Join us

प्रोटीनसाठी महागड्या गोेष्टी परवडत नाहीत? फक्त १० रुपयांत खा ३ प्रोटीन पदार्थ- हाडं होतील बळकट

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 1, 2024 15:14 IST

Top 4 Cheapest High Protein Foods : दिवसभरातील कार्यांना चालना मिळते. प्रोटीन्सयुक्त पदार्थाचा आहारात समावेश केल्यास थकवा येत नाही आणि शरीर सक्रिय राहते.

प्रोटीन (Protein) फक्त शरीराची संरचना चांगली ठेवण्यासाठी फायदेशीर ठरत नाही तर त्वचा, केस आणि नखं चांगली ठेवण्यासही फायदेशीर ठरते. आहारातज्ज्ञ प्रिती कोरगावकर यांनी महिलांसाठी प्रोटीन का गरजेचे आहे याबाबत सांगितले आहे. (Cheapest Source of Protein) प्रोटीनमुळे महिलांच्या मांसपेशी मजबूत होण्यास मदत होते.  (Foods For Protein) दिवसभरातील कार्यांना चालना मिळते. प्रोटीन्सयुक्त पदार्थाचा आहारात समावेश केल्यास थकवा येत नाही आणि शरीर सक्रिय  राहते शरीराला उर्जा देखिल मिळते. (Top 4 Cheapest High Protein Foods)

प्रोटीन्सचे  नियमित सेवन केल्याने मेटाबॉलिझ्म वाढतो. ज्यामुळे वजन नियंत्रणात राहण्यास मदत होते. महिलांच्या शरीरात हॉर्मोनल संतुलन राहण्यास प्रोटीन्सचे महत्वाचे योगदान आहे. यासाठी हाय क्वालिटी प्रोटीन्सचे परिपूर्ण नट्, सिडस्, बदाम, हेजलनट्स, अक्रोड, शेंगदाणे, चिया सिड्स, भोपळ्याच्या बीया, सुर्यफुलाच्या बीया, पीनट बटर, अंडी, मांस यांसारख्या पदार्थांचे सेवन करा. 

1)  शेंगदाणे

 वेब एमडी च्या रिपोर्टनुसार १ औंस शेंगदाण्यांमध्ये  ७.३ ग्राम प्रोटीन असते. शेंगदाणे तुम्ही रोजच्या जेवणात  खाऊ शकता किंवा नाश्त्याच्या वेळेस मूठभर शेंगदाणे खा किंवा ओटमिल्समध्ये  शेंगदाण्यांचा समावेश करा. शेंगदाण्यांतून गुड फॅट्स आणि प्रोटीन्स शरीराला मिळतात. याशिवाय शेंगदाणे खाल्ल्याने बराचवेळ पोट भरल्यासारखं वाटतं.

2) चणे

 रिपोर्टनुसार भाजलेले चणे कॅल्शियमचा चांगला स्त्रोत आहे. चणे खाल्ल्याने  शरीरात पोषक तत्वांची कमतरता भासत नाही.  चण्यांमध्ये मोठ्या प्रमाणात प्रोटीन्स असतात. (Ref) भाजलेल्या चण्यांमध्ये प्रोटीन्स, फायबर्स, व्हिटामीन्स, फॉलेट, मिनरल्स, फॅटी एसिड्स असतात ज्यामुळे संपूर्ण शरीर एनर्जेटीक राहण्यास मदत होते. यामुळे ब्लड शुगर लेव्हल रेग्युलेट होण्यास मदत होते. प्री डायबिटीक आणि पोस्ट डायबिटीकसाठी हा उत्तम पर्याय आहे.

3) भोपळ्याच्या बीया

भोपळ्याच्या बीयांमध्ये वेगन प्रोटीन असते. यात बीया एंटीऑक्सिडेंट्सनी परिपूर्ण असतात. ज्यामुळे  ताण-तणाव कमी होण्यास मदत होते.  भोपळ्याच्या बीयांच्या सेवनााने शरीराला भरपूर फायदे मिळतात.  शरीर एक्टिव्ह राहते आणि  ब्लड सर्क्युलेशन चांगलं होण्यास देखिल मदत होते. याव्यतिरिक्त तुम्ही  ओट्स, कॉटेज चीझ, ब्लॅक बीन्स, ग्रीन पीस, पीनट बटर या पदार्थांचा आहारात समावेश करू शकता.

 

टॅग्स :फिटनेस टिप्सहेल्थ टिप्सआरोग्य