Join us
Daily Top 2Weekly Top 5

ना जिम ना डाएट, म्हातारेही दिसतात तरुण, जपानी लोकांच्या ५ सवयी म्हणजे दीर्घायुष्य आणि तारुण्याचं वरदान...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 29, 2026 17:24 IST

Japanese lifestyle habits for weight loss and long life : habits of Japanese people for longevity : how Japanese people maintain fitness and longevity naturally : जास्त मेहनत न करता फिट राहण्यासाठी जपानी लोक स्वतःला लावतात फक्त या ५ सवयी...

हेल्दी आणि फिट राहण्याची गोष्ट येते, तेव्हा संपूर्ण जगात 'जपानी लाईफस्टाईल' सगळ्यात अव्वल मानली जाते. जपानचे लोक केवळ दीर्घायुषी नसतात, तर ते वाढत्या वयातही तरुणांसारखेच ॲक्टिव्ह आणि एनर्जेटिक असतात. आपण अनेकदा फिटनेससाठी डाएट किंवा एक्सरसाइजला प्राधान्य देतो, पण जपानी लोकांच्या फिटनेसचे खरे सिक्रेट त्यांच्या जीवन जगण्याच्या पद्धतीत आहे(Japanese lifestyle habits for weight loss and long life).

जपानमधील लोक वयाची शंभरी ओलांडल्यानंतरही इतके उत्साही आणि फिट कसे असतात? असा प्रश्न कित्येकदा आपल्याला पडतो. जेव्हा आपण जिम आणि डाएटच्या चक्रात अडकलेलो असतो, तेव्हा जपानी लोक मात्र कोणत्याही कठोर मेहनतीशिवाय नैसर्गिकरीत्या दीर्घायुष्य जगत असतात. त्यांचं हे 'फिटनेस सिक्रेट' त्यांच्या जिममध्ये नाही, तर त्यांच्या (habits of Japanese people for longevity) रोजच्या छोट्या छोट्या सवयींमध्ये दडलेले आहे. जर तुम्हालाही जास्त घाम न गाळता आणि स्वतःला न थकवता निरोगी राहायचे असेल, तर जपानी लाईफस्टाईलमधील काही 'मॅजिकल' बदल समजून घ्यायला हवेत. निरोगी राहण्यासाठी जपानी लोकांच्या कोणत्या सोप्या सवयी आपण आपल्या (how Japanese people maintain fitness and longevity naturally) आयुष्यात उतरवू शकतो, ज्यामुळे आपल्या जीवनात चांगला आणि सकारात्मक बदल घडून येईल? ते पाहूयात. 

जपानी लोकांच्या 'या' सवयींमुळे होतात दीर्घायुषी...

१. जेवण - अन्नपदार्थ हळूहळू चावून खा :- जपानी लोक जेवण अतिशय आरामात आणि हळूहळू चावून खातात. यामुळे अन्न चांगल्या प्रकारे पचते आणि कमी खाऊनही पोट भरल्यासारखे वाटते. ही सवय ओव्हरईटिंगपासून वाचवते आणि वजन नियंत्रणात ठेवण्यास मदत करते.  

वेटलॉस करताना आंबा खा मनसोक्त! दिवसाला किती आणि कधी आंबा खावा? पोटभर खाऊनही वाढणार नाही वजन... 

२. जेवणात वेगवेगळ्या प्रकारचे पदार्थ खावेत :- जपानमध्ये लोक एकाच वेळी जास्त प्रमाणात खाण्याऐवजी, वेगवेगळे पदार्थ थोड्या-थोड्या प्रमाणात खातात. यामुळे शरीराला अनेक प्रकारचे पोषक तत्व मिळतात आणि जेवणात वैविध्यही टिकून राहते, तर या सवयीमुळे जास्त खाण्याची सवय देखील टाळता येते. 

३. स्वत:ला कायम ॲक्टिव्ह ठेवा :- जपानी लोक आपल्या डेली रुटीनमध्ये फिजिकल ॲक्टिव्हिटीचा न चुकता समावेश करतात. ते वारंवार पायी चालतात किंवा सायकलचा वापर करतात. यामुळे त्यांचे शरीर ॲक्टिव्ह राहते आणि फिटनेस देखील चांगला टिकून राहतो.

डोक्यांत सतत निगेटिव्ह विचार येतात ? रोज करा फक्त ५ गोष्टी - मन शांत ठेवण्याची मॅजिकल ट्रिक...

४. एकूण भुकेच्या फक्त ८०% खा :- जपानमध्ये 'हारा हाची बू' नावाची परंपरा आहे, ज्यामध्ये लोक आपल्या एकूण भुकेच्या फक्त ८०% भागच खातात. ही सवय जास्त खाण्यापासून रोखते आणि वजनाचा बॅलन्स राखण्यास मदत करते.

५. ग्रीन टी :- ग्रीन टी जपानी संस्कृतीचा महत्त्वाचा भाग आहे. यामध्ये भरपूर अँटी-ऑक्सिडंट असतात जे मेटाबॉलिझम वेगवान करतात आणि शरीराला डिटॉक्स करण्यास मदत करतात. नियमित ग्रीन टी पिण्यामुळे पचन सुधारते आणि वजन नियंत्रणात राहते.

जर तुम्हालाही फिट आणि हेल्दी राहायचे असेल तर तुम्ही या सोप्या सवयी आपल्या डेली रुटीनमध्ये सामील करू शकता. या छोट्या-छोट्या सवयी तुमच्या लाईफस्टाईलमध्ये मोठा बदल घडवून आणू शकतात.

English
हिंदी सारांश
Web Title : Japanese habits for longevity: No gym, no diet, just a youthful life.

Web Summary : Japanese people live long, energetic lives by adopting simple habits. These include eating slowly, savoring diverse foods, staying active, practicing mindful eating (80% full), and drinking green tea. These habits promote overall health and well-being without extreme diets or workouts.
टॅग्स :फिटनेस टिप्सआरोग्यहेल्थ टिप्सजपानवेट लॉस टिप्स