Join us
Daily Top 2Weekly Top 5

घरातल्या भिंतीला टेकून उभे राहा आणि 'हा' व्यायाम करा - सुटलेलं पोट होईल सपाट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 5, 2026 16:19 IST

Fitness Tips: पोटावरची चरबी खूप वाढली असेल तर पुढे सांगितलेले काही व्यायाम करून पाहा...(simple exercises to reduce belly fat)

बहुतांश महिलांच्या बाबतीत ही समस्या दिसून येते की साधारण पहिलं बाळंतपण झालं की त्यांच्या पोटाचा घेर वाढायला लागतो. बाकी त्यांचं शरीर प्रमाणात असतं. पण पोट आणि कंबरेचा भाग मात्र सुटायला लागतो. त्यामुळे मग साहजिकच शरीर बेढब दिसू लागतं. हे टाळायचं असेल तर खाण्यावर नियंत्रण हवे आणि काही व्यायाम नियमितपणे करणं गरजेचं आहे. पण त्यातही अशी अडचण येते की व्यायाम करण्याचा कित्येक जणींना कंटाळा येतो तर काही जणींकडे व्यायाम करण्यासाठी वेळच नसतो. म्हणूनच अशा मैत्रिणींसाठी हे कमी वेळेत होणारे काही साधे- सोपे व्यायाम खूप उपयुक्त ठरणारे आहेत...(simple exercises to reduce belly fat)

 

पोटावरची चरबी कमी करण्यासाठी साधे- सोपे व्यायाम 

हे सगळे व्यायाम तुम्हाला भिंतीच्या मदतीने करायचे आहेत. त्यामुळे सगळ्यात आधी तर भिंतीला पाठ लावून सरळ ताठ उभे राहा. त्यानंतर दोन्ही हात वर करा आणि टाचा वर उचलून घ्या.

कीड पडल्याने कुंडीतल्या रोपांची वाढच खुंटली? स्वयंपाकघरातले ४ पदार्थ शिंपडा- बुरशी आणि कीड विसरा..

याच अवस्थेत तुम्हाला जेवढा वेळ शक्य होईल तेवढा वेळ उभं राहा. साधारणपणे ब्रेक घेत केलं तरी १० मिनिटे या अवस्थेत थांबा. पोटावरची चरबी तर कमी होईलच पण खांदे सरळ होऊन बॉडी पोश्चर सुधारण्यासही मदत होईल. 

 

दुसरा व्यायाम करण्यासाठी पाठ, हिप्स भिंतीला टेकलेल्या असू द्या. तळपाय थोडे पुढे घ्या. यानंतर दोन्ही हात वर करून भिंतीला लावा, त्यावेळी हिप्सचा भाग भिंती टेकलेला असू द्या. यानंतर दोन्ही हात खाली घ्या आणि भिंतीला लावा. यावेळी मात्र हिप्सचा भाग भिंतीपासून दूर करा. असं साधारणपणे २५ ते ३० वेळा करा.

वय ३० पण दिसता मात्र पन्नाशीच्या काकू? ५ गोष्टी आजपासून करा, तरच टिकेल तारुण्य- राहाल फिट म्हातारपणीही..

यानंतर भिंतीपासून थोडं दूर उभे राहा. उजव्या बाजुला वळून दोन्ही तळहात भिंतीला लावा. पुन्हा डाव्या बाजुला वळून तळहात भिंतीला लावा. या पद्धतीने एका नंतर एक याप्रमाणे दोन्ही बाजुंनी प्रत्येकी १५- १५ वेळा हा व्यायाम करा. कंबर आणि पोटावरच चरबी कमी होईल. 

 

English
हिंदी सारांश
Web Title : Wall exercises for flat belly: Simple steps to reduce belly fat.

Web Summary : Post-pregnancy belly fat is common. Control diet and exercise. These simple wall exercises can help reduce belly fat. Stand straight against the wall, raise arms, and lift heels. Also, try twists with hands on the wall to target waist fat.
टॅग्स :फिटनेस टिप्सव्यायामवेट लॉस टिप्स