lokmat Supervote 2024
Lokmat Sakhi >Fitness > सकाळी वेळ नाही ना, मग सायंकाळी व्यायाम करा ! सायंकाळच्या व्यायामाचे हे फायदे वाचा..

सकाळी वेळ नाही ना, मग सायंकाळी व्यायाम करा ! सायंकाळच्या व्यायामाचे हे फायदे वाचा..

संध्याकाळी शारीरिक व्यायाम चांगला होऊ शकतो. याबाबतचं संशोधन सांगतं की दिवस सरल्यानंतर अनेकांच्या शारीरिक क्रिया करण्याचा उत्साह आणि क्षमता वाढलेल्या असतात. स्नायुंची ताकद, त्यांची लवचिकता, व्यायाम करण्याची क्षमता ही सकाळच्या तुलनेत संध्याकाळी अनेकांच्या बाबतीत वाढलेली असते. संध्याकाळी व्यायाम करण्याचे अनेक फायदे तोटे आहेत. ते समजून घेतल्यास संध्याकाळी व्यायाम करताना त्याचा फायदा होऊ शकतो.

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 17, 2021 04:16 PM2021-04-17T16:16:51+5:302021-04-19T14:52:41+5:30

संध्याकाळी शारीरिक व्यायाम चांगला होऊ शकतो. याबाबतचं संशोधन सांगतं की दिवस सरल्यानंतर अनेकांच्या शारीरिक क्रिया करण्याचा उत्साह आणि क्षमता वाढलेल्या असतात. स्नायुंची ताकद, त्यांची लवचिकता, व्यायाम करण्याची क्षमता ही सकाळच्या तुलनेत संध्याकाळी अनेकांच्या बाबतीत वाढलेली असते. संध्याकाळी व्यायाम करण्याचे अनेक फायदे तोटे आहेत. ते समजून घेतल्यास संध्याकाळी व्यायाम करताना त्याचा फायदा होऊ शकतो.

What do you get from evening exercise? | सकाळी वेळ नाही ना, मग सायंकाळी व्यायाम करा ! सायंकाळच्या व्यायामाचे हे फायदे वाचा..

सकाळी वेळ नाही ना, मग सायंकाळी व्यायाम करा ! सायंकाळच्या व्यायामाचे हे फायदे वाचा..

Highlights याबाबतचं संशोधन सांगतं की दिवस सरल्यानंतर अनेकांच्या शारीरिक क्रिया करण्याचा उत्साह आणि क्षमता वाढलेल्या असतात.व्यायामातून स्नायुंचा विकास होण्यासाठी टेस्टेस्टोरेन हे संप्रेरक ( हार्मोन्स) महत्त्वाचं असतं. हे संप्रेरक सकाळच्या तुलनेत दुपारच्या वेळेत व्यायाम केल्यानं जास्त स्त्रवतं.अभ्यासकांना सकाळच्या व्यायामात जे सातत्य दिसून आलं ते संध्याकाळच्या व्यायामात कमी प्रमाणात आढळून आलं


व्यायाम हा फक्त सकाळीच होतो. दुपारी किंवा संध्याकाळी व्यायाम होत नाही . हा फक्त समज आहे. सत्य नाही. अनेकांना सकाळपेक्षा दूपारी किंवा संध्याकाळी व्यायाम करण्यास आवडतं. सकाळपेक्षा दुपारी आणि संध्याकाळी व्यायाम करताना त्यांना अधिक ऊर्जा मिळत असल्याचा अनुभव अनेकजण सांगतात. हा अनुभव खरा आहे. व्यायामाला वेळ नसतो. इच्छा असली तेव्हा व्यायाम होऊ शकतो. पण दिवसातल्या कोणत्या वेळी व्यायाम करतात त्या वेळेचा फायदा तोटा त्या व्यायामाला चिटकलेला असतोच. संध्याकाळी व्यायाम करण्यानेही उत्तम व्यायाम होऊ शकतो. या वेळेत व्यायाम करण्याचे अनेक फायदे तोटे आहेत. ते समजून घेतल्यास संध्याकाळी व्यायाम करताना त्याचा फायदा होऊ शकतो.

संध्याकाळच्या व्यायामाचे फायदे

- संध्याकाळी शारीरिक व्यायाम चांगला होऊ शकतो. याबाबतचं संशोधन सांगतं की दिवस सरल्यानंतर अनेकांच्या शारीरिक क्रिया करण्याचा उत्साह आणि क्षमता वाढलेल्या असतात. स्नायुंची ताकद, त्यांची लवचिकता, व्यायाम करण्याची क्षमता ही सकाळच्या तुलनेत संध्याकाळी अनेकांच्या बाबतीत वाढलेली असते. सकाळी व्यायाम करताना लवकर थकवा येण्याची शक्यता असते. संध्याकाळी व्यायामानं थकवा जाणवण्यास सकाळच्या तुलनेत २० टक्के जास्त वेळ लागतो.

- दिवसभराच्या कामातून , हालचालीतून आपल्या शरीराचं तापमान वाढलेलं असतं. त्यामूळे व्यायाम करताना शरीरात जी उष्णता लागते ती संध्याकाळी व्यायामाच्या वेळेस शरीरात निर्माण झालेली असते. यामुळे व्यायामासाठी शरीर व्यवस्थित तयार झालेलं असतं.

- व्यायामातून स्नायूंचा विकास होण्यासाट्ही टेस्टेस्टोरेन हे संप्रेरक ( हार्मोन्स) महत्त्वाचं असतं. हे संप्रेरक सकाळच्या तूलनेत दूपारच्या वेळेत व्यायाम केल्यानं जास्त स्त्रवतं. त्याचा परिणाम व्यायामातून साधला जाणारा स्नायुंचा विकास उत्तम होतो.

- दिवस सरल्यानंतर व्यायाम केल्यास ताण कमी होण्यास मदत होते. ताण घालवण्यासाठी व्यायाम हा उत्तम पर्याय असतो. दिवसभर कामातून आलेला ताण दुपार किंवा संध्याकाळच्या व्यायामातून जाण्यास मदत होते. व्यायामानंतर शरीरात एन्डॉर्फिन्स नावाचं संप्रेरक स्त्रवतं. त्याचा परिणाम म्हणून झोपेपूर्वी शरीर आणि मनावरचा ताण निघून गेलेला असतो आणि त्यामुळे झोप चांगली लागते.

- संध्याकाळी अनेकांना खूप मोकळा वेळ मिळत असतो. अनेकजण तो केवळ बसून टी.व्ही बघण्यात घालवतात. ही आणि यासारख्या अनेक वाईट सवयी घालवण्यासाठी संध्याकाळचा व्यायाम उत्तम असतो. व्यायामानं शरीरात निर्माण झालेल्या ऊर्जेनं नवीन काम करण्याचा उत्साहही येतो.

संध्याकाळच्या व्यायामाचे तोटे

- सकाळच्या तुलनेत संध्याकाळी व्यायाम करण्यास कमी प्रेरणा मिळते. संध्याकाळच्या व्यायामासाठी स्वत:ला तयार करायला अवघड जातं.

- संध्याकाळच्या व्यायामानं झोप छान लागते हे सत्य सरसकट नाही. रात्री अगदी झोपण्याच्या काही वेळ आधी जास्त ताकदीचा व्यायाम केला तर उलट झोप लवकर लागत नाही. त्यामुळे संध्याकाळी कधी , किती आणि कोणता व्यायाम करता यावर चांगली झोप अवलंबून असते. समजा झोपेच्या आधी सौम्य प्रकारचा व्यायाम केला, योग केला तर मग त्याचा परिणाम झोप सुधारण्यावर होऊ शकतो.

- अभ्यासकांना सकाळच्या व्यायामात जे सातत्य दिसून आलं ते संध्याकाळच्या व्यायामात कमी प्रमाणात आढळून आलं . दिवसभर आपण नियोजन केलेलं असतं त्यापेक्षा वेगळी आणि अधिकची कामं येऊ शकतात. ज्यात आपली ऊर्जा जास्त जाते. दिवसभर काम करुन थकायला होतं. मग संध्याकाळी व्यायामाच्या वेळेस जी ऊर्जा आणि इच्छाशक्ती हवी असते ती थकव्यामुळे निघून जाते. त्यामुळे आज थकवा आला आहे, व्यायाम नको करायला असं बऱ्याचदा व्हायला लागतं आणि व्यायामाला दांड्या पडतात.

Web Title: What do you get from evening exercise?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.