lokmat Supervote 2024
Lokmat Sakhi >Fitness > बसल्या- बसल्या वेटलॉस करण्याचा सोपा मार्ग, हाताचे प्रेशर पॉईंट्स दाबा आणि पहा बदल

बसल्या- बसल्या वेटलॉस करण्याचा सोपा मार्ग, हाताचे प्रेशर पॉईंट्स दाबा आणि पहा बदल

How to Do Weight Loss Without Exercise: व्यायामाचा कंटाळा ज्या लोकांना येतो, त्यांच्यासाठी वेटलॉस करण्याचा हा एक उत्तम मार्ग आहे. बघा यात नेमकं काय करायचं आहे.

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 20, 2022 06:45 PM2022-10-20T18:45:51+5:302022-10-20T18:47:25+5:30

How to Do Weight Loss Without Exercise: व्यायामाचा कंटाळा ज्या लोकांना येतो, त्यांच्यासाठी वेटलॉस करण्याचा हा एक उत्तम मार्ग आहे. बघा यात नेमकं काय करायचं आहे.

Weight Loss Without Exercise: Use these pressure points for weight loss and improving digestion | बसल्या- बसल्या वेटलॉस करण्याचा सोपा मार्ग, हाताचे प्रेशर पॉईंट्स दाबा आणि पहा बदल

बसल्या- बसल्या वेटलॉस करण्याचा सोपा मार्ग, हाताचे प्रेशर पॉईंट्स दाबा आणि पहा बदल

Highlightsफिटनेससाठी व्यायाम तर गरजेचा आहेच. पण तो जर काही कारणामुळे होत नसेल, तर हे उपाय देखील तुम्हाला फिट रहायला आणि वेटलॉस करायला उपयोगी ठरू शकतात

वजन तर वाढत आहे, पण त्यासाठी व्यायाम करण्याची अनेकांची तयारी नसते. कारण एक तर कंटाळा आणि दुसरं म्हणजे व्यायामासाठी खरोखरच वेळ नसणं. तुमचीही अशीच अडचण असेल तर हा एक सोपा उपाय करून बघा. आता फिटनेससाठी व्यायाम तर गरजेचा आहेच. पण तो जर काही कारणामुळे होत नसेल, तर हे उपाय देखील तुम्हाला फिट रहायला आणि वेटलॉस करायला उपयोगी ठरू शकतात (How to use pressure points for weight loss?). हा उपाय इन्स्टाग्रामच्या yogwithjyoti या पेजवर शेअर करण्यात आला आहे. या उपायामुळे पचनशक्ती (digestion) चांगली होते आणि त्यामुळे आपोआपच शरीरावर अतिरिक्त चरबी (fats) साठत नाही. 

 

वेटलॉससाठी उपयोगी ठरणारे हातावरचे प्रेशर पॉईंट्स
१. पहिल्या प्रकारात दोन्ही हातांची बोटे एकमेकांमध्ये गुंफून घ्या आणि तळहात एकमेकांवर टाळ्या वाजविल्याप्रमाणे वाजवा. एका सिटिंगमध्ये ५० ते १०० वेळा अशी कृती करा. दिवसातून अशा ४ ते ५ सिटिंग करा.

 

 

पणत्या लावताना ८ गोष्टींची डोळ्यात तेल घालून काळजी घ्या; सुरक्षित आणि आनंदी दिवाळी साजरी करा..

२. दुसऱ्या प्रकारात दोन्ही हातांचे पहिले बोट दुमडून घ्या. यानंतर खालील व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे उजव्या हाताच्या उर्वरित ३ बोटांनी डाव्या हाताचा, तर डाव्या हाताच्या ३ बोटांनी उजव्या हाताचा अंगठा पकडा आणि तो दाबा. एका सिटिंगमध्ये २५ ते ३० वेळा अशी कृती करा. दिवसातून अशा ३ ते ४ सिटिंग करा.

 

३. हा तिसरा प्रकार तुम्ही जेव्हा केव्हा बसून उठाल आणि चालायला सुरुवात कराल, तेव्हा करायचा आहे.  पहिले बोट आणि अंगठा एकमेकांवर दाबून प्रेशर द्या.

न बिघडणाऱ्या चकलीची परफेक्ट रेसिपी! तळण्यासाठी तेलही लागेल कमी, करून बघा

ही कृती ६ वेळा करा आणि त्यानंतर उजवा पाय पुढे टाकून चालायला सुरुवात करा. 
या सगळ्या प्रेशर पॉईंट्समुळे पचनक्रिया उत्तम होण्यास मदत होते. 
 

Web Title: Weight Loss Without Exercise: Use these pressure points for weight loss and improving digestion

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.