्यायाम आहे, ज्यानं ब्लड सर्क्युलेशन, सूज, आणि हृदयाचं आरोग्य सुधारतं.
