राम कपूर (Ram Kapor) यांनी अलिकडेच आपल्या इंस्टाग्रामवर एक फोटो शेअर केला आहे. ज्यात त्यांचा नवीन लूक पाहून फॅन्स हैराण झाले आहेत. अभिनेत्यानं १८ महिन्यात भरपूर मेहनत करून जवळपास ५५ किलो वजन कमी केलं आहे. राम कपूर यांनी आपल्या इंस्टाग्राम ट्रांसफॉर्मेशनबद्दल अनेकांशी बातचीत केली आहे. अनेक पद्धतीनं त्यांनी आपलं टार्गेट मिळवण्यासाठी प्रयत्न केले आहेत. वाढतं वजन नियंत्रणात आणण्यासाठी तुम्हीही असे प्रयत्न करू शकता. (Ram Kapor Weight Loss journey What Is Weight Loss Secret Of Ram Kapor)
राम कपूर यांनी वजन कमी करण्यासाठी काय केलं?
राम कपूर यांचे वजन १४० किलो होते. त्यांनी मेहनत, योग्य व्यायाम करून आपलं वजन ८५ किलो केले. १८ महिने मेहनत केल्यानंतर राम कपूर यांनी वजन कमी केले. राम कपूर यांनी आपल्या आहारात प्रोटीन, कार्ब्स, फॅट बॅलेंन्स केले, राम यांनी डाळी, दही, नॉनव्हेज, नट्स, तांदूळ, गहू, सिड्स फळं, भाज्या खायला सुरूवात केली. हे सर्व पदार्थ खाल्ल्यानं त्यांना पोषण, उर्जा मिळाली. याशिवाय वजन नियंत्रणात राहण्यासही मदत झाली.
राम कपूर यांनी हळूहळू व्यायाम करून आपली फिजिकल स्ट्रेंथ वाढवली. यासाठी त्यांनी स्ट्रेंथ ट्रेनिंगवर फोकस केला. राम कपूर यांनी कार्डिओ स्ट्रेंथ ट्रेनिंग जिम भरपूर व्यायाम केले आणि फोकस केला आहे. राम कपूर कार्डीओ आणि स्ट्रेंथ ट्रेनिंग खूप करत होते.
वजन कमी करण्यासाठी राम कपूर यांनी योग्य प्रमाणात झोप घेतली. वजन कमी करण्यात त्यांची महत्वाची भूमिका होती. ७ ते ८ ताासांची झोप वजन कमी करण्यासाठी पुरेशी आहे. यामुळे लेप्टीन आणि घ्रेलिन बॅलेन्स राहतो. वजन कमी करण्याासठी शरीर डायड्रेट ठेवणं फार महत्वाचं असतं. राम कपूर यांनी वजन कमी करण्यासाठी डाएटचा आधार घेतला.
पूर्ण दिवसभरात कमीत कमी २ ते ३ लिटर पाणी प्यायले ज्यामुळे भूक नियंत्रणात राहण्यास मदत झाली आणि मेटाबॉलिझ्मही वाढला. फास्टींग वजन कमी करण्याचाही परिणामकारक उपाय आहे. याव्यतिरिक्त फास्टींगच्या प्रोससमध्ये शरीरातील चरबी कमी होण्यास मदत होते. राम कपूर यांच्या वजन कमी करण्याच्या प्रवासात हे दिसून येतं की कोणतंही काम मेहनतीशिवाय पूर्ण होऊ शकत नाही.