बॉलिवूडची अभिनेत्री मलायका अरोरा त्या अभिनेत्रींपैकी एक आहे, जी प्रत्येक वेळी हे सिद्ध करते की वय हा केवळ एक आकडा आहे. फिटनेस आणि माइंडफुलनेसच्या बाबतीत ती सतत नवीन आदर्श निर्माण करत असते.मलायकाची निरोगी लाईफस्टाईल, तिचं सुडौल शरीर आणि चमकदार त्वचा आजही तिच्या लाखो फॅन्सला भुरळ घालते. मलायका स्वतः मानते की तिच्या फिटनेसचं रहस्य फक्त जिममध्ये घाम गाळणे नाही, तर योग्य आहार शिस्त आणि मन-शरीर यांच्यातील बॅलेन्स यात आहे. अलीकडेच, सोहा अली खानच्या 'All About Her' या पॉडकास्टमध्ये मलायकाने (malaika arora diet secrets) तिच्या फिटनेस रुटीनबद्दल मनमोकळेपणाने सांगितले. ती म्हणाली की ती लवकरच ५० वर्षांची होणार आहे, तरीही तिला (Malaika Arora Shares 3 Fitness Rules) आजही स्वतःला खूप तरुण असल्यासारखं वाटतं. तिच्यासाठी वय हा केवळ एक आकडा आहे(malaika arora toned body secrets).
बॉलिवूडमधील स्टाईल आयकॉन मलायका अरोरा ही केवळ तिच्या फॅशनसाठीच नव्हे तर फिटनेस आणि हेल्दी लाईफस्टाईलसाठीही ओळखली जाते. वय जसजसं वाढतं तसं सौंदर्य आणि उर्जा कमी होते हा समज तिने आपल्या फिटनेस आणि लाईफस्टाईलमधून मोडीत काढला आहे. योगा, संतुलित आहार, सकारात्मक विचारसरणी आणि नियमित व्यायाम यांच्या मदतीने मलायकाने स्वतःला आजही तितकंच तरुण आणि टोन ठेवले आहे. वयाच्या पन्नासाव्या वर्षी देखील फिट अँड फाईन दिसण्यासाठी मलायका नेमकं कोणतं सिक्रेट फॉलो करते ते पाहूयात...
मलायकाचा फिटनेस फंडा काय आहे?
मलायका अरोरा हिने सांगितले की, तिच्या फिटनेसचे तत्त्वज्ञान तीन मूलभूत नियमांवर आधारित आहे. झोप, पोषण आणि मन-शरीर यांचे संतुलन तिचे असे मत आहे की, या तिघांमध्ये संतुलन राखल्यास तुम्ही तुमचे आरोग्य आणि फिटनेस दीर्घकाळ टिकवून ठेवू शकता. ती म्हणते की, "पुरेशी झोप घेणे, संतुलित आहार घेणे आणि स्वतःसाठी वेळ काढणे हीच निरोगी शरीर आणि मनाची सर्वात मोठी गुरुकिल्ली आहे."
पोषण हेच सर्वात मोठे सिक्रेट...
मलायकाचे मत आहे की, फिटनेसची सुरुवात स्वयंपाकघरातून होते. तिने स्पष्टपणे सांगितले की ती साधे, घरगुती जेवण खाते. तिच्यासाठी तूप एक 'सुपरफूड' आहे, जे शरीराला ऊर्जा देण्यासोबतच निरोगी ठेवते. ती म्हणते की, "पाणी, झोप, शिस्त आणि सातत्य (consistency) या सगळ्यांवर लक्ष दिल्यास आयुष्यात मोठा फरक दिसून येतो." मलायका खाण्याचे प्रमाण (portion control) जपते, पण ती स्वतःला कधीही उपाशी ठेवत नाही. वर्कआउटनंतर ती सप्लिमेंट्सऐवजी घरगुती जेवण पसंत करते, जसे की टोस्ट,आणि डोसा. जर कधी प्रोटीन शेक घेतलाच, तर तो पावडरपासून बनवलेला नसतो, तर केळी, खजूर आणि सुकामेवा वापरून बनवलेले नैसर्गिक पेय असते.
फास्टिंग शुगर कमी करण्यासाठी खा ३ भाज्या! डायबिटीस राहील नियंत्रणात - वजनही वाढणार नाही...
'स्मार्ट ईटिंग' आहे मलायकाचा मंत्र :-
मलायका सांगते की, फिटनेसचा अर्थ कधीही उपाशी राहणे नाही. ती नेहमी संतुलित आहारावर भर देते. तिचे म्हणणे आहे की, उपाशी राहिल्याने शरीर कमजोर होते आणि त्याचा काहीही फायदा होत नाही. ती नेहमी आपल्यासोबत शूटिंगच्या सेटवर जेवण घेऊन जाते, जेणेकरून गरज पडल्यास पौष्टिक स्नॅक खाता येईल. तिने हे देखील सांगितले की, ती कधीही पोटभरून जेवून व्यायाम करत नाही. तिचे डेली रुटीन असे आहे की, ती सकाळी लवकर उठते, रिकाम्या पोटी व्यायाम करते आणि नंतर एक पौष्टिक आणि भरपूर आहार घेते.
एक्सरसाइज मध्ये वैविध्य (Variety) ठेवते :-
फिटनेस मनोरंजक ठेवण्यासाठी मलायका वेगवेगळ्या प्रकारचे वर्कआउट्स करते. तिला योगा खूप आवडतो, जो ती उच्च-तीव्रता अंतराल प्रशिक्षण (HIIT) सोबत करते. या व्यतिरिक्त, ती तिच्या दिनचर्येत पिलाटेस, स्ट्रेंथ ट्रेनिंग आणि पूर्ण-शरीर वर्कआउट (full-body workout) यांचाही समावेश करते. ती सांगते की, वेगवेगळे व्यायाम केल्याने केवळ शरीर सुडौल राहत नाही, तर ऊर्जेची पातळीही (energy level) जास्त राहते आणि दिवसभर कंटाळा येत नाही.
टॉवेलच्या मदतीने नाकावरील ब्लॅकहेड्स काढा सेकंदात! विसरा पार्लरची झंझट - त्वचा दिसेल कायम तरुण...
मलायका देते तिच्या फिटनेसमधून हा संदेश...
मलायका अरोराची फिटनेस जर्नी अशा प्रत्येक व्यक्तीसाठी खास आहे, ज्यांना वाटते की वाढत्या वयानुसार फिटनेस कमी होतो. ती हे दाखवून देते की, जर तुम्ही योग्य आहार, योग्य व्यायाम आणि योग्य लाईफस्टाईलची स्वतःला सवय लावली, तर कोणत्याही वयात तुम्ही स्वतःला उत्साही आणि तरुण ठेवू शकता. तिची शिस्त आणि सातत्य हे सिद्ध करते की फिटनेस केवळ जिममध्ये जाण्याने येत नाही, तर तो तुमच्या दैनंदिन सवयींमधून तयार होतो.