lokmat Supervote 2024
Lokmat Sakhi >Fitness > मटकीला मोड आणण्याची सोपी ट्रिक; पटकन मोड येतील- रूचकर लागेल मटकीची ऊसळ

मटकीला मोड आणण्याची सोपी ट्रिक; पटकन मोड येतील- रूचकर लागेल मटकीची ऊसळ

How To Sprout Mataki Easily : मटकीला मोड येण्याच्या सोप्या ट्रिक्स तुमच्यासाठी फायदेशीर ठरतील. यामुळे तुमचं रोजं काम सोपं होईल.

By ऑनलाइन लोकमत | Published: March 29, 2024 11:08 AM2024-03-29T11:08:25+5:302024-03-29T11:11:20+5:30

How To Sprout Mataki Easily : मटकीला मोड येण्याच्या सोप्या ट्रिक्स तुमच्यासाठी फायदेशीर ठरतील. यामुळे तुमचं रोजं काम सोपं होईल.

How To Sprout Mataki Easily : Simple Trick to Sprout Mataki How To Sprout Mataki Quickly | मटकीला मोड आणण्याची सोपी ट्रिक; पटकन मोड येतील- रूचकर लागेल मटकीची ऊसळ

मटकीला मोड आणण्याची सोपी ट्रिक; पटकन मोड येतील- रूचकर लागेल मटकीची ऊसळ

मूग, मटकी असे पदार्थ नाश्त्याला किंवा दुपारच्या आणि रात्रीच्या जेवणाला भाजी, उसळ, मिसळ बनवण्यासाठी उत्तम मानल्या जातात. मूग, मटकीची उसळ सकाळच्यावेळी खाल्ल्याने दिवसभर पोटही भरलेलं राहतं. (How To Sprout Mataki Easily ) पण मिसळ बनवायचा बेत असतो तेव्हा नेहमी मटकीला मोड आलेले नसतात. मटकीला मोड येण्याच्या सोप्या ट्रिक्स तुमच्यासाठी फायदेशीर ठरतील. यामुळे तुमचं रोजं काम सोपं होईल. (How To Sprout Mataki Quickly)

नेट मेडच्या रिपोर्टनुसार मटकीत जवळपास ६१.५ ग्रॅम्स कार्बोहायड्रेट्स असतात, १.६ ग्रॅम प्रोटीन असते, २२.९ प्रोटीन असते, व्हिटामीन बी ६ ०.४ एमजी असते.  १५० मिली ग्रॅम कॅल्शियम असते. आयर्न  १०.८ मिली ग्रॅम असते.  मटकी स्वच्छ  धुवून घ्या आणि  5 ते 6 तासांसाठी भिजवून ठेवा. भिजवल्यानंतर मटकीतलं पाणी काढून घ्या. मटकीतलं पाणी एका टोपात काढून घ्या आणि मटकी स्वच्छ पुसून घ्या.  रात्रभर मटकी झाकून ठेवा. दुसऱ्या दिवशी सकाळी मटकीला छान मोड आलेले असतील त्यानंतर ही मोड आलेली मटकी एका टोपलीत काढून घ्या.  

मटकीला मोड आणण्याची दुसरी पद्धत (Easy Ways To Sprout Beans)

मटकी एका कापडात बांधून किचन सिंगच्या नळावर लटकवू ठेवा. त्यावर पाणी पडल्यानंतर कापड पूर्णपणे ओले होईल असं पाहा. मटकीला मोड येण्यासाठी 10 ते 12 मिनिटं लटकवून ठेवा. कापड सुकल्यानंतर पुन्हा ओले करत राहा.  कापड नेहमीच ओले राहील याची खात्री करा. मटकीला मोड आल्यानंतर ते कापडातून बाहेर आलेले दिसतील. नंतर मटकी  एका वाटीत काढून  घ्या तुम्ही हवंतर फ्रिजमध्येही ठेवू शकता. 

मोड आलेल्या कडधान्यांचा वापर कशासाठी करता येतो? (How to Eat Sprouted Mataki)

स्प्राऊंस सॅण्डविच किंवा सॅलेडमध्ये कच्चं खाऊ शकता. याशिवाय स्टर फ्राय, सूप, पॅटीज, पराठा, भाजी,  खिचडी यात तुम्ही मोड आलेले कडधान्य घालू शकता.  कडधान्य कच्चे किंवा हलके शिजवून खाल्ले जातात. अशावेळ बॅक्टेरियाजचे संक्रमण  होऊ शकते.  म्हणून मोड आलेल्या कडधान्यांचा आहारात समावेश करा.

Web Title: How To Sprout Mataki Easily : Simple Trick to Sprout Mataki How To Sprout Mataki Quickly

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.