lokmat Supervote 2024
Lokmat Sakhi >Fitness > "व्यायामाला पर्याय नाही...", असं म्हणत शिल्पा शेट्टी करतेय बर्ड- डॉग व्यायाम, बघा कसा करायचा- काय त्याचे फायदे 

"व्यायामाला पर्याय नाही...", असं म्हणत शिल्पा शेट्टी करतेय बर्ड- डॉग व्यायाम, बघा कसा करायचा- काय त्याचे फायदे 

Fitness Tips by Shilpa Shetty: शिल्पा शेट्टी तिचं रोजचं वर्कआऊट सहसा कधीच चुकवत नाही. व्यायामासाठी No excuses असं म्हणत तिने तिचा एक वर्कआऊट व्हिडिओ नुकताच सोशल मिडियावर शेअर केला आहे.( bird- dog workout)

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 18, 2023 08:10 AM2023-01-18T08:10:06+5:302023-01-18T08:15:02+5:30

Fitness Tips by Shilpa Shetty: शिल्पा शेट्टी तिचं रोजचं वर्कआऊट सहसा कधीच चुकवत नाही. व्यायामासाठी No excuses असं म्हणत तिने तिचा एक वर्कआऊट व्हिडिओ नुकताच सोशल मिडियावर शेअर केला आहे.( bird- dog workout)

Shilpa Shetty says no excuses for exercise, Must watch her bird- dog workout and its benefits  | "व्यायामाला पर्याय नाही...", असं म्हणत शिल्पा शेट्टी करतेय बर्ड- डॉग व्यायाम, बघा कसा करायचा- काय त्याचे फायदे 

"व्यायामाला पर्याय नाही...", असं म्हणत शिल्पा शेट्टी करतेय बर्ड- डॉग व्यायाम, बघा कसा करायचा- काय त्याचे फायदे 

Highlightsहा व्यायाम केल्यामुळे खांद्याचे स्नायू मजबूत होण्यास मदत होते.दंड, कंबर आणि मांड्या यांचाही उत्तम व्यायाम होतो. 

शिल्पा शेट्टी आणि तिचा व्यायाम (Shilpa Shetty and her fitness) या दोन गोष्टी नेहमीच चर्चेचा विषय असतात. कारण शिल्पा तिच्या तब्येतीबाबत एवढी जागरुक असते की व्यायाम, डाएट याबाबत ती अजिबातच हयगय करत नाही. रोजचं रुटीन कितीही बिझी असलं तरी तिचं व्यायामाचं वेळापत्रक मात्र हुकत नाही. म्हणूनच तर प्रवासात असताना, गडबडीत असताना कसा झटपट व्यायाम करावा, याविषयीचे बरेचसे वर्कआऊट व्हिडिओही (workout video) तिने सोशल मिडियावर शेअर केले आहेत. आता सध्याही ती बिझी आहे, पण तरीही तिने वर्कआऊट केले.. असं तिच्या इन्स्टाग्राम पोस्टवरून दिसून येतं. (How to do bird- dog workout)

 

कसं करायचं बर्ड- डॉग वर्कआऊट?
व्हिडिओमध्ये शिल्पा जो व्यायाम करते आहे, त्याला बर्ड- डॉग वर्कआऊट असं म्हणतात. हा व्यायाम करण्यासाठी सगळ्यात आधी दोन्ही तळहात आणि दोन्ही गुडघे जमिनीवर टेकवा.

गॅस शेगडीची फ्लेम कमी झाली? घरच्याघरी करा दुरुस्ती, बर्नर स्वच्छ करण्याची बघा खास पद्धत

यानंतर उजवा हात आणि डावा पाय सोबतच वर उचला. उजवा हात समोरच्या दिशेने सरळ पुढे करा तर डावा पाय मागच्या दिशेने सरळ रेषेत मागे करा. मान सरळ ठेवा आणि नजर समोरच्या भिंतीवर स्थिर करा. ही स्थिती ५ ते १० सेकंद टिकवा. नंतर हात आणि पाय जागेवर ठेवून पुन्हा पहिली पोझिशन घ्या. त्यानंतर हीच क्रिया डावा आणि उजव्या पायाने करा. 

 

बर्ड डॉग वर्कआऊटचे फायदे 
१. बॉडी बॅलेसिंगसाठी हा व्यायाम उत्तम मानला जातो.

२. हा व्यायाम केल्यामुळे खांद्याचे स्नायू मजबूत होण्यास मदत होते.

महागडे मॉईश्चरायझर लावूनही त्वचेचा ड्रायनेस कमी होत नाही? वापरा फक्त ३ पदार्थ, त्वचा होईल सुंदर- चमकदार

३. दंड, कंबर आणि मांड्या यांचाही उत्तम व्यायाम होतो. 

४. पाठीचा व्यायाम होण्यासाठीही हा व्यायाम फायदेशीर ठरतो. 
 

Web Title: Shilpa Shetty says no excuses for exercise, Must watch her bird- dog workout and its benefits 

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.