lokmat Supervote 2024
Lokmat Sakhi >Fitness > पोटावरची चरबी वाढू नये म्हणून करिना कपूर करते 'हा' उपाय, बघा तिचं फिटनेस सिक्रेट

पोटावरची चरबी वाढू नये म्हणून करिना कपूर करते 'हा' उपाय, बघा तिचं फिटनेस सिक्रेट

How To Get Perfect Figure Like Kareena Kapoor: करिना कपूरच्या सपाट पोटामागचं रहस्य काय असू शकतं, हे जाणून घ्यायचं असेल तर तिने शेअर केलेली ही पोस्ट एकदा बघाच... (how to reduce belly fat)

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 16, 2024 12:49 PM2024-04-16T12:49:17+5:302024-04-16T12:51:00+5:30

How To Get Perfect Figure Like Kareena Kapoor: करिना कपूरच्या सपाट पोटामागचं रहस्य काय असू शकतं, हे जाणून घ्यायचं असेल तर तिने शेअर केलेली ही पोस्ट एकदा बघाच... (how to reduce belly fat)

Kareena kapoors fitness secret for flat belly, how to get perfect figure like kareena kapoor, how to reduce belly fat | पोटावरची चरबी वाढू नये म्हणून करिना कपूर करते 'हा' उपाय, बघा तिचं फिटनेस सिक्रेट

पोटावरची चरबी वाढू नये म्हणून करिना कपूर करते 'हा' उपाय, बघा तिचं फिटनेस सिक्रेट

Highlightsकरिनाने दुसऱ्या बाळंतपणानंतरही स्वत:ची तब्येत कशी मेंटेन केली असावी, हा प्रश्न तिच्या अनेक महिला चाहत्यांना पडलेला आहे.

बेबो म्हणजेच करिना कपूर सध्या 'क्रू' चित्रपटाच्या जबरदस्त यशामुळे चर्चेत आहे. करिना कपूर, तब्बू आणि क्रिती सेनन या तिघींचा हा चित्रपट सध्या जबरदस्त गाजतो आहे. चित्रपटाच्या निमित्ताने पुन्हा एकदा करिनाचा जबरदस्त फिटनेस समोर आला असून दोन मुलांची आई असूनही तिने स्वत:ला ज्या पद्धतीने मेंटेन केलं आहे, त्यामुळे तिचं कौतूक होत आहे. साधारण एका अपत्याच्या जन्मानंतरच अनेकींचं पोट खूप सुटतं (Kareena kapoors fitness secret for flat belly). त्यात करिनाने दुसऱ्या बाळंतपणानंतरही स्वत:ची तब्येत कशी मेंटेन केली असावी, हा प्रश्न तिच्या अनेक महिला चाहत्यांना पडलेला आहे (how to get perfect figure like kareena kapoor). या प्रश्नाचं उत्तर पाहिजे असेल तर तिने इन्स्टाग्रामवर शेअर केलेली एक पोस्ट बघाच... (how to reduce belly fat)

 

करिना कपूरने रविवारी तिचा योगासनं करतानाचा एक फोटो इन्स्टाग्रामवर शेअर केला होता. "Sunday plans?
Yoga for me… Crew for you" अशा पद्धतीचं कॅप्शन तिने त्या फोटोला दिलं असून त्यामध्ये ती चक्रासन करताना दिसते आहे. तुमचा फिटनेस चांगला असेल तर तुम्ही ते करिना जसं करतेय तसं उत्तम पद्धतीने करू शकता.

आपण चांगले पालक आहोत हे आईबाबांनी कसे ओळखायचे? सद्गुरू सांगतात एक खास गोष्ट...

मणक्याला पुर्णपणे उलट दिशेने वाकवणारं हे योगासनं अतिशय उपयुक्त आहे. हे आसन करण्यासाठी सुरुवातीला जमिनीवर पाठ टेकवून झोपा. त्यानंतर पाय गुडघ्यात वाकवा. दोन्ही हातांचे तळवे डोक्याच्या बाजुला जमिनीवर टेकवा.

फक्त २० रुपयांत चमकेल चेहरा, बघा कोरियन तरुणींसारखी सुंदर त्वचा मिळविण्याचा खास उपाय

आता कंबर आणि डोकं सुरुवातीला उचलून हळूहळू सगळं शरीर उचलण्याचा प्रयत्न करा. हे आसन करायला थोडं अवघड आहे. त्यामुळे सुरुवातीला याेगाविषयक जाणकार असलेल्या व्यक्तीसमोरच ते करा.

 

चक्रासन करण्याचे फायदे

१. पोटावरची चरबी कमी करण्यासाठी त्याचा खूप फायदा होतो. बाळंतपणानंतर पोट सुटू नये, म्हणून अनेकींना हे आसन करण्याचा सल्ला दिला जातो. 

२. चक्रासन केल्याने पाठीच्या मणक्याचा चांगला व्यायाम होतो.

पालक लवकर खराब होतो, २- ३ दिवसांतच सडतो? बघा सोपा उपाय- आठवडाभर राहील फ्रेश

३. चक्रासन नियमितपणे केल्यास मासिक पाळीतला त्रास बऱ्याच प्रमाणात कमी होतो.

४. या आसनाने मेंदूला चांगल्याप्रकारे रक्तपुरवठा होतो. त्यामुळे एकाग्रता वाढण्यासाठी, झोप चांगली येण्यासाठी फायदेशीर ठरते.

५. हे आसन केल्याने चेहऱ्यावरही छान तेज येते. 


 

Web Title: Kareena kapoors fitness secret for flat belly, how to get perfect figure like kareena kapoor, how to reduce belly fat

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.