Join us  

वजन वाढलंय-खाण्यावर कंट्रोल नाही? 2-2-2 मेटाबॉलिझ्म मेथडचा खास फॉम्यूला; स्लिम दिसाल

By ऑनलाइन लोकमत | Published: March 28, 2024 12:17 PM

Quick Weight Loss Tips : वजन कमी करण्यासाठी ही अगदी प्रभावी मेथड आहे.  २-२-२ मेथडने मेटाबॉलिझ्म वेगाने सुधारतो.

आपलं वजन नियंत्रणात राहावं (Weight Loss Tips) आपण मेंटेन सुंदर दिसावं अशी प्रत्येकाचीच इच्छा असते. खाल्लेल्या अन्नाचे व्यवस्थित पचन होण्यासाठी मेटाबॉलिझ्म चांगला असणं गरजेचं असतं. 2-2-2 या युनिक मेथडने मेटाबॉलिझ्म वाढवण्यास मदत होते. यात वेट लॉससाठी कार्बोहायड्रेट्, फॅट्स, प्रोटीन्सचा समावेश केला जातो. वजन कमी करण्यासाठी काही पोषक तत्वांचा आहारात समावेश करायला हवा.(Quick Weight Loss Tips)

६ आठवडे सलग ही टेक्निक फॉलो करून तुम्ही ८ ते ९ किलो वजन कमी करू शकता. वजन कमी करण्यासाठी ही अगदी प्रभावी मेथड आहे.  २-२-२ मेथडने मेटाबॉलिझ्म वेगाने सुधारतो. आहारातज्ज्ञ सना गिन यांनी ओन्ली माय हेल्थशी बोलताना याबाबत अधिक माहिती दिली आहे. (2-2-2 Method Metabolism Technique For Weight Loss)

२-२-२ मेथड मेटाबॉलिझ्म मेथडने खरंच वजन कमी होतं का?

आहारतज्ज्ञ सांगतात की ही मेथड वजन कमी करण्यासाठी एक प्रभावी उपाय आहे. ज्या लोकांमध्ये मेटाबॉलिक फ्लेक्सिबिटी आहे. ते या उपायांनी सहज वजन कमी करू शकतात. काही लोक कार्बोहायड्रेट सहज बर्न करतात तर काहीजणांना कर्बोहायड्रेट बर्न करण्यासाठी बरीच मेहनत घ्यावी लागते. वजन कमी करण्यासाठी फॅट आणि कार्ब्स बर्न करणं आवश्यक असतं. २-२-२ मेथड मेटाबॉलिझ्म हेल्दी डाएट आणि पोषक तत्वांची आवश्यकता असते.

2-2-2 मेथड मेटाबॉझ्मचे फायदे  (2-2-2 Method Metabolism Benefits)

३० ते ४० या वयात मेटाबॉलिझ्म वाढवणं कठीण असतं. या वयात जर तुम्हाला वजन कमी करायचं असेल तर हा उपाय करू शकता.  २-२-२ मेथड मेटाबॉलिझ्म फॉलो करण्यासाठी तुम्ही आवडतं खाणं सोडण्याची काही गरज नाही. तुम्ही सगळं काही खाऊ शकता. हेल्दी वेट लॉस आणि ब्लड शुगर लेव्हल कंट्रोल करण्यासाठी  ही प्रभावी पद्धत आहे. यात हेल्दी फॅट्सचा समावेश असतो  ज्यामुळे हॉर्मोन्स कंट्रोल होतात आणि शरीराला बरीच पोषक तत्व मिळतात. या पद्धतीत तुम्ही कार्ब्सचे सेवन करू सकता. ज्यामुळे थकवा आणि कमकुवतपणा दूर होतो आणि शरीरात एनर्जी वाढते.

२-२-२ मेथड मेटाबॉलिझ्म कसे फॉलो करावे?  (How To Follow 2-2-2 Method Metabolism)

2-2-2 मेथड मेटाबॉलिझ्म फॉलो करण्यासाठी तुम्ही आठवड्यातून ५ दिवस साधं जेवण खाऊ शकता.  याशिवाय फेव्हरिट फुड्सच्या हेल्दी वर्जनवर फोकस करा. आठवड्याभरात २ दिवसांचे कॅलरीज इंटेक  ८०० पर्यंत आणा. सुरूवातीच्या दिवसांत कार्ब्सचे सेवन कमी प्रमाणात करा. ज्यामुळे शरीर निरोगी राहील. ४ आठवड्यानंतर तुम्ही कार्ब्स, फॅट्स, प्रोटीन रिच फूड्सचा आहारात समावेश करू शकता.

टॅग्स :हेल्थ टिप्सआरोग्यफिटनेस टिप्सवेट लॉस टिप्स