Join us
Daily Top 2Weekly Top 5

वजनाला मारा गोळी, सुटलेलं पोटही विसरा, ‘या’ २ गोष्टी जमत असतील तर समजा तुम्ही फिट आहात आणि सुंदरही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 29, 2026 18:46 IST

Fitness Tips: वजनाच्या आकड्याला सध्या खूप महत्त्व आलं असून त्या नादात तुमचा फिटनेस तर मागे पडत नाही ना हे एकदा तपासून पाहा...(what does good health mean?)

ठळक मुद्देतुम्ही भरपूर वजन उतरवलं आणि त्यासोबतच तुमचा फिटनेसही तेवढाच कमी झाला तर ते काही उपयोगाचं नाही

तुमचं वजन कमी आहे, तुम्ही अगदी चवळीची शेंग आहात पण तुमच्यात अजिबातच एनर्जी नाही, मग अशा वेटलॉसचा काही उपयोग आहे का? हा प्रश्न एकदा स्वत:ला विचारून पाहा.. कारण हल्ली जो तो वजनाच्या मागे लागला आहे. जीम लावायची, व्यायाम करायचा आणि ते फक्त वजन घटविण्यासाठीच असं गणित कित्येकांच्या डोक्यात अगदी पक्कं आहे. मग अशावेळी फिटनेस या शब्दाचा अनेकांना विसर पडतो आणि केवळ वजन एवढं एकच टार्गेट डोळ्यासमोर दिसू लागतं. पण तुम्ही भरपूर वजन उतरवलं आणि त्यासोबतच तुमचा फिटनेसही तेवढाच कमी झाला तर ते काही उपयोगाचं नाही (what does good health mean?). अशीच एक पोस्ट सेलिब्रिटी आहारतज्ज्ञ ऋजुता दिवेकर यांनी शेअर केली असून त्यांनी आपण हेल्दी आहोत हे नेमकं कसं ओळखायचं हे समजावून सांगितलं आहे.(how to check your fitness level?)

तुम्ही निरोगी, हेल्दी आहात हे कसं ओळखायचं?

 

ऋजुता दिवेकर यांनी जी पोस्ट सोशल मीडियावर शेअर केली आहे त्यात त्यांनी ३ गोष्टी सांगितल्या आहेत. त्या ३ गोष्टी करणं जर तुम्हाला अगदी सहज शक्य होत असेल तर तुम्ही हेल्दी, निरोगी, फिट आहात हे ओळखा.

पिगमेंटेशनमुळे त्वचेवर पॅचेस दिसतात? तांदळाच्या पिठापासून 'अशी' तयार करा साबण, त्वचेवर येईल आरशासारखी चमक

त्यात त्यांनी सांगितलेली सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे तुमची क्षमता.. उदाहरणार्थ काही महिन्यांपुर्वी जर तुम्ही पायऱ्या चढल्या तर तुम्हाला धाप लागायची.. पण नंतर मात्र तुम्ही व्यायाम केला. त्या व्यायामामुळे तुमचं वजन खूप काही कमी झालं नाही, पण आता मात्र पायऱ्या चढल्या- उतरल्या तरी तुम्हाला धाप लागत नाही. असं जर एखाद्या बाबतीत तुमच्यासोबत झालं तर नक्कीच आधीपेक्षा तुमची क्षमता वाढली. तुमचा फिटनेस वाढला. अशा पद्धतीने तुमच्या क्षमता तपासून पाहा.

 

दुसरी गोष्ट म्हणजे तुमची रोगप्रतिकारक शक्ती वाढली. पुर्वी जर थोडं काही जास्तीचं काम झालं की लगेच थकवा यायचा, अंग दुखायचं, तब्येत बिघडायची. पण आता मात्र रोगप्रतिकारक शक्ती चांगली वाढली आहे. वारंवार तुम्ही आजारी पडत नाही.

केसांना 'या' पद्धतीने लावा दुधाचा हेअरमास्क- जादू झाल्याप्रमाणे चमकदार, सिल्की होतील केस

तुम्हाला औषधं गोळ्या घेण्याची गरज पडत नाही, असं असेल तर नक्कीच तुम्ही आधीपेक्षा जास्त निरोगी झाला आहात. ऋजुता यांनी आणखी तिसरी गोष्टही सांगितली आहे आणि ती म्हणजे लोकांच्या कमेंटकडे दुर्लक्ष करणे.. कोणी आपल्या शरीराला काहीही म्हटलं तरी आपल्याला आपला फिटनेस माहिती आहे. त्यामुळे लोकांकडे दुर्लक्ष करा आणि पुढे चला असं त्या सांगतात.  

 

English
हिंदी सारांश
Web Title : Forget weight, belly! Key fitness indicators revealed for healthy life.

Web Summary : Celebrity nutritionist Rujuta Diwekar shares how to assess true health beyond weight loss. Focus on increased stamina, improved immunity, and ignoring negative comments for overall fitness.
टॅग्स :फिटनेस टिप्सआरोग्यहेल्थ टिप्सव्यायाम