आजच्या वेगवान जीवनात आपण अनेकदा म्हणतो की, "झोपायला वेळ नाही" किंवा "व्यायाम नंतर करू", पण आता रिसर्च स्पष्टपणे सांगत आहे की, याच छोट्या सवयी तुमच्या आरोग्यावर आणि आयुष्यावर मोठा परिणाम करू शकतात. नुकत्याच 'द लॅन्सेट' या मेडिकल जर्नलमध्ये प्रसिद्ध झालेल्या एका रिसर्चने धक्कादायक दावा केला आहे. जर तुम्ही रोज फक्त ५ मिनिटेृं जास्त झोपलात आणि दिवसातून फक्त २ मिनिटं वेगाने चाललात, तर तुमचं आयुष्य सरासरी एक वर्षाने वाढू शकतं. हे ऐकायला कदाचित अविश्वसनीय वाटेल, पण यामागे ठोस वैज्ञानिक आधार आहे.
लॅन्सेटमध्ये प्रसिद्ध झालेल्या या रिसर्चमध्ये हजारो लोकांच्या झोपेची पद्धत, शारीरिक हालचाली आणि आरोग्याशी संबंधित आकडेवारीचं विश्लेषण करण्यात आलं. संशोधकांना असं आढळलं की, जे लोक आपल्या झोपेचा कालावधी थोडा वाढवतात आणि दैनंदिन जीवनात थोडं वेगवान चालतात, त्यांना हृदयविकार, मधुमेह आणि अकाली मृत्यूचा धोका कमी असतो.
रिसर्चनुसार,
रोज ५-१० मिनिटं जास्त झोप घेतल्यास शरीराला उत्तम 'रिकव्हरी' करण्याची संधी मिळते.
केवळ २ मिनिटं वेगाने चालल्यामुळे मेटाबॉलिज्म एक्टिव्ह होतं.
या दोन्ही गोष्टींच्या एकत्रित परिणामामुळे आयुष्य आणि जीवनाचा दर्जा दोन्ही सुधारतो.
५ मिनिटं जास्त झोप का महत्त्वाची आहे?
आपल्याला अनेकदा वाटतं की ५ मिनिटांच्या झोपेने काय फरक पडणार? पण झोप म्हणजे केवळ विश्रांती नव्हे, तर ती शरीराच्या दुरुस्तीची एक प्रक्रिया आहे.
फायदे
मेंदूचा थकवा कमी होतो.
हार्मोन्सचं संतुलन सुधारतं.
रोगप्रतिकारक शक्ती मजबूत होते.
तणाव आणि चिडचिडेपणा कमी होतो.
जेव्हा तुम्ही रोज थोडी जास्त झोप घेता, तेव्हा शरीराला स्वतःची झीज भरून काढण्यासाठी अधिक वेळ मिळतो. म्हणूनच रिसर्चमध्ये याला 'मायक्रो-रिकव्हरी' असं म्हटलं आहे.
२ मिनिटं वेगाने चालल्याने काय होतं?
वेगाने चालणं म्हणजे धावणं नव्हे. याचा अर्थ नॉर्मल चालण्यापेक्षा थोड्या अधिक गतीने चालणं.
फायदे
हृदयाचे ठोके नीट होतात.
रक्ताभिसरण सुधारतं.
कॅलरीज बर्न होतात.
लठ्ठपणा आणि ब्लड शुगर नियंत्रणात राहते.
दिवसभरात अनेक वेळा केलेली १-२ मिनिटांची वेगवान चाल देखील दीर्घकाळात मोठा सकारात्मक परिणाम घडवून आणते.
आयुष्य एक वर्षाने कसं वाढतं?
ही कोणतीही जादू नाही. खरं तर गली झोप आणि हलकी शारीरिक हालचाल मिळून हृदय आणि फुफ्फुसं निरोगी ठेवतात. यामुळे जुन्या आजारांचा धोका कमी होतो आणि शरीराचं वय वाढण्याची प्रक्रिया मंदावते. याच कारणामुळे संशोधक म्हणतात की, अशा सवयी अवलंबल्यामुळे 'लाईफ एक्स्पेक्टन्सी' म्हणजेच सरासरी आयुष्य सुमारे एक वर्षाने वाढू शकतं
आजपासून करा
झोपण्यापूर्वी ५ मिनिटं आधी मोबाईल बाजूला ठेवा आणि झोपा.
ऑफिसमध्ये किंवा घरी फोनवर बोलताना वेगाने चालण्याची सवय लावा.
लिफ्टऐवजी पायऱ्यांचा वापर करताना २ मिनिटं वेगाने चढा.
झोप आणि चालणं या छोट्या गोष्टी समजून त्याकडे दुर्लक्ष करू नका. दीर्घायुष्यासाठी महागड्या सप्लिमेंट्स, औषधं किंवा जिमची गरज नाही, तर दैनंदिन जीवनातील छोट्या सवयीच पुरेशा आहेत. ५ मिनिटं जास्त झोप आणि २ मिनिटं वेगवान चालणं हे छोटे बदल तुमच्या आयुष्यात मोठा फरक आणू शकतात.
Web Summary : A Lancet study reveals that just five extra minutes of sleep and two minutes of brisk walking daily can extend lifespan. These habits improve recovery, boost metabolism, and reduce risks of heart disease and diabetes, promoting a healthier, longer life.
Web Summary : लैंसेट के एक अध्ययन से पता चला है कि रोज़ाना सिर्फ़ पाँच मिनट ज़्यादा नींद और दो मिनट तेज़ चलने से जीवनकाल बढ़ सकता है। ये आदतें रिकवरी को बेहतर बनाती हैं, मेटाबॉलिज़्म को बढ़ाती हैं, और हृदय रोग व मधुमेह के जोखिम को कम करती हैं, जिससे स्वस्थ, लंबा जीवन मिलता है।