Join us
Daily Top 2Weekly Top 5

शरीर आतून किती ठणठणीत- निरोगी- सुपरफिट आहे हे सांगणारी ५ लक्षणं, ‘एवढं’ असेल तर राहा बिंधास्त

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 24, 2026 15:29 IST

Healthy Body Signs : काही संकेत असतात ज्यांची आपल्याला स्वत:हून जाणीव होते. अमेरिकेच्या फ्लोरिडातील ऑर्थोपेडिक स्पोर्ट्स सर्जन डॉक्टर डेव्हिड अब्बासी यांनी इन्स्टाग्रामवर एक व्हिडीओ पोस्ट केला आहे. 

Healthy Body Signs : कधीच आजारी न पडणं किंवा शारीरिक कमजोरी न जाणवणं केवळ ही चांगल्या आरोग्याची व्याख्या करता येणार नाही. चांगलं आरोग्य म्हणजे काय तर शारीरिक आणि मानसिक रूपाने पूर्णपणे फिट असणं. एखादी व्यक्ती निरोगी आणि फिट आहे याचे काही खास संकेत असतात. बऱ्याच लोकांना असं वाटत असतं की, ते निरोगी आणि फिट आहेत. पण हे आपण कसं चेक करणार? तर याचे काही संकेत असतात ज्यांची आपल्याला स्वत:हून जाणीव होते.

अमेरिका के फ्लोरिडा स्थित ऑर्थोपेडिक स्पोर्ट्स सर्जन डॉक्टर डेव्हिड अब्बासी यानी इंस्टाग्रामवर एक व्हिडीओ शेअर केला आहे. ज्यात त्यांनी शरीर निरोगी असल्याच्या काही लक्षणांची माहिती दिली आहे. बऱ्याचदा या लक्षणांकडे आपण दुर्लक्ष करतो. अशात पाहूयात की, आपण निरोगी - फिट आहोत याची ५ लक्षणं कोणती आहेत. जे सांगतात की, आपलं शरीर आतून किती फिट आहे. 

निरोगी असण्याचे ५ संकेत 

झोपेत स्वप्न बघणे

जेव्हा आपण झोपलेलो असतो तेव्हा आपलं शरीर आराम करत असतं. पण आत अनेक प्रक्रिया सुरू असतात. हीच ती वेळ असतो जेव्हा शरीर दिवसभराच्या थकव्यातून बाहेर पडतं आणि स्वत:ला रिपेअर करतं. डॉक्टर अब्बासी यांच्यानुसार, फक्त चांगली झोप घेणं पुरेसं नसतं. झोपेत चांगली स्वप्ने येणंही निरोगी शरीराची खूण आहेत. स्वप्ने या गोष्टीचा संकेत देतात की, आपल्याला REM झोप मिळत आहे. REM झोप मेंदूसाठी फार महत्वाची असते. याने स्मरणशक्ती वाढते, मूड चांगला राहतो आणि मेंदू फ्रेश राहतो. त्यामुळे जर आपल्याला झोपेत स्पष्ट आणि लक्षात राहणारे स्वप्न येत असेल हा संकेत आहे की, आपली झोप चांगली आणि गाढ आहे. 

जखम लवकर भरणे 

खरचटणं, एखादी जखम होणं फारच सामान्य आहे. जर जखम लवकर भरत असेल तर आपलं शरीर निरोगी असण्याचा संकेत आहे. जखम लवकर भरणं दर्शवतं की, आपली ब्लड सर्कुलेशन सिस्टीम मजबूत आहे आणि आपली रोगप्रतिकारक शक्तीही मजबूत आहे. आपल्या शरीराला हीलिंगसाठी चांगलं पोषण मिळत आहे. 

टॉयलेटच्या नियमित सवयी 

जर एखाद्या व्यक्तीच्या टॉयलेटसंबंधी सवयी नियमित असतील तर यावरून हे दिसतं की, त्या व्यक्तीची अंतर्गत बायोलॉजिकल घड्याळ वेळेवर चालत आहे. डॉक्टरांनुसार व्यवस्थित पचन होण्याचा अर्थ असा आहे की आतडीमध्ये मायक्रोबायोम आपलं काम व्यवस्थित करत आहेत.

लघवीचा हलका पिवळा रंग  

लघवीचा रंग जर हलका पिवळा असेल तर याचा अर्थ आपलं हायड्रेशन चांगलं आहे. डॉक्टर सांगतात की, जर एखाद्या व्यक्तीच्या लघवीचा रंग हलका पिवळा असेल, तर याचा अर्थ व्यक्ती चांगल्याप्रकारे हायड्रेट राहते.  किडनी आपलं काम योग्यपणे करत आहे. 

अलार्मशिवाय जाग येणे 

जास्तीत जास्त लोक सकाळी झोपेतून उठण्यासाठी अलार्म म्हणजेच गजर लावतात. त्यांना गजर वाजल्याशिवाय जागच येत नाही. पण जर आपल्याला गजरशिवाय रोज सकाळी एकाच वेळी जाग येत असेल तर याचा अर्थ आपली सर्कैडियन रिदम स्थिर झाली आहे. म्हणजे शरीराला हे माहीत आहे की, त्याला काय करायचं आहे. हा निरोगी असण्याची संकेत आहे.

English
हिंदी सारांश
Web Title : Five signs your body is healthy, fit, and working perfectly.

Web Summary : Dreaming, quick wound healing, regular toilet habits, light yellow urine, and waking without an alarm indicate a healthy, well-functioning body. These signs suggest good hydration, a strong immune system, and a stable circadian rhythm.
टॅग्स :फिटनेस टिप्सआरोग्यहेल्थ टिप्स