Join us

पोट सुटलंय, पण जिभेवर ताबाच नाही? ७ दिवसांचा सोपा डाएट प्लॅन; भराभर वजन कमी होईल

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 19, 2024 23:37 IST

Weight Loss Monthly Diet Plan To Burn Fat : लठ्ठपणा स्वत:बरोबर डायबिटीस, थायरॉईड यांसारख्या गंभीर समस्या घेऊन येतो.

वाढतं वजन प्रत्येक  वयोगटातील लोकांसाठी डोकेदुखीचं कारण ठरलं आहे. हे कमी  करण्यासाठी लोक जिम, योगा आणि डाएट करतात,  जेणेकरून शरीराची चरबी कमी करता येईल. लठ्ठपणा स्वत:बरोबर डायबिटीस, थायरॉईड यांसारख्या गंभीर समस्या घेऊन येतो. आठवड्याभराचा डाएट प्लॅन फॉलो करून तुम्ही सहज वजन कमी करू शकता. ज्यामुळे तुमच्या शरीराला परफेक्ट शेप मिळेल. (Weight Loss Monthly Diet Plan To Burn Fat) 

 

वजन कमी करण्यासाठी आठवड्याभराचं डाएट कसं असेल?

१) सोमवारी नाश्त्याला २ ब्राऊन ब्रेड, पनीरच्या  रेसिपीज किंवा पोहे खाऊ शकता, दुपारच्या जेवणात १ चपाती हिरव्या भाज्या, सॅलेड, १ वाटी दही खा आणि संध्याकाळच्या नाश्त्याला तुम्ही स्विट कॉर्न खाऊ शकता तर रात्रीच्या जेवणात ग्रील चिकन खाऊ शकता.

२) मंगळवारी नाश्त्याला २ नाचणीचे डोसे, अर्धी वाटी सांबार, दुपारच्या जेवणात ब्राऊन राईसबरोबर पनीरची भाजी, स्नॅक्समध्ये  २ खजूर,  ५ बदाम आणि उकडलेल्या भाज्या, दही खाऊ शकता तर स्नॅक्समध्ये  २ खजूर, ५ बदाम आणि रात्रीच्या जेवणात एक चपाती किंवा खिचडी खाऊ शकता. 

३) बुधवारी सकाळी नाश्त्यात इडली, दुपारच्या जेवणात १ चपाती, चण्याची भाजी किंवा सॅलेड, ताक पिऊ शकता.

४) गुरूवारी नाश्त्याला १ वाटी भिजवलेले ओट्स, ज्यात कापलेले ड्राय फ्रुट्स असावेत, दुपारच्या जेवणात भाजी, सॅलेड, स्नॅक्समध्ये पनीर आणि रात्रीच्या जेवणात उकडलेल्या भाज्या खाऊ शकता. 

५) शुक्रवारी २ इडल्या, अर्धी वाटी सांबार, दुपारच्या जेवणात १ चपाती, भाजी आणि सॅलेड खाऊ शकता. स्नॅक्समध्ये शेंगदाणे चाट किंवा डिनरमध्ये चिकन सूप प्या.

६) शनिवारी नाश्त्याला  २ बेसनाचे पोळे, हिरवी चटणी, दुपारच्या जेवणात भाजी, ब्राऊन राईस आणि पालक सॅलेड खा, इव्हिनिंग स्नॅक्समध्ये तळलेले चणे आणि रात्रीच्या नाश्त्याला १ चपाती आणि ग्रिल्ड भाज्या खा.

७) रविवारी नाश्त्याला तुम्ही व्हेजिटेबल सॅण्डविच खाऊ शकता,  दुपारच्या जेवणात भाज्या खा, इव्हिनिंग स्नॅक्समध्ये १ कप चहा, कॉफी पिऊ शकता त्यासोबत मखाणे खा. 

टॅग्स :फिटनेस टिप्सहेल्थ टिप्सआरोग्य