Lokmat Sakhi >Fitness > वय ८६ तरी दोरीच्या उड्या मारण्यात नंबर १ मिलिंद सोमणची आई, पाहा १० मिनिटं उड्या मारण्याचे फायदे

वय ८६ तरी दोरीच्या उड्या मारण्यात नंबर १ मिलिंद सोमणची आई, पाहा १० मिनिटं उड्या मारण्याचे फायदे

Milind Soman 86 Years Old Mother Fitness Inspiration : वय वाढतं तसं हाडांची घनता कमी होऊ लागते.

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 11, 2025 13:38 IST2025-08-11T11:39:48+5:302025-08-11T13:38:16+5:30

Milind Soman 86 Years Old Mother Fitness Inspiration : वय वाढतं तसं हाडांची घनता कमी होऊ लागते.

Milind Soman 86 Years Old Mother Fitness Inspiration Daily Skipping Benefits | वय ८६ तरी दोरीच्या उड्या मारण्यात नंबर १ मिलिंद सोमणची आई, पाहा १० मिनिटं उड्या मारण्याचे फायदे

वय ८६ तरी दोरीच्या उड्या मारण्यात नंबर १ मिलिंद सोमणची आई, पाहा १० मिनिटं उड्या मारण्याचे फायदे

एकदा पन्नाशी ओलांडली की फिटनेस रूटीनमध्ये सातत्य ठेवणं अनेकांना जमत नाही. अनेकांना असं वाटतं की, साठी पार केल्यानंतर व्यायाम किंवा चढउतर आपल्याला झेपणार नाही मात्र अभिनेता मिलिंद सोमण त्याच्या फिटनेसमुळे कायम चर्चेत असतो. तो नेहमीच सर्व समान्यांना मोटिव्हेशन देत असतो. मिलिंद सोमणने इंस्टाग्रामवर दोरी उड्यांचा एक व्हिडीओ शेअर केला आहे (Daily Skipping Benefits).

यात त्यांच्यासोबत त्याची आईसुद्धा दोरी उड्या मारताना दिसत आहे. त्यांच्या आईचं वय ८६ वर्ष आहे. त्यांनी व्हिडिओच्या कॅप्शनमध्ये लिहिलंय की, कुटुंबासोबत दोरी उड्या करण्याची वेळ. त्यांच्यासोबत त्यांची आईसुद्धा फिजिकल एक्टिव्हिजमध्ये कायम सहभाग घेत असते. (Milind Soman 86 Years Old Mother Fitness Inspiration Daily Skipping Benefits)


हा फक्त एक फिटनेस रूटीन नसून एक दीर्घायुष्य जगण्याचा एक सोपा उपाय आहे. दोरी उड्या हा एक सोपा व्यायाम आहे. जर तुम्ही रोज हा व्यायाम केला तर फिटनेस लेव्हल कमालीची चांगली राहील आणि दीर्घकाळ हेल्दी, एक्टिव्ह राहू शकाल. हा व्यायाम करण्यासाठी तुम्हाला महागड्या जिम एक्विपमेंट्सची काहीच गरज नाही. जास्त जागाही लागणार नाही.

1) कॅलरी बर्न होतात वजन कमी करण्यासाठी उत्तम

क्लिव्हलॅण्ड क्लिनिकच्या अहवालानुसार 10 मिनिटं दोरी उड्या मारल्यानं 100 कॅलरीज बर्न होण्यास मदत होते. घरच्याघरी कार्डिओ व्यायाम उत्तमरित्या दोरीउड्या मारल्यानं होतो. या व्यायामानं एकाचवेळी संपूर्ण शरीराचा व्यायाम होतो. कुठेही कधीही तुम्ही हा व्यायाम करू शकता. 10 मिनिटांच्या या व्यायामानं 30 मिनिटांच्या जॉगिंग इतका परिणाम शरीरावर होतो आणि शरीर रिलॅक्स राहते.

2)  हाडं मजबूत होतात

वय वाढतं तसं हाडांची घनता कमी होऊ लागते. ज्यामुळे ऑस्टियोपॅरोसिस किंवा फॅक्चरचा धोका वाढतो. हा एक वेट बिअरींग व्यायाम आहे ज्यामुळे हाडं मजबूत राहतात. महिलांसाठी हा फायदेशीर व्यायाम आहे. कारण मेनोपॉजनंतर बोन लॉसचा धोका वाढतो.

3) हात-पाय-डोळे समतोल

दोरी उड्या हा फक्त हात किंवा पायांचा व्यायाम नाही तर पाय डोळे आणि मेंदू या सगळ्यांचा समतोल यामुळे राखता येतो. ज्यामुळे हँण्ड, आय कोऑर्डिनेशन चांगले राहते आणि शरीराची क्षमता वाढते.

4) त्वचा चांगली राहते

ब्लड सर्क्युलेशन चांगले राहिल्यामुळे त्वचा टवटवीत दिसते. शरीर निरोगी राहतं. दोरी उड्या करताना शरीर रिलॅक्स मोडमध्ये असते. मेंदूचा फोकस हालचालींकडे असतो.

Web Title: Milind Soman 86 Years Old Mother Fitness Inspiration Daily Skipping Benefits

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.