Lokmat Sakhi >Fitness > बोहल्यावर चढण्याच्या तयारीत असलेल्या पी. व्ही सिंधूचे पाहा हेल्दी डाएट; ग्लो आणि फिटनेसचं सिक्रेट

बोहल्यावर चढण्याच्या तयारीत असलेल्या पी. व्ही सिंधूचे पाहा हेल्दी डाएट; ग्लो आणि फिटनेसचं सिक्रेट

Diet Plan And Foods Of Bride To Be PV Sindhu : पिव्ही सिंधूचे लग्न उदयपूरमध्ये होईल आणि ग्रांड रिसेप्शन  २४ डिसेंबरला हैदराबादमध्ये होणार आहे.

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 9, 2024 09:06 IST2024-12-09T08:58:37+5:302024-12-09T09:06:56+5:30

Diet Plan And Foods Of Bride To Be PV Sindhu : पिव्ही सिंधूचे लग्न उदयपूरमध्ये होईल आणि ग्रांड रिसेप्शन  २४ डिसेंबरला हैदराबादमध्ये होणार आहे.

Know Diet Plan And Foods Of Bride To Be PV Sindhu : Diet Plan And Foods Of Bride To Be PV Sindhu  | बोहल्यावर चढण्याच्या तयारीत असलेल्या पी. व्ही सिंधूचे पाहा हेल्दी डाएट; ग्लो आणि फिटनेसचं सिक्रेट

बोहल्यावर चढण्याच्या तयारीत असलेल्या पी. व्ही सिंधूचे पाहा हेल्दी डाएट; ग्लो आणि फिटनेसचं सिक्रेट

देशाची बॅडमिंटन स्टार आणि ऑलिंपिक मेडलिस्ट पी. व्ही सिंधू लवकरच लग्न बंधनात अडकणार आहे. आपल्या करियरमध्ये अनेक मोठ्या कामागिरींसाठी ओळखली जाणारी पी व्ही सिंधू २२ डिसेंबरला वेंकट दत्ताशी पवित्र लग्न बंधनात अडकणार आहे. या लग्नाचे विधी २० डिसेंबरपासून सुरू होणार आहेत. पिव्ही सिंधूचे लग्न उदयपूरमध्ये होईल आणि ग्रांड रिसेप्शन  २४ डिसेंबरला हैदराबादमध्ये होणार आहे.. देश विदेशातील बरेच खेळाडू या सोहळ्यास उपस्थित राहणार आहेत. (Diet Plan And Foods Of Bride To Be PV Sindhu)

ब्रेकफास्ट

कोणत्याही व्यक्तीसाठी सकाळचा नाश्ता हा फार महत्वाचा असतो. कारण नाश्ता केल्यानं तुम्हाला दिवसभराची एनर्जी मिळते. पिव्ही सिंधू ब्रेकफास्टमध्ये दूध, अंडी असे पदार्थ खाणं पसंत करते. दूध आणि अंडी प्रोटीनचा चांगला सोर्स आहेत. दूध आणि अंड नाश्त्याला खाण्याबरोबरच ती ताजी फळं खाणं पसंत करते. यातून व्हिटामीन्स आणि मिनरल्स  मिळतात.

लंच मिड डे स्नॅक्स

पिव्ही सिंधूचा लंच पोषक तत्वांनी परीपूर्ण असतो. ती तिच्या नाश्त्यात ग्रिल्ड चिकन आणि भात खाणं पसंत करते. याव्यतिरिक्त तिला भाज्या फार आवडतात. पी. व्ही सिंधूचा लंच असा असतो की तिला यातून भरपूर कार्ब्स मिळतात.   संध्याकाळच्यावेळी भूक लागल्यास ती हलका, फुलका आहार घेते. या स्नॅक्समध्ये रोस्डेट ड्रायफ्रुट्स असतात. यामुळे एनर्जेटीक वाटतं.

प्री वर्कआऊट मील

इंटेस वर्कआऊट करण्याआधी ती भरपूर भाज्या खाते. यातून तिला एनर्जी मिळते. पिव्ही सिंधू वर्कआऊटच्या आधी केळी खाणं पसंत करते. वर्कआऊटनंतर प्रोटीन शेक पिते. ज्यातून तिला भरपूर प्रोटीन मिळतं.

रात्रीचं जेवण

रात्रीच्या जेवण ती लवकर करते. जेणेकरून खाल्लेल्या अन्नाचं पचन व्यवस्थित होईल तिच्या आहारात अनेक भाज्या, तांदूळ यांचा समावेश असतो. पी.व्ही सिंधू घरी बनलेलं जेवण खाणं पसंत करते. ते अगदी कमीत कमी तेलात बनवलं असतं.

पिव्ही सिंधूचा फिटनेस मंत्र

पीव्ही संधूचा फिटनेस मंत्र आहे मेहनत आणि जिद्द. एक खेळाडू असल्याने ती मेहनत आणि वर्कआऊट भरपूर करते. पीव्ही सिंधू दिवसातून  रोज ८ तास ट्रेनिंग करते. याव्यतिरिक्त व्यायाम, वर्कआऊट आणि योगासुद्धा या लिस्टमध्ये आहे. त्यामुळे पाय, गुडघे आणि खांद्यांवर फोकस येतो.

Web Title: Know Diet Plan And Foods Of Bride To Be PV Sindhu : Diet Plan And Foods Of Bride To Be PV Sindhu 

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.