Lokmat Sakhi >Fitness > योगाभ्यासाने जगणं बदललं, अस्थमा कमी झाला आणि.. योगशिक्षक रुपाली मोरे सांगतात बदललेल्या जगण्याची गोष्ट..

योगाभ्यासाने जगणं बदललं, अस्थमा कमी झाला आणि.. योगशिक्षक रुपाली मोरे सांगतात बदललेल्या जगण्याची गोष्ट..

How Yoga Changed My Life: Yoga Teacher shares their Story : योगाभ्यास शारीरिक आणि मानसिक तंदुरुस्ती कशी देतो हे सांगणारा प्रवास

By भाग्यश्री कांबळे | Published: June 21, 2024 10:01 AM2024-06-21T10:01:00+5:302024-06-21T11:59:08+5:30

How Yoga Changed My Life: Yoga Teacher shares their Story : योगाभ्यास शारीरिक आणि मानसिक तंदुरुस्ती कशी देतो हे सांगणारा प्रवास

How Yoga Changed My Life: Yoga Teacher shares their Story | योगाभ्यासाने जगणं बदललं, अस्थमा कमी झाला आणि.. योगशिक्षक रुपाली मोरे सांगतात बदललेल्या जगण्याची गोष्ट..

योगाभ्यासाने जगणं बदललं, अस्थमा कमी झाला आणि.. योगशिक्षक रुपाली मोरे सांगतात बदललेल्या जगण्याची गोष्ट..

भाग्यश्री कांबळे

'योगा से ही होगा'. योग ही खरंतर भारताच्या प्राचीन परंपरेने दिलेली एक अमूल्य देणगी आहे (International Yoga Day). दरवर्षी २१ जून रोजी आंतरराष्ट्रीय योग दिन साजरा केला जातो (Health Care). योग दिनानिमित्त एक थीम आयोजित केली जाते. यंदाची थीम ‘महिला सक्षमीकरणासाठी योग’ अशी आहे (Mental Health). यामध्ये महिलांचे शारीरिक आणि मानसिक आरोग्य कशा प्रकारे संतुलित राखले जाईल, याविषयीच्या माहितीवर भर दिला जाईल. दरम्यान, योग करण्याचे फायदे किती? यामुळे शारीरिक आणि मानसिक कोणते फायदे होतात? याबद्दलची माहिती योग शिक्षक व मेडीयोगाच्या संचालक रुपाली मोरे यांनी लोकमत सखी डॉट कॉमला दिली(International Yoga Day : How Yoga Changed My Life: Yoga Teacher shares their Story).

तुम्ही योग करण्यास सुरुवात कधीपासून केली?

२००८ साली मी योगाचा क्लास जॉईन केला. तेव्हा रुची निर्माण झाली होती, शिवाय माझी मुलंही मोठी झाली होती. नंतर २०१६ साली माझा जॉब सुटला. मग ज्या ठिकाणी मी योगाचे धडे गिरवत होते, तिथेच योग प्रशिक्षकाकडून पुढील शिक्षण घेतलं. नंतर मेडिकल योग थेरेपीचं शिक्षण घेतलं, आणि मग योगाच्या संबंधित अनेक छोटे कोर्स शिकत गेले. आधी घरातच योगाचे क्लासेस घ्यायचे, मग नंतर विद्यार्थ्यांची संख्या वाढत गेली, आणि आता मी एका जागेच्या हॉलमध्ये योग शिक्षण देते. यासोबत योगशास्त्रात मास्टर ऑफ आर्ट्स पूर्ण केलं.

'मिलेगा ना सचिवजी' म्हणणारी पंचायतमधली ‘आजी’, आयुष्यभर झगडली आणि वयाच्या ७५ व्या वर्षी आता..

आयुष्यात योगामुळे कोणते बदल घडतात?

२००८ साली जेव्हा मी योगाचे क्लासेस लावले, तेव्हा मला अस्थमा होता. ऋतू जरी बदलला तरी मला अस्थमाचा त्रास व्हायचा. पण जस जसं योगाचे धडे गिरवत गेले, तस तसं मला अस्थमाचा होणारा त्रास कमी होऊ लागला. त्यानंतर मी ट्रेकिंगला जायला लागले. योगामुळे शारीरिक आणि मानसिक त्रास कमी होण्यास मदत होते, हे मात्र खरं. कोरोना झाला तेव्हाही योगाची मला खूप मदत झाली. आत्ताच्या घडीला मला जास्त औषध घेण्याची गरज पडत नाही.

योगामुळे मानसिक आरोग्यही सुधारते असे म्हणतात, यामुळे मानसिकदृष्ट्या कोणता फायदा होतो?

योगामुळे शारीरिकसह मानसिकदृष्ट्याही फायदे मिळतात. वयानुसार आपली चिडचिड वाढत जाते. पण योगामुळे आपला चिडचिडेपणा कमी होतो. योग आपल्याला रागावर कसं नियंत्रण मिळवावं हे शिकवतं.

योगामुळे तुमच्या विद्यार्थ्यांमध्ये कोणते बदल घडलेत?

योग केल्याने शारीरिक यासह मानसिक बदल घडतात. शारीरिकरीत्या लवचिकता वाढते. मुख्य म्हणजे शारीरिक बदल लवकर दिसून येतात. योग केल्याने आरोग्यावर सकारात्मक बदल घडतात, आणि हे बदल विद्यार्थी स्वतः येऊन सांगतात.

बॅड कोलेस्टेरॉल कमी करणारा कोमट पाण्याचा १ सोपा उपाय; पाण्यात चिमुटभर 'ही' गोष्ट मिसळा

आजच्या पिढीला योगबद्दल काय सल्ला द्याल?

आजच्या तरुणांना योगाचे महत्व पटले आहे. त्यांना विशेष योगाचे महत्व पटवून देण्याची गरज पडत नाही. करिअर, जॉब सांभाळून लोक योग करतात. पूर्वी लोकांना योग फक्त वयस्कर लोकांनी करावे असे म्हटले जायचे, किंवा अशी एक समज होती, पण आता तरुण वर्गाला योगाचे महत्व पटले आहे. बरेच जण शिक्षणही घेतात. 

Web Title: How Yoga Changed My Life: Yoga Teacher shares their Story

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.