lokmat Supervote 2024
Lokmat Sakhi >Fitness > मल्टीव्हिटामीन्सचा सुपरडोस आहेत ५ पदार्थ; खर्च फक्त 20 रूपये, रोज खा हाडं बळकट होतील

मल्टीव्हिटामीन्सचा सुपरडोस आहेत ५ पदार्थ; खर्च फक्त 20 रूपये, रोज खा हाडं बळकट होतील

Top 5 Multi vitamin Foods For Strong And Healthy Bones (Vitaminsathi kay khave) : . काही फळं, भाज्या, ज्यात मल्टीव्हिटामीन्स भरपूर प्रमाणात असतात.

By ऑनलाइन लोकमत | Published: May 14, 2024 05:13 PM2024-05-14T17:13:27+5:302024-05-14T17:16:27+5:30

Top 5 Multi vitamin Foods For Strong And Healthy Bones (Vitaminsathi kay khave) : . काही फळं, भाज्या, ज्यात मल्टीव्हिटामीन्स भरपूर प्रमाणात असतात.

Top 5 Multivitamin Foods For Strong And Healthy Bones Cheapest Foods For Vitamin | मल्टीव्हिटामीन्सचा सुपरडोस आहेत ५ पदार्थ; खर्च फक्त 20 रूपये, रोज खा हाडं बळकट होतील

मल्टीव्हिटामीन्सचा सुपरडोस आहेत ५ पदार्थ; खर्च फक्त 20 रूपये, रोज खा हाडं बळकट होतील

सर्व प्रकारचे व्हिटामीन्स आणि पोषक तत्व शरीराच्या चांगल्या आरोग्यासाठी महत्वाचे असतात. वाढत्या वयात मल्टी व्हिटामीन्स घेतल्याने शरीराला भरपूर फायदे मिळतात. (Health Tips) कारण वाढत्या वयात शरीरात पोषक तत्वांची कमतरता भासू लागते. अशावेळी तुम्ही आहाराकडे विशेष लक्ष द्यायला हवं. अशा स्थितीत लोक व्हिटाीमीन्स मिळवण्यासाठी मल्टी व्हिटामीन्सच्या सप्लिमेंट्स घेणं सुरू करतात. ज्यामुळे शरीराला नैसर्गिक स्वरूपात मल्टी व्हिटामीन्स मिळतात. (Top 5 Multivitamin Foods For Strong And Healthy Bones)

ऑस्ट्रेलियन डायटरी  गाईडलाईन्सच्या रिपोर्टनुसार नट्स, सीड्सच्या सेवनाने शरीरातील व्हिटामीन्सची कमतरता दूर होण्यास मदत होते. बीयांमध्ये हेल्दी फॅट्स असतात याशिवाय प्रोटीन्सचे प्रमाणही  भरपूर असते. मल्टीव्हिटामीन्स मिळवण्यासाठी कोणत्याही सप्लिमेंट्सवर अवलंबून राहण्याऐवजी तुम्ही आहारात काही पदार्थांचा समावेश करा. याच्या नियमित सेवनाने शरीराला भरपूर प्रमाणात व्हिटामीन्स मिळतील. काही फळं, भाज्या, ज्यात मल्टीव्हिटामीन्स भरपूर प्रमाणात अससतात. म्हणूनच अशा पदार्थांचे आहारातील सेवन वाढवायला हवे. 

बीया

फ्लॅक्स सिड्स आणि भोपळ्याच्या बियांमध्ये व्हिटामीन्स मोठ्या प्रमाणात असतात. जसं की व्हिटामीन बी-1, व्हिटामीन बी2 णि व्हिटामी बी3  सोबत व्हिटामीन ई, कॅल्शियम, पोटॅशियम, मॅग्नेशियम, जिंक आणि आयर्न असते. ज्यातून शरीराला भरपूर फायदे मिळतात.

केल

केल या भाजीचे सेवन ओव्हरऑल आरोग्यासाठी महत्वाचे असते. यात व्हिटामीन के असते. ज्यामुळे ब्लड क्लॉट होत नाही. व्हिटामीन आणि हाडांच्या आरोग्यासाठीही उत्तम आहे. यात व्हिटामीन सी, व्हिटामीन बी6, फायबर्स, मॅग्नीद, पोटॅशियम आणि आयर्नचे प्रमाण जास्त असते. यातील पोषक तत्व मिळवण्यासाठी आठवड्यातून 3 ते 4 वेळ केलच्या ज्यूसचा समावेश करा.

गाजर

गाजरात व्हिटामीन ए, व्हिटामीन सी, व्हिटामीन के, व्हिटामीन ई, फॉलेट, बीटी कॅरोटीन मोठ्या प्रमाणात असते.  या भाजीतून शरीराला भरपूर व्हिटामीन्स मिळतात. ज्यामुळे हृदय, त्वचा आणि डोळ्यांचे आरोग्य चांगले राहण्यास मदत होते. 

पालक

पालकात व्हिटामीन एस, व्हिटामीन के, व्हिटामीन सी, व्हिटामीन बी, फॉलेट, पोटॅशियम, मॅग्नेशियम, ओमेगा-3 फॅटी एसिड्स आणि आयर्न असते. ज्यामुळे  शरीरात हिमोग्लोबीन वाढते आणि पोषक तत्वांची कमतरता दूर होण्यास मदत होते. 
 

Web Title: Top 5 Multivitamin Foods For Strong And Healthy Bones Cheapest Foods For Vitamin

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.