Join us

पोट कमी करायचंय, जिभेवर ताबा नाही? १ ग्लास पाण्यात ५ पदार्थ मिसळून प्या, भराभर वजन घटेल

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 6, 2024 08:40 IST

Top 5 Weight Loss Drinks : एका भांड्यात पाणी घेऊन त्यात काकडी,लिंबू, संत्री आणि आलं घाला थोडावेळ फ्रिजमध्ये ठेवा.

सणासुधीच्या काळात गोड,  तेलकट पदार्थ खाल्ल्यामुळे अनेकांचे वजन वाढले आहे. आता शरीर डिटॉक्स करण्यासाठी आणि एक्स्ट्रा फॅट कमी करण्याासाठी तुम्ही काही घरगुती उपाय करू शकता. ज्यामुळे शरीरातील टॉक्सिन्स निघून जाण्यास मदत होईल (Top 5 Weight Loss Drinks). हे ड्रिंक्स तुम्ही घरच्याघरी तयार करू शकतात. हे ड्रिंक्स कसे तयार करायचे ते पाहूया. (How To Loss Weight Using This Drinks)

१) लिंबू पाणी- एक ग्लास पाण्यात अर्ध्या लिंबाचा रस आणि १ चमचा मध मिसळा. सकाळी रिकाम्या पोटी या पाण्याचे सेवन करा. यामुळे मेटाबॉलिझ्म वाढेल आणि शरीर डिटॉक्स होण्यास मदत होईल.

२) आलं आणि लिंबाचा चहा- उकळत्या पाण्यात आल्याचा तुकडा घालून ५ ते १० मिनिटं उकळवून घ्या. यात लिंबाचा रस मिसळून प्या. यामुळे पचन सुधारते आणि भूक चांगली  लागते. 

खोकला-कफ कमीच होत नाहीये? 2 दिवसांत छातीतला कफ बाहेर काढेल हा खास उपाय

३) पुदिन्याचा चहा- पुदिन्याची पानं उकळत्या पाण्यात घाला आणि ५ ते ७ मिनिटं तसंच सोडून द्या त्यानंतर गाळून घ्या. यामुळे पचनक्रिया चांगली राहील आणि शरीर थंड राहण्यास मदत होईल.

४) फळांचे पाणी- एका भांड्यात पाणी घेऊन त्यात काकडी,लिंबू, संत्री आणि आलं घाला थोडावेळ फ्रिजमध्ये ठेवा.  यामुळे शरीर डिटॉक्स होईल आणि डिहायड्रेशनची समस्या उद्भवणार नाही.

दिवाळीत खा-खा खाल्लं, आता वजन वाढलं? ७ दिवसांत वजन कमी करण्याचे ५ उपाय, स्लिम व्हाल

५) ग्रीन टी- एक कप गरम पाण्यात ग्रीन टी ची बॅग घालून  ३ ते ५ मिनिटं तसंच सोडा. नंतर या पाण्याचे सेवन करा. यात मोठ्या प्रमाणात एंटी ऑक्सिडेंट्स असतात ज्यामुळे मेटाबॉलिझ्म वाढतो.

टॅग्स :हेल्थ टिप्सवेट लॉस टिप्सफिटनेस टिप्स