Daily Top 2Weekly Top 5
Lokmat Sakhi >Fitness > रोज फक्त काही वेळ पायी चालून पूर्ण शरीर फिट राहतं का? पाहा एक्सपर्टचं मत, नाही तर होईल उशीर

रोज फक्त काही वेळ पायी चालून पूर्ण शरीर फिट राहतं का? पाहा एक्सपर्टचं मत, नाही तर होईल उशीर

Is Walking Enough For Fitness : बऱ्याच लोकांचं तर असंही मत असतं की, केवळ चालूनच आपण फिट राहू शकतो. पण खरंच असं होतं का? चला जाणून घेऊया काय आहे यावर एक्सपर्टचं मत...

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 25, 2026 09:44 IST2026-02-25T09:39:31+5:302026-02-25T09:44:37+5:30

Is Walking Enough For Fitness : बऱ्याच लोकांचं तर असंही मत असतं की, केवळ चालूनच आपण फिट राहू शकतो. पण खरंच असं होतं का? चला जाणून घेऊया काय आहे यावर एक्सपर्टचं मत...

Is walking enough exercise for completely body fitness, know what expert says | रोज फक्त काही वेळ पायी चालून पूर्ण शरीर फिट राहतं का? पाहा एक्सपर्टचं मत, नाही तर होईल उशीर

रोज फक्त काही वेळ पायी चालून पूर्ण शरीर फिट राहतं का? पाहा एक्सपर्टचं मत, नाही तर होईल उशीर

Is Walking Enough For Fitness : आजार टाळायचेत, फिट रहायचंय, हॉस्पिटलचा खर्च टाळायचाय, स्ट्रेस कमी करायचय, आनंदी रहायचंय या सगळ्या गोष्टींसाठी लोक अलिकडे आपल्या फिटनेसकडे बरंच गंभीरतेने बघत आहेत. यासाठी लोक जिम, योगा, रनिंग आणि इतरही अनेक हाय इंटेंसिटी ट्रेनिंगसारख्या गोष्टी करतात. पण एक व्यायाम सगळ्यात जास्त केला जातो, तो म्हणजे चालणे. चालणं हा सगळ्यात सोपा व्यायाम आहे. कारण यासाठी ना पैसे खर्च करावे लागतात, ना वेगळं काही करावं लागत. फक्त वेळ काढा आणि चालायला लागा. जेवण झाल्यावर काही वेळ चालण्याची अनेकांना सवय असते. बऱ्याच लोकांचं तर असंही मत असतं की, केवळ चालूनच आपण फिट राहू शकतो. पण खरंच असं होतं का? चला जाणून घेऊया काय आहे यावर एक्सपर्टचं मत...

फिटनेससाठी फक्त वॉक पुरेसा आहे का?

फिटनेस एक्सपर्ट सांगतात की, वॉकिंग एक चांगली फिजिकल अॅक्टिविटी आहे. पण याला परिपूर्ण असा व्यायाम म्हणता येणार नाही. पायी चालल्याने ब्लड सर्कुलेशन सुधारतं, मूड चांगला पाहतो, जॉइंट्सची लवचिकता वाढते आणि तणाव कमी होतो. हृदय फिट ठेवण्यासाठी आणि पोटाचा घेर कमी करण्यासाठी देखील पायी चालणं खूप फायदेशीर असतं. खासकरून जे लोक फिटनेसची सुरूवात करतात, जे वृद्ध आहेत, आजारातून किंवा जखमेनंतर पुन्हा अॅक्टिव होत आहेत, त्यांसाठी नियमितपणे वेगाने चालणं फार फायदेशीर ठरू शकतं. 

वॉकसोबत स्ट्रेंथ ट्रेनिंग गरजेची 

मुळात मुद्दा असा आहे की, फक्त पायी चालून स्नायू मजबूत होत नाहीत. जसजसं वय वाढतं तसतसे शरीरातील स्नायू कमी होऊ लागतात. जर आपण या गोष्टीला आव्हान दिलं नाही तर ते हळूहळू कमजोर होतील. त्यामुळे आठवड्यातून २ ते ४ दिवस स्ट्रेंथ ट्रेनिंग, जसे की, वेट लिफ्टिंग किंवा बॉडी वेट एक्सरसाईज करणं गरजेचं आहे. याने मेटाबॉलिज्म बूस्ट होतं आणि हाडेही मजबूत होतात. 

वॉक करताना काय काळजी घ्यावी? 

लक्षात ठेवा की, चालण्याची पद्धत एकसारखी नसते. मार्केटमध्ये आराम फिरणं आणि फिटनेससाठी वेगाने चालणं यात फरक असतो. चालताना आपली स्पीड योग्य असणं महत्वाचं ठरतं. एक्सपर्ट सल्ला देतात की, आठवड्यातून किमान १५० मिनिटं मीडिअम स्पीडने चालावं, रोज ७ हजार ते १० हजार स्टेप्स चालण्याचं टार्गेट ठेवावं. चालताना मणका सरळ ठेवा, खांदे सैल सोडा आणि हातांची हालचाल करा.

स्नायू मजबूत करणं महत्वाचं 

जर आपण केवळ हेल्दी राहण्यासाठी वॉक करत असाल तर हा योग्य व्यायाम आहे. तणाव कमी करणे आणि रोज अॅक्टिव रहायचं असेल तर फक्त चालणं पुरेसं आहे. पण जर आपल्याला स्नायू मजबूत करायचे असतील, शरीर टोंड करायचं असेल आणि खेळाडू बनायचं असेल तर केवळ चालण्यावर अवलंबून चालणार नाही. चांगल्या फिटनेससाठी वॉकिंगसोबतच स्ट्रेंथ ट्रेनिंग आणि दुसरे व्यायाम करणंही गरजेचं असतं.

Web Title : क्या सिर्फ पैदल चलना काफी है? पूर्ण फिटनेस के लिए विशेषज्ञों की राय

Web Summary : पैदल चलना बुनियादी फिटनेस, मूड और परिसंचरण के लिए अच्छा है। हालांकि, विशेषज्ञ मांसपेशियों की ताकत और हड्डियों के स्वास्थ्य के लिए शक्ति प्रशिक्षण के साथ पैदल चलने को संयोजित करने की सलाह देते हैं। समग्र फिटनेस के लिए संतुलित दृष्टिकोण महत्वपूर्ण है।

Web Title : Walking Alone Not Enough? Experts Say More Needed for Full Fitness

Web Summary : Walking is good for basic fitness, mood, and circulation. However, experts advise combining walking with strength training for muscle strength and bone health. A balanced approach is crucial for overall fitness.