Lokmat Sakhi >Fitness > सलमान खानच्या ट्रेनरने सांगितले सेलिब्रिटी फिटनेस सिक्रेट! रोज करतात ३ गोष्टी, दिसतात देखणे...

सलमान खानच्या ट्रेनरने सांगितले सेलिब्रिटी फिटनेस सिक्रेट! रोज करतात ३ गोष्टी, दिसतात देखणे...

Salman Khans Fitness Trainer Rakkesh Uddiyar Shares 3 Simple Rules For Regular People To Stay Fit : Salman Khan Fitness Trainer Rakesh Udiyar Share The Superstar Fitness Routine : सेलिब्रिटीज सारखा फिटनेस हवाय? रोज करा फक्त ३ गोष्टी - दिसाल फिट अँड फाईन...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 23, 2025 12:00 IST2025-06-23T11:41:07+5:302025-06-23T12:00:38+5:30

Salman Khans Fitness Trainer Rakkesh Uddiyar Shares 3 Simple Rules For Regular People To Stay Fit : Salman Khan Fitness Trainer Rakesh Udiyar Share The Superstar Fitness Routine : सेलिब्रिटीज सारखा फिटनेस हवाय? रोज करा फक्त ३ गोष्टी - दिसाल फिट अँड फाईन...

Salman Khans Fitness Trainer Rakkesh Uddiyar Shares 3 Simple Rules For Regular People To Stay Fit Salman Khan Fitness Trainer Rakesh Udiyar Share The Superstar Fitness Routine | सलमान खानच्या ट्रेनरने सांगितले सेलिब्रिटी फिटनेस सिक्रेट! रोज करतात ३ गोष्टी, दिसतात देखणे...

सलमान खानच्या ट्रेनरने सांगितले सेलिब्रिटी फिटनेस सिक्रेट! रोज करतात ३ गोष्टी, दिसतात देखणे...

बॉलिवूडमधील सर्वात फिट अभिनेत्यांमध्ये सलमान खान आणि विकी कौशल यांसारख्या अभिनेत्यांची नाव घेतली जातात. याचबरोबर, आमिर खान, करण सिंग ग्रोवर आणि बॉबी देओल यांच्या फिटनेस ट्रान्सफॉर्मेशननेही वेळोवेळी चाहत्यांना आश्चर्यचकित केलं आहे. या सर्व अभिनेत्यांच्या ट्रान्सफॉर्मेशन आणि फिटनेसमागे सेलिब्रिटी फिटनेस ट्रेनर आणि कोच राकेश उदियार (Rakesh Udiyar)  यांचे मार्गदर्शन आहे. राकेश गेली २० वर्षं सलमान खानला (Salman Khan) ट्रेन करत आहेत. अनेकवेळा ते त्यांच्या मुलाखतींमध्ये सेलिब्रिटींच्या फिटनेसबद्दल सविस्तर बोलताना दिसतात. सेलिब्रिटी फिटनेस ट्रेनर राकेश उदियार बॉलिवूड अभिनेत्यांच्या फिटनेसची काळजी घेताना, त्यांचा आहार नेमका कसा असावा? त्यांनी कोणत्या प्रकारचा एक्सरसाइज करावा? लाईफस्टाईल कसे असावे? कोणत्या सवयी पाळाव्यात कोणत्या सोडाव्यात याकडे बारकाईने लक्ष देतात(Salman Khans Fitness Trainer Rakkesh Uddiyar Shares 3 Simple Rules For Regular People To Stay Fit).

राकेश उदियार यांच्या म्हणण्यानुसार, फिटनेस म्हणजे फक्त जिमला जाणे आणि डाएट फॉलो करणे इतकेच नाहीतर फिटनेस हा आपल्या लाईफस्टाईलचा भाग व्हायला हवा. सेलिब्रिटींप्रमाणेच आपण आपला देखील फिटनेस मेंटेन ठेवण्यासाठी फिटनेस ट्रेनर राकेश उदियार यांनी फक्त दररोज ३ गोष्टी करण्याचा सल्ला दिला आहे. या तीन गोष्टी आपण नियमितपणे फॉलो ( Salman Khan Fitness Trainer Rakesh Udiyar Share The Superstar Fitness Routine) करून, आपला देखील फिटनेस सेलिब्रिटीजप्रमाणेच मेंटेन करु शकतो, यासाठी कोणते ३ नियम पाळायचे आहेत ते पाहूयात. 

फक्त ३ नियम करा फॉलो आणि राहा फिट अँड फाईन... 

१. फिट राहण्यासाठी राकेश उदियार यांनी सांगितलेला पहिला नियम म्हणजे, दररोज सकाळी उठल्यावर अनवाणी पायाने हिरव्यागार गवतावर चालावं, सूर्यप्रकाश घ्यावा आणि दिवसभरात किमान ३ ते ४ लिटर पाणी प्यावं. केवळ या ३ बेसिक गोष्टींमुळे तुमचा फिटनेस मेंटेंन करण्यास मदत होते. यासोबतच, स्ट्रेस फ्री राहणं देखील तितकंच महत्त्वाचं आहे. 

शुगर कायमच वाढलेली असते? ६ सोप्या गोष्टी करा- शुगरचं टेंशन विसरा-वाढवा ताकद...

२. आपल्या शरीराला सूर्यप्रकाश घेणं खूप गरजेचे असते, कारण बहुतांश लोकांच्या शरीरात व्हिटॅमिन 'डी'ची कमतरता असते. त्यामुळे दररोज सकाळी सूर्यप्रकाशात थोडा वेळ उभे राहा. सकाळच्या वेळेस वातावरण शुद्ध असतं आणि प्रदूषण कमी असतं, म्हणून त्या वेळी मोकळ्या हवेत वेगवेगळ्या प्रकारे श्वसनाचे एक्सरसाइज करा. प्राणायाम करा, ध्यानधारणा करा आणि मन एकाग्र करण्याचा प्रयत्न करा. यामुळे शरीर आणि मन दोन्ही निरोगी रहाते. 

Yoga Day 2025 : ७ देखण्या-सुडौल मराठी अभिनेत्री, रोज करतात योग आणि दिसतात सुपरफिट!

३. घरातील स्वतःची कामे स्वतः करा. घरांतील कामं करणं देखील शरीराला ॲक्टिव्ह आणि फिट ठेवण्यासाठी उपयुक्त आहे. वजन कमी करण्यासाठी आणि सेलिब्रिटींसारखे फिट अँड फाईन राहण्यासाठी आठवड्यातून किमान ३ वेळा वेट ट्रेनिंग करणं फायदेशीर ठरतं. दररोज चालणं देखील आवश्यक आहे, दिवसातून ३ वेळा संतुलित आहार घ्या आणि पुरेशी झोप घ्या. जर तुम्ही पूर्ण झोप घेतलीत तर सकाळी उठल्यावर फ्रेश आणि उत्साही वाटेल. तसेच ३ वेळा मील्स आणि वेट ट्रेनिंग यामुळे तुमचं शरीर योग्य आकारात येईल आणि वजन देखील नियंत्रणात राहील.

 

राकेश उदियार यांचं स्पष्ट म्हणणं आहे की, सेलिब्रिटींसारखा फिटनेस मिळवणं तितकंसं कठीण नाही, जितकं आपल्याला वाटतं. फक्त सातत्य आणि शिस्त यांची गरज आहे.


Web Title: Salman Khans Fitness Trainer Rakkesh Uddiyar Shares 3 Simple Rules For Regular People To Stay Fit Salman Khan Fitness Trainer Rakesh Udiyar Share The Superstar Fitness Routine

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.