आजकालच्या धावपळीच्या जीवनात लोक बराचवेळ बसून काम करत असतात. जास्तवेळ एकाच ठिकाणी बसून काम केल्यामुळे वजन वाढ होणं हे सध्या खूपच कॉमन झालं आहे. ऑफिसचं काम, मोबाईल आणि लॅपटॉपचा वाढता वापर यामुळे फिजिकल एक्टिव्हीटीज कमी होत आहेत. अशा स्थितीत रोज वॉक करणं किंवा पायी चालणं तब्येतीसाठी नुकसानकारक ठरू शकतं. (Daily Walking Benefits How Many Km Walk Per Day)
नॅशनल लायब्रेरी ऑफ मेडिसिनमध्ये छापण्यात आलेल्या रिसर्चनुसार रोज वॉक केल्यानं म्हणजेच पायी चालल्यानं तब्येतीला बरेच फायदे मिळतात. नियमित वॉक केल्यानं फक्त शरीर फिट राहत नाही तर गंभीर आजारांचा धोकाही कमी होतो. पण लोकांच्या मनात असा प्रश्न असतो की एका दिवसाला किती किलोमीटर चालायला हवं, कितीवेळ चालल्यानं शरीराला फायदे मिळतात. (How To Walk For Weight Loss)
रिसर्चनुसार जर एखादी व्यक्ती पूर्णपणे सुरक्षित असेल तर एका दिवसाला किमान ४ ते ६ किलोमीटर पायी चालायला हवं. जवळपास ३० ते ४५ मिनिटं वॉक केल्यानं हे अंतर पार करता येतं. हे पूर्णपणे त्या व्यक्तीचे वय, फिटनेस लेव्हलवर अवलंबून असतं.
रोज १ ते २ किलोमीटर चालणं गरजेचं असतं. हळूहळू वॉक करून तुम्ही ३ ते ४ किलोमीटर चालू शकता. फिट, एक्टिव्ह लोक दिवसाला ५ ते ६ किलोमीटर किंवा त्यापेक्षा अधिक चालतात. डॉक्टरांच्या म्हणण्यांनुसार १० हजार पाऊलं म्हणजेच ७ किलोमीटर चालल्यानं शरीर निरोगी राहण्यास मदत होते आणि आजारांचा धोकाही टळतो. (Ref)
पायी चालण्याची योग्य पद्धत कोणती?
चालताना पाठीचा कणा ताठ ठेवा. जास्त वाकून चालू नका. जास्त वेगानं किंवा संथपणे चालू नका. वॉक करताना हातांची हालचाल करत चाला. वॉक करताना आरामदायक शूज वापरा.
रोज चालण्याचे फायदे
चालल्यानं वजन कमी होण्यास मदत होते. तसंच कॅलरीज वेगानं बर्न होतात. रोज चालण्याची सवय ठेवली तर हळूहळू वजन कमी होतं. रोज पायी चालल्यानं हृदयाचे आरोग्य चांगले राहते. नॅशनल लायब्रेरी ऑफ मेडीसिनमध्ये छापण्यात आलेल्या रिपोर्टनुसार वॉक केल्यानं ब्लड सर्क्युलेशन चांगले राहते. हाय ब्लड प्रेशर, हॉर्ट अटॅक, स्ट्रोक यांसारख्या आजारांचा धोका उद्भवत नाही. नियमित वॉक केल्यानं शरीरातील ब्लड शुगर लेव्हलही नियंत्रणात राहते.
