बहुतांश महिलांच्या बाबतीत ही समस्या दिसून येते की त्यांचं सुटलेलं पोट कमी कसं करावं हा त्यांंच्यापुढे मोठा प्रश्न असतो. बऱ्याचदा असंही होतं की त्यांचे हात, पाय अगदी सुडौल असतात. पण पोटावरची चरबी मात्र दिवसेंदिवस वाढतच जाते. काही केल्या पोट कमी होत नाही. आता तर थंडीचेही दिवस आहेत. त्यामुळे घराबाहेर पडून व्यायाम करण्याचाही कंटाळा येतो. म्हणूनच घरच्याघरी काही सोपे व्यायाम अगदी झटपट करून पाहा (3 simple tips to get rid of belly fat). पोट आणि कंबरेवरची चरबी कमी होण्यास निश्चितच मदत होईल.(how to get flat belly and slim figure?)
पोटावरची चरबी कमी करण्यासाठी व्यायाम
थंडीमुळे घराबाहेर पडून जीमला, योगाला जावं वाटत नसेल तर घरच्याघरी पुढे सांगितलेले काही व्यायाम करून पाहा..
लग्नासाठी पैठणी घ्यायची? बघा पैठणीमध्ये सध्या जबरदस्त ट्रेण्डिंग असणारे रंग- खरेदी होईल सगळ्यात भारी
१. पहिला व्यायाम करण्यासाठी ताठ उभे राहा. दोन्ही तळहात एकमेकांमध्ये गुंफून घ्या आणि मग ते डोक्याच्या वर घ्या. यानंतर उजवा पाय उचला, हात खाली करून उजव्या पायाच्या गुडघ्याला लावा आणि नंतर पुन्हा हात वर घ्या. त्यानंतर डावा पाय उचलून पुन्हा तसेच करा. असं एकानंतर एक या पद्धतीने ३० वेळा करा. आणि त्याचे ३ सेट करा.
२. दुसरा व्यायाम करण्यासाठी हात वर घ्या. उजवा पाय वर घेऊन गुडघ्यात वाकवा. हात खाली करून उजव्या पायाच्या मांडीखाली घ्या. पुन्हा हात वर आणि पाय खाली ठेवा. आता अशाच पद्धतीने डाव्या पायानेही करा. असं एकानंतर एक या पद्धतीने ३० वेळा करा. आणि त्याचेही ३ सेट करा.
फातिमा सना शेख म्हणाली- मी तासंतास खात बसू शकते, कारण....; आजाराविषयी केला मोठा खुलासा..
३. तिसरा व्यायाम करण्यासाठी दोन्ही तळहात कानाच्या मागे ठेवा. उजवा पाय उचलून गुडघ्यात वाकवा. त्यानंतर उजव्या पायाच्या गुडघ्याला डाव्या हाताचा कोपरा लावा. तसेच याचपद्धतीने नंतर डावा पाय वर उचला आणि त्याला उजव्या हाताचा कोपरा लावा. हा व्यायामही साधारण २ ते ३ मिनिटे करा. एवढं केलं तरी तुमची पोटावरची, कंबरेवरची चरबी कमी होण्यास खूप मदत होईल.
