बॉलिवूड अभिनेत्री आणि मोठमोठे सेलिब्रिटीज फिटनेस आणि सौंदर्याची विशेष काळजी घेतात. फिटनेस आणि सौंदर्य उत्तम राखण्यासाठी ते भरपूर वेगवेगळ्या प्रकारच्या ट्रिटमेंट्स तर करतात सोबतच, तितकेच पैसे देखील खर्च करतात. अनेकदा आपणं ऐकतो की अमुक एका अभिनेत्रीने इतकी मोठी सर्जरी करून (Shilpa Shetty Shared Photo On Instagram Doing Electrolysis Foot Bath Know Its Benefits) आपले रुप बदलले किंवा महागड्या ट्रिटमेंट्स केल्या. असे असंख्य उपाय करून कुणी आपल्या त्वचेचा रंग बदलतो तर कुणी ओठाचा आकार. अशा असंख्य ( Shilpa Shetty Did Electrolysis Foot Bath Shared Picture On Social Media Know Its Amazing Benefits) महागड्या ट्रिटमेंट्स करुन तुम्ही स्वतःचा अगदी कायापालट करु शकता. अशातच, बॉलिवूड अभिनेत्री, सेलिब्रिटीज असे काही आगळेवेगळे करताना दिसले की नेहमीच त्याची (Electrolysis Foot Bath Benefits) चर्चा होते, तसेच आपल्यासारख्या बहुतेकजणांना त्यांनी नेमकं काय केला हे जाणून घेण्याची उत्सुकता देखील असते.
अलिकडेच अभिनेत्री शिल्पा शेट्टी देखील अशाच एका खास कारणामुळे चर्चेत आहे. शिल्पा शेट्टीने सोशल मिडीयावर स्वतःचा एक फोटो शेअर केला आहे, ज्यामध्ये ती कोणतीतरी नव्या पद्धतीची ब्यूटी ट्रिटमेंट घेताना दिसत आहे. सोशल मिडीयावर तिचा व्हायरल झालेला फोटो पाहून नेटकऱ्यांनी चक्क गुगल सर्च करुन शिल्पा घेत असलेल्या ब्यूटी ट्रिटमेंटची माहिती घेतली आहे. अशी कोणती वेगळी नवी ब्यूटी ट्रिटमेंट आहे, जी केल्याने शिल्पा शेट्टी (Shilpa Shetty) इतकी व्हायरल होत आहे, ते पाहूयात.
इलेक्ट्रोलिसिस फूट बाथ म्हणजे काय ?
शिल्पा शेट्टीने तिच्या सोशल मिडीयावर, एक फोटो शेअर केला आहे ज्यात ती इलेक्ट्रोलिसिस फूट बाथ करताना दिसत आहे. इलेक्ट्रोलिसिस फूट बाथला आयनिक फूट डिटॉक्स असेही म्हणतात. ही एक प्रकारची डिटॉक्स थेरपी आहे, ज्यामध्ये पाय मीठ मिसळलेल्या कोमट पाण्याच्या टबमध्ये बुडवले जातात आणि इलेक्ट्रॉनिक उपकरणातून त्या टबमध्ये सौम्य विद्युत प्रवाह सोडला जातो. या प्रक्रियेमुळे पाण्यात पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह आयर्न तयार होतात, जे पायांच्या छिद्रांमधून शरीरात असलेले विषारी पदार्थ काढून टाकण्यास मदत करतात. या प्रक्रियेला ३० ते ४० मिनिटे लागतात.
इलेक्ट्रोलिसिस फूट बाथ करताना, टबमध्ये पाणी, मीठ आणि विद्युत प्रवाह सोडल्याने ऊर्जा निर्माण होते, जी आपले शरीर डिटॉक्स करण्यास मदत करते. टबमध्ये असलेल्या पाण्याचा रंग ३० ते ४० मिनिटांत बदलतो. धातूच्या प्लेट्सच्या ऑक्सिडेशनमुळे या पाण्याच्या रंगात बदल होतो. जे पाण्यात असलेल्या घटकांशी प्रतिक्रिया देतात आणि शरीरातील अशुद्धता काढून टाकतात.
इलेक्ट्रोलिसिस फूट बाथ का करावे ?
सध्याच्या बिझी लाईफस्टाईलमध्ये, आपल्याला सतत थकवा येणे, अंगदुखी, किंवा शरीराच्या इतर भागांवर ताण येऊन स्ट्रेस येण्याची समस्या वरचेवर सतावते. अशा परिस्थितीत, इलेक्ट्रोलिसिस फूट बाथ केल्यास शरीराचा ताण कमी होण्यास आणि वेदनांपासून आराम मिळण्यास मदत होते. या इलेक्ट्रोलिसिस फूट बाथमुळे मायग्रेन आणि स्ट्रेस सारख्या समस्या कमी होऊन आराम मिळतो. याचबरोबर, त्वचेचा रंग उजळण्यास आणि त्वचेची हरवलेली चमक पुन्हा आणण्यास मदत होते. शरीराची ऊर्जा वाढते आणि निद्रानाशापासून आराम मिळतो. रोगप्रतिकारक शक्ती मजबूत होते, जे संक्रमणांशी लढण्यास मदत करते. याचबरोबर, स्नायूंचे दुखणे, सांधेदुखी आणि सूज यांसारख्या समस्यांपासून देखील आराम मिळतो.
इलेक्ट्रोलिसिस फूट बाथ कोणी करु नये ?
१. जर तुमच्या पायाला दुखापत झाली असेल किंवा त्वचेवर कोणता कट असेल, त्वचेचा काही भाग कापला असेल किंवा त्वचेशी संबंधित कोणतीही समस्या असेल तर इलेक्ट्रोलिसिस फूट बाथ करणे टाळावे.
२. तज्ज्ञांच्या मते, इलेक्ट्रोलिसिस फूट बाथ महिन्यातून २ किंवा ३ वेळा करता येते.
शिल्पा शेट्टीचे हे खास इलेक्ट्रोलिसिस फूट बाथ शरीर आतून स्वच्छ करण्यासाठी आणि शरीराला आराम देण्यासाठी फायदेशीर असल्याचे म्हटले जाते.