Join us

बारीक होणं महत्वाचं नाही, आरोग्य जपणं-फिट असणं महत्वाचं! साेनाली कुलकर्णी सांगते, ट्रेंडच्या नादी लागून...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 17, 2025 15:36 IST

Sonali Kulkarni, 50, doesn’t want to be thin at the cost of her health; says slimming drugs are common in Bollywood : Sonali Kulkarni reveals slimming drugs are common in Bollywood : मी माझ्या शरीराचं ऐकते सोनाली कुलकर्णीचा बॉडी-पॉझिटिव्ह दृष्टिकोन सांगतो फिट कसे राहायचे याचे नियम...

सो कुल! अभिनेत्री सोनाली कुलकर्णी (Sonali Kulkarni) सगळ्यांच्याच चांगली परिचयाची. मराठी चित्रपटसृष्टीत ती मोठी सोनाली कुलकर्णी याच नावाने ओळखली जाते. सोनाली कुलकर्णी मराठी चित्रपटसृष्टीतील एक अत्यंत प्रतिष्ठित आणि बहुआयामी व्यक्तिमत्त्व आहेत. सोनालीने आत्तापर्यंत अभिनय, लेखन, आणि निर्मिती या क्षेत्रांमध्ये आपला ठसा उमठवला आहे(Sonali Kulkarni, 50, doesn’t want to be thin at the cost of her health; says slimming drugs are common in Bollywood).

भारतीय चित्रपटसृष्टीत सौंदर्याची एक विशिष्ट व्याख्या गेल्या कित्येक दशकांपासून तयार केली गेली आहे. त्वचेचा गोरा रंग, पातळ शरीर, परफेक्ट फिगर अशी साचेबद्धता पाहायला मिळते. पण या साच्यातून बाहेर पडणाऱ्या काही कलाकारांनी या पारंपरिक सौंदर्यसंकल्पनांना खुलेआम आव्हान दिले आहे. त्यातच नुकतंच एक ठाम, आत्मविश्वासपूर्ण मत मराठी अभिनेत्री सोनाली कुलकर्णी हिने व्यक्त केलं – "बारीक व्हायचंय, पण आरोग्य किंवा हेल्थ पणाला लावून अजिबातच नाही", असं स्पष्ट मत तिने सांगितले आहे(Sonali Kulkarni reveals slimming drugs are common in Bollywood).

सो कुल ! सोनाली कुलकर्णी म्हणते बारीक व्हायचंय पण... 

वयवर्ष ५० असलेली सोनाली कुलकर्णी आजही तितकीच सुंदर आणि कायम ॲक्टिव्ह असते. एका मुलाखतीत बोलताना तिने सांगितलं की बॉलीवूडमध्ये, स्वतःला परफेक्ट फिगरमध्ये ठेवण्यासाठी स्लिमिंग पिल्स आणि वेगवेगळ्या प्रकारचे शॉर्टकट्स या सगळ्या सामान्य गोष्टी आहेत, पण तिला त्या मार्गाने जायचं नाही. तिला स्वतःच्या शरीराचं ऐकायचं आहे – समाजाच्या दबावाखाली येऊन स्वतःला बदलण्याची तिला गरज वाटत नाही. पुढे ती म्हणते, "स्लिम दिसणं हे यशाचं मोजमाप नाही. मला फिट राहायचं आहे, पण कोणाच्या दबावाखाली जाऊन नव्हे."

चालाल तर जगाल! डॉक्टर सांगतात, शुगर आणि वेटलॉससाठी किती वेळ चालावं? चालण्याचे मिळतील दुप्पट फायदे...

वेटलॉस करण्यासाठीचे बॉलिवूडमधील धोकादायक ट्रेंड... 

नुकत्याच झालेल्या एका मुलाखतीत, सोनालीने बॉलिवूडमधील वेटलॉस करण्यासाठीचे धोकादायक ट्रेंड याबद्दल उघडपणे सांगितले आहे. सोनालीच्या मते, बॉलीवूडमध्ये स्लिम दिसण्यासाठी अनेक कलाकार स्लिमिंग ड्रग्ज आणि अनहेल्दी डाएट फॉलो करताना दिसतात. याचबरोबर बॉलिवूडमध्ये बुलेमिया नर्वोसा (अन्नपदार्थ खाणे आणि नंतर उलट्या करणे) आणि स्लिमिंग ड्रग्जचा वापर सामान्य झाल्याचे सांगितले. या पद्धती मानसिक आणि शारीरिक आरोग्यासाठी अत्यंत घातक आहेत.

सोनालीनं म्हटलं की, चित्रपटसृष्टीत वजन कमी करण्याचा ट्रेंड वाढलाय. "मला कल्पना आहे की याची मागणी आहे, कारण मी पडद्यावर काम करते. तुम्ही जितके बारीक असाल, तितके तुम्ही पडद्यावर चांगले दिसता," . पण या औषध म्हणून घेतलेल्या नातेसंबंधांवर आणि मानसिक आरोग्यावर परिणाम होतो, याची चिंता वाटते. पुढे सोनाली म्हणते, "मी माझ्या आयुष्यात अशा टप्प्यावर आहे, जिथं मी स्वतःला प्राधान्य देते. मी स्वतःला सांगत असते की 'मी खास आहे. माझी साइज ही माझी साइज आहे.' माझ्या आरोग्याची किंमत देऊन मला बारीक व्हायचं नाही."

कोमट पाण्यांत मिसळा 'या' तेलाचे फक्त २ थेंब, बेली फॅट होईल कमी, डॉक्टर सांगतात...

सोनालीचा फिटनेस मंत्रा... 

वयाच्या पन्नशीतही सोनाली आजही तितकीच फिट अँड फाईन दिसते. तिच्यामते, एक्सरसाइज करणे गरजेचे आहे. आपण आपल्या फिटनेससाठी दिवसातून किमान ४५ मिनिटे दिली पाहिजेत. या ४५ मिनिटांत तुम्ही योगा करा, जिम करा, चालायला जा, धावायला जा पण काहीतरी एक्सरसाइज जरुर करा. यासोबतच, खाण्याच्या सवयी देखील तितक्याच पाळल्या पाहिजे. लवकर जेवण करणे आणि कुटुंबासोबत जेवणे, हेल्दी आणि आरोग्याला पोषक आणि पौष्टिक असे पदार्थ खाणे. जर आपल्या डेली रुटीनमध्ये अशा लहान - सहान गोष्टीं न चुकता केल्यास त्याचा आपल्या आरोग्यावर चांगला परिणाम दिसून येतो.

सोनाली सगळ्यांना सांगते की, "सौंदर्य म्हणजे केवळ शरीर नाही, तर आत्मविश्वास, मानसिक शांतता आणि आरोग्य आहे." त्यांनी समाजाला आवाहन केले की, "आपल्या शरीराचे ऐका, त्याचा आदर करा आणि बाह्य सौंदर्याच्या मागे धावताना आरोग्याची किंमत लक्षात ठेवा."    

टॅग्स :फिटनेस टिप्सआरोग्यहेल्थ टिप्सवेट लॉस टिप्स