Join us

फिटनेस फंडा! १५ मिनिटं दोरी उड्या मारून किती कॅलरीज होतात बर्न?

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 25, 2025 15:35 IST

जर तुम्ही दररोज फक्त १५ मिनिटं दोरी उड्या मारायला सुरुवात केली तर तुम्ही किती कॅलरीज बर्न करू शकता याबाबत जाणून घेऊया...

वजन कमी करण्यासाठी लोक वेगवेगळ्या पद्धती वापरून पाहतात, त्यापैकी एक म्हणजे दोरी उड्या मारणं. यामुळे कॅलरीज वेगाने बर्न होतात. म्हणूनच लोक वजन कमी करण्यासाठी अनेकदा दोरी उड्या मारणं हा पर्याय निवडतात. जर तुम्ही दररोज फक्त १५ मिनिटं दोरी उड्या मारायला सुरुवात केली तर तुम्ही किती कॅलरीज बर्न करू शकता याबाबत जाणून घेऊया...

कॅलरीज कशा करायच्या बर्न?

- १५ मिनिटं दोरीने उडी मारल्याने ३५० ते ४०० कॅलरीज बर्न होऊ शकतात. याचा अर्थ असा की, तुम्ही एका दिवसात तुमच्या शरीरातून ८०० ते ९०० कॅलरीज सहजपणे बर्न करू शकता.

- जर ९० किलो वजनाच्या व्यक्तीने १ मिनिटात १०० वेळा दोरी उड्या मारल्या तर तो १५ मिनिटांत २०७ कॅलरीज बर्न करेल. त्याच वेळी, जर ८५ किलो वजनाच्या व्यक्तीने १ मिनिटात १०० वेळा दोरी उड्या मारल्या तर तो १५ मिनिटांत १९६ कॅलरीज बर्न करेल.

- तर जर ८० किलो वजनाच्या व्यक्तीने १ मिनिटात १०० वेळा दोरी उड्या मारल्या तर तो १५ मिनिटांत १८४ कॅलरीज बर्न करेल. जर ७५ किलो वजनाच्या व्यक्तीने १ मिनिटात १०० वेळा दोरी उड्या मारल्या तर तो १५ मिनिटांत १७३ कॅलरीज बर्न करेल.

- जर ७० किलो वजनाच्या व्यक्तीने १ मिनिटात १०० वेळा दोरी उड्या मारल्या तर तो १५ मिनिटांत १६१ कॅलरीज बर्न करेल. त्याच वेळी ६५ किलो वजनाची व्यक्ती १५ मिनिटांत १५० कॅलरीज बर्न करेल.

वजन कमी करण्यासाठी काही इतर टिप्स

- तुम्ही नियमित व्यायाम केला पाहिजे.

- तुमची व्यायाम करण्याची वेळ वाढवा.

- तुमच्या आहारात निरोगी आणि पौष्टिक पदार्थांचा समावेश करा.

- शरीराला पुरेशी विश्रांती द्या आणि ते हायड्रेटेड ठेवा.

- धावणं, सायकलिंग, पोहणं इत्यादी कार्डिओ व्यायामांचा समावेश करा.

- वजन उचलणं, पुश-अप्स, स्क्वॅट्ससारखे स्ट्रेंथ ट्रेनिंग व्यायाम करा. 

टॅग्स :फिटनेस टिप्सहेल्थ टिप्सआरोग्य